आपण सर्व जण ज्याची आतुरतेने वाट पाहत आहोत, तो वरुणराजा अजून तरी म्हणावा तसा बरसलेला नाही. म्हणजे त्याच्या मर्जीनुसार तो मध्येच कुठे तरी धो धो बरसतोय तर कुठे अगदीच रिमझिम. काही ठिकाणी तर नुसतीच ढगांची दाटी करून पसार होतोय तो. आपण मात्र पाऊस येणार म्हणून छत्र्या, रेनकोट, पावसाळी चपला सर्व काही अगदी तय्यार ठेवलेय. एवढेच काय, पावसात आपल्या बाइकला काही होऊ नये म्हणून तिच्या सुरक्षेचीही पुरेशी तजवीज करून ठेवली आहे. चारचाकीचेही तस्सेच. परंतु पाऊस काही नाव घ्यायला तयार नाही. हे दर वर्षीचे चित्र आहे. आपण अगदी जय्यत तयारी करून ठेवायची आणि त्याने यायचेच नाही. असो, तो यायचा तेव्हा येईलच; परंतु आपण गाफील राहायला नको..

Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
coconut oil and aloe vera for beautiful and glowing skin Benefits
उन्हाळ्यात चेहरा कायम चिपचिपा, घामट दिसतो? खोबऱ्याचं तेल अन् कोरफडीचं मिश्रण वाढवेल सौंदर्य
jaljeera powder
उन्हाळ्यात प्या थंडगार जलजीरा! घरीच बनवा ३ महिने टिकेल अशी जलजीरा पावडर, नोट करा रेसिपी
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन

पावसाळ्यात गाडय़ांची विशेष काळजी घेणे अधिक गरजेचे असते. कारण याच काळात गाडी घसरण्याचा, गाडीच्या इंजिनात पाणी शिरून ते खराब होण्याचा धोका अधिक असतो. साहजिकच गाडीची काळजी प्रत्येक जण घेतच असतो. परंतु काही अडचणींचा आपण जास्त विचारच केलेला नसतो आणि नेमक्या त्याच अडचणी पावसाळ्यात वगैरे आपल्या गाडीसमोर येऊन उभ्या ठाकतात. हे सर्व टाळण्यासाठी काय काय केले पाहिजे, याच्या काही टिप्स येथे देत आहोत. ज्याला आपण ‘आला पावसाळा, वाहन सांभाळा’, असे सहज संबोधू शकतो!

वायपर ब्लेड्स :

वायपर ही एक अशी गोष्ट आहे की, ज्यांचा वापर आपल्यासारख्या देशात पावसाळ्याचे चार महिने सोडले तर इतर वेळी फारसा होत नाही. हिवाळ्यात अगदीच घाटात वगैरे धुकं असेल तर क्वचितप्रसंगी वायपरचा वापर होतो. मात्र पावसाळ्यात त्यांचे काम जास्त वाढते. त्यामुळे पावसाळ्यात वायपर योग्य आहेत ना, हे आधी तपासून घ्यायला हवे. वायपर ब्लेड्सची तपासणी करून ते एक तर बदलणे किंवा योग्यरीत्या बसवून घेणे हे दोनच पर्याय असतात. योग्यरीत्या बसवून घेणे, अशासाठी की कडक उन्हात वायपरचे ब्लेड गाडीच्या काचेला चिकटलेले राहिले तर ते कडक होऊन त्यावरील रबर खराब होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळेच अनेकदा उन्हाळ्यात वायपर ओढून काचेपासून लांब ठेवलेले दिसतात. गाडी सुरू करताना ते हाताने प्रेस करून काचेवर ठेवले जातात. यामुळे वायपर ब्लेड्सची अलाइनमेंट बिघडून काच नीट साफ होत नाही. उन्हामुळे कडक झालेले वायपर ब्लेड्स आवाज करतात. कित्येकदा ते फाटून रबरामागील धातूची पट्टी बाहेर आलेली दिसते. अशा परिस्थितीत ते बदलणेच योग्य असते. नेहमी कारनिर्मात्यांनी सुचवलेले ब्लेड्स वापरणेच सोयिस्कर असते. कारण असे ब्लेड्स दीर्घ काळ टिकणारे असतात. त्यामुळे पावसाळ्यात या गोष्टीवर जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. वायपर ब्लेड्सप्रमाणेच वायपर आर्मही तपासून पाहाव्या लागतात. वायपर आर्मच्या बिजागऱ्यांमधील स्प्रिंगही तपासून घ्यावी. तसेच वायपर मोटर आणि लिंकेज यांचीही तपासणी योग्य त्या वर्कशॉपमध्ये गाडी नेऊन करावी अथवा अनुभवी तंत्रज्ञांकडून त्यांची तपासणी करावी. बहुतांश गाडय़ांमध्ये काळ्या रंगाचे एक प्लास्टिक कव्हर असते, त्याला काऊलिंग टॉप असे संबोधले जाते. पावसाआधी ते काढून त्याच्या खाली साचलेला कचरा काढून घ्यावा. हा कचरा ओला झाला तर त्या भागातील गाडीचा पत्रा गंजतो. प्रसंगी त्याला भोके पडून पाणी शिरण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे ही काळजी अवश्य घ्यावी.

