28 September 2020

News Flash

टॉप गीअर : सुझुकी जिक्सर एसएफ

यामाहा, होंडा, सुझुकी या जपानी ब्रँडबरोबर हीरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो यांचाही समावेश आहे.

लाँग रायडिंगचा विचार केल्यास जिक्सर एसएफ उत्तम आहे

वीकेंड रायडिंगची संकल्पना आपल्याकडे रुजत असल्याने कॅम्पयुटर सेगमेंटमधील मोटरसायकलपेक्षा तरुणांकडून परफॉर्मन्स मोटरसायकलला पसंती मिळत आहे. मोटरसायकलचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी परफॉर्मन्स मोटरसायकलची अनेक मॉडेल बाजारात आणली आहेत. यामाहा, होंडा, सुझुकी या जपानी ब्रँडबरोबर हीरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो यांचाही समावेश आहे.

प्रीमियम मोटरसायकलमध्ये प्रॉफिट मार्जिनचे प्रमाण चांगले असते. त्यामुळेच बहुतेक सर्व कंपन्यांनी मूळ रेसिंगसाठी असलेल्या आणि एक हजार सीसी इंजिनसाठी प्रसिद्ध असलेल्या सुपरबाइक्सचे मिनि व्हर्जन बाजारात आणली आहेत. म्हणजे या मोटरसायकल दिसायला सुपरबाइक्ससारख्या आहेत. मात्र, त्यांचे इंजिन, फीचर आणि किंमत ही मास मार्केटच्या दृष्टीने ठेवण्यात आली आहे. डिझाइनमुळे या मोटरसायकल तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. या मोटरसायकलची किंमत साधारण १ ते १.५० लाख रुपयांच्या आसपास आहे. तसेच, इंजिन दीडशे ते अडीचशे सीसीचे आहे. अशा रेंजमध्ये सुझुकीच्या जिक्सर एसएफ या मोटरसायकलला १५५ सीसीचे असून, पॉवर १४.६ बीएचपी आहे. या सेगमेंटमधील अन्य मोटरसायकलच्या तुलनेत जिक्सरला असणारी पॉवर कमी आहे. त्यामुळे जिक्सर या फीचरबाबत उणी असली तरी डिझाइनमुळे या श्रेणीत येते.

जिक्सर एसएफचे डिझाइन हे आंतरराष्ट्रीय पातळीवर उपलब्ध असलेल्या जीएसएक्स १००० या सुझुकीच्या मॉडेलशी मिळतेजुळते आहे. त्यामुळेच जिक्सर एसएफचे डिझाइन रेसिंग इन्स्पायर्ड आहे. या मोटरसायकलला पूर्ण फेरिंग दिले आहे. यामुळे वाऱ्याचा अडथळा कमी जाणवतो. तसेच, पोझिशनिंगही उत्तम आहे. पिलन रायडरची सीट उंच असून, ग्रॅबरेलही दिला आहे. क्रोम फिनिश एक्झॉस्ट असून, टय़ूबलेस टायर दिले आहे. एलईडी टेल लॅम्प, डिजिटल इन्स्ट्रमेंट कन्सोल, अलॉय व्हील्स, उत्तम ब्रेकिंगसाठी पुढील व मागील चाकास डिस्कब्रेक दिला आहे. तसेच, या मोटरसायकलच्या टॉपएंड व्हर्जनमध्ये अँटी ब्रेकिंग सिस्टिम (एबीएस) प्रणाली आहे. यामुळे सुरक्षा अधिक वाढते. पुढील चाकास टेलिस्कोपिक व मागे मोनो शॉक सस्पेन्स दिले आहे. मोटरसायकलचे मायलेज प्रति लिटर ३५-४२ किमी आहे.

लाँग रायडिंगचा विचार केल्यास जिक्सर एसएफ उत्तम आहे. इकॉनॉमी मोडमध्ये चालविताना इंजिनचा स्मूथ वाटते. तसेच, ताशी ८० चा वेग वाढल्यावरही इंजिनचा आवाज, व्हायब्रेशन्स जाणवत नाहीत. लाँग रायडिंगसाठी १२ लिटरची टाकी यास दिली असून, हायवेवर इकॉनॉमी मोडवर मोटरसायकल चालविल्यास प्रति लिटर ४६ किमी मायलेज मिळू शकते. पिलन रायडिंग पोझिशन उंच असली तरी सस्पेन्शन चांगले असल्याने फारसे झटके जाणवत नाहीत. अर्थात, सीटचे कुशनिंग फारसे आरामदायी नाही. अर्थात, या सेगमेंटमधील कोणत्याच मोटरसायकलचे ते चांगले नाही. कारण स्पोर्ट्स रायडिंग हा या मोटरसायकलला मुख्य हेतू आहे. मोटरसायकलला पाच गिअर दिले आहेत. अर्थात, हायवे ड्रायव्हिंगचा विचार करता सहावा गिअर देण्याची आवश्यकता होती, असे वाटते. मोटरसायकलचे गिअर शिफ्टिंग स्मूथ आहे.  मोटरसायकलचे डिझाइन रेसिंग इन्स्पायर्ड असल्याने अशी मोटरसायकल शहरात चालविणे कटकटीचे वाटू शकते. कारण, हँडलिंग हे अन्य कॅम्पयुटर मोटरसायकलसारखे नाही. त्यामुळे रेसिंग मोटरसायकलची पॅशन असल्यासच बजेट रेसिंग इन्स्पायर्ड मोटरसायकलचा विचार करता येईल. जिक्सर एसएफमध्ये मायलेज, फीचर, डिझाइन व किंमत यांचा विचार केल्यास ही मोटरसायकल व्हॅल्यू फॉर मनी अशीच आहे.

ओंकार भिडे obhide@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 3:41 am

Web Title: suzuki gixxer sf review
Next Stories
1 खडबडीत रस्त्यांवरही लक्झरी प्रवास!
2 टॉप गीअर : अ‍ॅक्टिव्हा १२५
3 कोणती कार घेऊ?
Just Now!
X