25 September 2020

News Flash

हेक्सा, क्रेस्टा, एक्सयूव्ही ५००

टोयोटाने इनोव्हा क्रेस्टा लाँच करताना ऑटोमॅटिक व्हर्जनसह लाँच केली.

 

कोणता आहे पर्याय?

एंट्री लेव्हल एसयूव्ही (स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल) व प्रीमियम एमपीव्ही (मल्टि पर्पज व्हेइकल) यांच्यात स्पर्धा नसली तरी एमपीव्हीला पसंती मिळत आहे. त्यामुळे १२ ते २१ लाख रुपयांदरम्यान अनेक एसयूव्ही लाँच झाल्या असूनही क्रॉसओव्हर सेगमेंटमध्ये (एमपीव्ही-एसयूव्हीचे कॉम्बिनेशन) गेल्या एक दशकाहून टोयोटा इनोव्हा आघाडीचे स्थान टिकवून आहे. किमतीबाबत इनोव्हा महाग असून, अनेक प्रीमियम फीचर महिंद्र एक्सयूव्ही ५०० एसयूव्हीमध्ये व टाटा हेक्सा या एमपीव्हीमध्ये आहेत. अर्थात, शहरातील वाढत्या ट्रॅफिकमुळे ऑटोमॅटिक कार, एसयूव्हीना पसंती मिळत आहे. त्यामुळेच टोयोटाने इनोव्हा क्रेस्टा लाँच करताना ऑटोमॅटिक व्हर्जनसह लाँच केली. तसेच महिंद्रने एक्सयूव्ही ५०० चे ऑटोमॅटिक व्हर्जनचा पर्याय दिला. टाटा मोटर्सनेही हेक्सा ही नवी एमपीव्ही लाँच करताना एमएमटी म्हणजे ऑटोमॅटिक मॉडेलचा पर्याय उपलब्ध केला आहे. किंमत, फीचर या दोन्हींच्या मध्ये एक्सयूव्ही ५०० व हेक्सा या इनोव्हा क्रेस्टाला नक्कीच मागे टाकतात. पण या तीन पर्यायांमध्ये सर्वात उजवा पर्याय कोणता आहे, हे जाणून घेऊ या.

एक्स्टिरियर

इनोव्हा क्रेस्टा ही आधीच्या इनोव्हासारखी नक्कीच नाही आणि कंपनीच्या डिझायनरनी प्रीमियम लुक देण्यासाठी घेतलेली मेहनत जाणवते. एजी कॉर्नर्स, अ‍ॅग्रेसिव्ह बोनेट व क्रोम फिनिशिंग असलेले हेक्सागॉनल ग्रिल, हेडलॅम्प दिले असून, एलईडी प्रोजेक्टर हेडलाइट्स व एलईडी गाइड लाइट्सबरोबर मागील बाजूने नव्या डिझाइनच्या एलईडी टेललॅम्प, स्पॉयलर, शार्कफिनसारखा अँटिना देण्याबरोबर डोअर ट्रिम्सच्या रचनेतही बदल केला असून, १७ इंचांचे ऑलॉय व्हिलही दिले आहे. यामुळे इनोव्हा क्रेस्टाला क्रॉसओव्हरचा लुक मिळाला आहे. तसेच आधीच्या इनोव्हाच्या तुलनेत क्रेस्टा थोडी मोठी आहे. क्रेस्टाच्या मागीला बाजूस असलेल्या बॅजकडे पाहिल्यावर मॉडेल आटोमॅटिक आहे का, हे समजते.

आरियाच्या चासीवरच हेक्साची रचना झाली असली तरी प्रीमियम लुक देण्यात टाटा मोटर्सच्या डिझायनरना यश मिळाले आहे. बम्पर, बोनेटच्या नव्या डिझाइनबरोबर हेक्सागॉनल ब्लॅक ग्रिल, क्रोम अन् बम्परमध्ये बॉडी क्लॅडिंगचा अंतर्भाव केल्याने नजाकत वाढली असून, मस्क्युलर लुक मिळाला आहे. एलईडी डीआरएलएस, फॉगलॅम्प, हॅलोजन लॅम्पबरोबरच एलईडी ब्रेकलाइट, ऑलॉय व्हिल्स दिले आहेत. मागील बाजूसही क्रोमचा वापरले आहे. तसेच, ट्विन एकक्झॉस्ट देण्यात आले असून, त्या ठिकाणीही एसयूव्हीसारखे बॉडी क्लॅडिंग दिल्याने हेक्सामध्ये क्रॉसओव्हरचा परफेक्ट लुक मिळाला आहे.