ब्रेक्स :

गाडीचा अत्यंत महत्त्वाचा भाग. ब्रेक जर नीट नसतील तर सर्वच मुसळ केरात! त्यामुळे पावसाळ्यात ब्रेक नीट काम करावेत, असे वाटत असेल तर त्याची तातडीने तपासणी करून घेणे गरजेचे असते. आता बहुतांश गाडय़ांमध्ये व्हॅक्युम असिस्टेड हायड्रो ब्रेक्स वापरले जातात. पावसाळा सुरू होताना सर्व ब्रेक फ्लुइड्स कधी बदलले आहेत याची माहिती आपल्या नेहमीच्या वर्कशॉपमधून करून घ्यावी. किंवा अशी माहिती आपल्याकडे अद्ययावत ठेवावी. ब्रेक ऑइल हे एक प्रकारचे हायड्रॉलिक फ्लुइड असून त्याचे आयुष्यमान दोन वर्षे किंवा २० हजार किमीपर्यंत असते. ते हायड्रोस्कॉपिक असून हवेतील आद्र्रता ते शोषून घेते. त्यामुळे ब्रेकची कार्यक्षमता कमी होऊ शकते. म्हणून योग्य वेळी ब्रेक ऑइल बदलले नसल्यास पावसाने जोर पकडण्याआधी ते बदलणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे ब्रेक पॅड्स, मागील चाकात वापरले जाणारे व्हील सिलिंडर्स आणि हँड ब्रेकची तपासणी आणि योग्य ती मांडणी करून घेणे आवश्यक ठरते.

आऊटसाइड रिअर व्ह्य़ू मिरर :

नवीन तंत्रज्ञानावर आधारलेल्या प्रवासी गाडय़ांमध्ये वातानुकूलित यंत्रणा ऑटोमॅटिक असून गाडीच्या आतील तापमान हे बाह्य़ तापमान लक्षात घेऊन कमी-जास्त केले जाते. त्यासाठी आवश्यक तो सेन्सर काही गाडय़ांमध्ये बाहेरील आरशांमध्ये लावलेला असतो. म्हणून पावसाळा सुरू होताना गाडीबाहेरील आरसे व त्यांचे कव्हर तपासून घेणे आवश्यक असते. बाहेरील आरशांच्या कव्हरला तडा गेलेला असल्यास अथवा ते तुटलेले असल्यास आरशाच्या आतील सेन्सरला पावसाचे पाणी लागून बाहेरील हवा थंड आहे असे सेन्सरकडून निर्देशित केले जाते आणि त्यामुळे गाडीतील वातानुकूलित यंत्रणा बंद पडते.

टायर्स :

पावसाळ्याआधी गाडीच्या सर्व चाकांची काटेकोर तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे असून त्यामध्ये टायरची झीज किती व कशी झाली आहे, हे तपासणे अत्यावश्यक असते. त्याचप्रमाणे टायरच्या उभ्या बाजूला (साइड वॉल) मधोमध हवेचा फुगा आला आहे का, टायर फाटले आहेत का, टायरच्या तारा बाहेर आल्या आहेत का, हे सर्व तपासून घेणे अत्यावश्यक आहे. गाडीची व्हील अलाइनमेंट आणि व्हील बॅलेन्सिंग करणेही आवश्यक असते. बहुतांश कारमालक पावसाळा संपल्यावर गाडीचे टायर बदलतात. मात्र सुरक्षेच्या दृश्टीने हे अयोग्य असून पावसाआधी टायर बदलणे आवश्यक आहे. बजेट कमी असल्यास किमान पुढील दोन टायर तरी बदलावेत, गरज असेल तरच.

मिलिंद गांगल

ls.driveit@gmail.com