२५३ मीटर प्रति तास हा वेग काही जणांसाठी फार गतिमान वाटणार नाही. उत्तर अमेरिकेतील एसएससी नावाची वाहन तयार करणारी एक स्वतंत्र कंपनी जिने एरो हे वाहन २००७ मध्ये बनविले ते बुगाट्टी व्हेरॉनप्रमाणेच होते. या भूतलावरील सर्वाधिक वेगवान म्हणजे २५६ मीटर प्रति तास वाहन म्हणून त्याची गणना होते.
बुगाट्टी अशी काही नव्हती. कंपनीने दोन वर्षांनंतर बुगाट्टी व्हेरॉन सुपर स्पोर्ट ही ११८४ बीएचपीचे वाहन तयार केले. जुन्या व्हेरॉनपेक्षा तिची हॉर्सपॉवर २०० ने अधिक होती. जर्मनीतील फोक्सव्ॉगनच्या कारच्या तुलनेत ३६८ मीटर प्रति तास म्हणजेच ४२९ किलोमीटर प्रतिी तास हा वेग विक्रम स्थापन करण्याच्या तयारीतील ही कार. अभियांत्रिकी कलेचा नमुनाही या कारचा उत्तमच. गेल्या दशकभरात ४५० बुगाट्टी व्हेरॉन तयार झाल्या आहेत आणि त्याची तुलना अद्याप कोणत्याही कंपनीला तिच्या कोणत्याही मॉडेलद्वारे साध्य करण्यात आली नाही. जलद वेग श्रेणीत तर ही कार अव्वल आहेच. या कारचे ताजे मॉडेल हे त्याच्या जुन्या वाहनाच्या तुलनेत २० लाख डॉलरने महाग आहे.
नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार, व्हेरॉन असणाऱ्या व्यक्तीकडे निदान अन्य काही कार, खासगी विमाने तसेच याट असतातच! व्हेरॉनला सध्या स्पर्धाही वाढतेय म्हणा. काही नवे खेळाडू या क्षेत्रात उतरत आहेत. हेनेसे व्हेनॉम जीटी, कोएनिगसेग अशी नावे त्यात घेता येतील. बुगाट्टीने शिरॉन नावाची नवी कार याच वर्षांत सादर केली. तिची प्राथमिक किंमतच १९ कोटी पौंड (जवळपास १८ कोटी रुपये) आहे. अर्थात अतिरिक्त कर वगैरे नंतरच. कारची ऊर्जा आहे तब्बल १४७९ बीएचपी! म्हणजे कोणत्याही सर्वसाधारण कारच्या तुलनेत १५ पट अधिक. कंपनी सध्या केवळ ४५० वाहनेच या गटात तयार करते आहे. ही कार कंपनीने नुकत्याच जिनेव्हा येथे झालेल्या वाहन प्रदर्शनात सादर केली होती. सादरीकरणापूर्वीच तिच्या एक तृतीयांश वाहनांची विक्रीही झाली. बरं, कारमध्ये कोणतेही हायब्रीड तंत्रज्ञान उपयोगात आणले गेलेले नाही. फॉसिल इंधनाचाच वापर त्यात होतोय आणि कंपनीने चालू दशकात तिचे सर्वाधिक उत्पादन घेण्याचे ध्येयही राखले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव वाहन तयार होत असलेल्या भागातच वेगमर्यादा घालून देण्यात आली आहे. विद्युतीय प्रणालीद्वारे ती ४१८ किलोमीटर प्रति तास आहे.
शिरॉनचे ध्येयच किमान वरचा वेग ४६४ किलोमीटर प्रति तास राखण्याचे आहे. आता बोला.!
प्रणव सोनोने – pranav.sonone@gmail.com