एक्सयूव्ही ५०० चे डिझाइन महिंद्रच्या पारंपिक डिझाइनपेक्षा वेगळे आहे. मॅन मनशीन अशी छबी निर्माण करण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे. काळ्या रंगातील फ्रंट ग्रिलबरोबर क्रोमचा वापर करण्यात आला आहे. बोनटेचे डिझाइन एजी असल्याने पुढील बाजूने आकर्षक लुक मिळाला आहे. मात्र, हेडलॅम्पची रचना म्हणावी इतकी आकर्षक नाही. बॉडी क्लॅडिंग सगळ्या बाजूंनी नाही. केवळ पुढे आणि मागील बाजूस दिले आहे. त्यामुळे लुकची परिणामकारकता कमी झाल्याचे जाणवते. एक्सयूव्हीला कंपनीने ट्विन एक्झॉस्ट दिला आहे. त्यामुळे डिझाइन थोडे मस्क्युलर वाटते.

इंटिरियर व फीचर

इंटिरिअरबाबत एक्सयूव्ही ५०० च्या तुलनेत इनोव्हा क्रेस्टा नक्कीच सरस आहे. मात्र, हेक्साचे इंटिरिअर नक्कीच प्रीमियम असून, क्रेस्टाच्या तोडीस तोड आहे. इनोव्हाचा डॅशबोर्ड मोठा असून, गिअर हँडलबारच्या बाजूने करण्यात आलेले बुडन फिनिशिंग उत्तम आहे. एसीव्हेंट्सही आकर्षक असून, सात इंची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम दिली असून, एयूएक्स, यूएसबी, ब्लूटूथ आणि नॅव्हिगेशनला सपोर्ट करते. लेदर अपहोलिस्टी व आर्मरेस्ट उत्तम आहेत. सर्व क्रूझ कंट्रोल स्टिअरिंगमध्ये देण्यात आले आहेत. तिन्ही सीट्स रोमध्ये उत्तम जागा असून, आरामही मिळतो. अ‍ॅम्बियन्ट लायटिंग दिले आहे. त्यामुळे इंटिरिअरमध्ये फरक जाणवतो.

एक्सयूव्ही ५०० चे केबिनही चांगले असून, ब्लॅक व बेइज कॉम्बिनेशनमुळे रचना आकर्षक वाटते. मात्र, स्पर्धकांशी विचार करता काही उणिवा नक्कीच जाणवतात.

काही ठिकाणी प्लॅस्टिकचा वापर करण्यात आल्याने लुक अ‍ॅव्हरेज जाणवतो. एक्सयूव्हीमध्ये ७ इंची इन्फोटेनमेंट सिस्टिम दिली असून, नॅव्हिगेशन फीचरबरोबर स्टिअरिंगमध्ये क्रुझ कंट्रोलचा अंतर्भाव आहे. तसेच सनरूपचा पर्याय आहे. ड्रायव्हर सीट सहा टप्प्यांत अ‍ॅडजेस्ट करता येते. सीट्ससाठी वापरण्यात आलेली लेदर अपहोलेस्टी स्पर्धकांच्या तुलनेत फिकी वाटते. क्रेस्टा व हेस्काची सेकंड व थर्ड रो सीट स्पेसच्या बाबतीत एक्सयूव्हीच्या तुलनेत अधिक आहे.

हेस्काच्या केबिनमध्ये बसतानाच प्रीमियम फील जाणवतो. स्टिअरिंगवर अनेक कंट्रोल दिले असून, ईपीएसमुळे स्टिअरिंग हलके वाटते. तसेच इन्फोटेनमेंट सिस्टिम नॅव्हिगेशनसह दिली आहे. तसेच हार्मन कार्डनची सिस्टिम ही जमेची बाजू असून, त्याचा दर्जा संगीत लावताच जाणवतो. ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल एसी देण्याबरोबर सेकंड आणि थर्ड सीटला स्वतंत्र एसी व्हेंट् दिले आहेत. ड्रायव्हरची सीट योग्य उंचीला असल्याने दृश्यमानता अधिक आहे. हेक्सा आकाराने मोठी असूनही आपण ती योग्य पद्धतीने चालवू शकतो, असा आत्मविश्वास ड्रायव्हरला जाणवतो. डॅशबोर्डसाठी वापरण्यात आलेले लेदर अपहोलेस्टी, अ‍ॅम्बियन्ट लायटिंगमुळे टाटा मोर्सने मोठय़ा प्रमाणात दर्जामध्ये सुधारणा केल्याचे जाणवते आणि ही टाटा मोटर्सची गाडी आहे का, असा प्रश्न पडतो. इंटिरिअर, फीचरबाबतीत हेक्सा ही क्रेस्टापेक्षा मागे नाही.

सुरक्षितता

एबीसीए, ईबीडी, हिल असिस्ट हे तीनही गाडय़ांमध्ये आहे. मात्र, क्रेस्टामध्ये आठ एअरबॅग तर हेक्सा व एक्सयूव्ही ५०० मध्ये सहा एअरबॅग दिल्या आहेत. हेक्सामध्ये कॉìनग ब्रेकिंस सिस्टिम, ट्रॅक्शन कंट्रोल व डय़ूएअर डिस्कब्रेक देण्यात आले आहेत. त्यामुळे स्टॅबिलिटी अधिक वाढते. एक्सयूव्ही ५०० लाही रिअर डिस्कब्रेक दिला आहे. पण सुरक्षेच्या फीचरबाबत हेक्सा इनोव्हापेक्षा काही टक्के सरस आहे.

इंजिन व परफॉर्मन्स

एक्सयूव्ही ५०० ला असणारे २.२ लिटरचे एमहॉक इंजिन उत्तम असून, १४० पीएस पॉवर ३७५० आरपीएमवर मिळते. सिक्स स्पीड टॉर्ककन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअर बॉक्स आहे. पण क्रेस्टा व हेक्सा तुलनेत ऑटोमॅटकिचा फील हायवेवर अपेक्षेइतका जाणवत नाही. हेक्साला व्हॅरिकोर ४०० हे २.२ लिटरचे डिझेल इंजिन असून, १५६ पीएस पॉवर मिळते. सिक्स स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दिला आहे. हेक्साला टॉर्क ४०० एनएम असल्याने पॉवर कमी असूनही पिअकमध्ये मार खात नाही. कम्फर्ट, डायनामिक, रफ, ऑटो, रेस असे ड्रायव्हिंग मोड हेक्सामध्ये आहे. त्यामुळे परिस्थितीनुसार ड्रायव्हिंग मोड निवडता येतो. क्रेस्टाला पूर्ण नवे २.८ लिटरचे इंजिन असून, १७४ पीएस पॉवरबरोबर ३६० एनएमचा टॉर्क आहे. गिअर चेंज स्मूथ असले तरी एकदम पिकअप घेतला वा जोरात चालविल्यास इंजिनचा आवाज जाणवतो. क्रेस्टाला इको व पॉवर मोड दिला आहे. एक्सयूव्ही ५०० पेक्षा हेक्सा व क्रेस्टाचा इंजिन ड्रायव्हिंग अनुभव सरस जाणवतो. एक्सयूव्ही ५०० व हेस्का यांचे ऑटोमॅटिक व्हर्जन केवळ डिझेलमध्येच उपलब्ध आहे. टोयोटाने देशातील बदलणारी परिस्थिती पाहता ऑटोमॅटिकमध्ये पेट्रोल इंजिनचा पर्याय दिला आहे. पेट्रोल व्हर्जनमध्ये डिझेलच्या तुलनेत स्मूथनेस सर्वाधिक असून, पिकअपही चांगला आहे. क्रेस्टाचे पेट्रोल इंजिन २.७ लिटरचे आहे. इनोव्हा क्रेस्टाचा ग्राउंड क्लिअरसन्स स्पर्धकांच्या तुलने सर्वात कमी म्हणजे १६७ एमएम आहे. एक्सयूव्ही ५०० व हेक्साचा ग्राउंड क्लिअरन्स २०० एमएम आहे. त्यामुळे ऑफरोड वा ग्रामीण भागातील ड्रायव्हिंग परिस्थितीत इनोव्हा मागे पडते. दणकटपणामुळे एक्सयूव्ही ५०० उजवी आहेत. तसेच हेक्साहीच बांधणी गुणवत्ता चांगली असल्याचे ऑफरोड ड्रायव्हिंगवरून लगेच लक्षात येते. हेक्सा व एक्सयूव्ही ५०० चे स्टिअरिंग जड वाटत नाही. त्यामुळे ट्रॅफिकमध्ये डोक्याला कटकट जाणवत नाही. एसयूव्ही वा क्रॉसओव्हर सेगमेंटमधील अन् तेही ऑटोमॅटिक व्हर्जन हे लक्झरीसाठी घेतले जाते. या सेगमेंटमधली डिझेल ऑटोमॅटिकचे मायलेज प्रति लिटर ११ ते १३ किमी सिटी ड्रायव्हिंगला मिळू शकते. प्रत्यक्षात कंपन्यांच्या दावा हा प्रतिलिटर १४ किमीपेक्षा अधिकचा आहे.

पर्याय कोणता?

ब्रँड, रिसेल व्हॅल्यू, नेटवर्क, गुणवत्ता याबाबतीत इनोव्हा क्रेस्टा एक्सयूव्ही ५०० व हेक्साला नक्कीच मागे टाकते. पण फीचर, हँडलिंग व प्रत्येकाची आवड-निवड अन् बजेट यांचा विचार नक्कीच करावा लागले. कारण, इनोव्हा क्रेस्टाचे डिझेल मॉडेल एक्सयूव्ही ५०० पेक्षा दोन ते अडीच लाख रुपयांनी किमान महाग असून, त्यातही बेस मॉडेल येते. त्या तुलनेत एक्सयूव्ही ५०० च्या फुल्ली लोडेड मॉडेलचा पर्याय उपलब्ध होतो. या दोन्हींच्या मधला पर्याय हेक्साचा असून, हे मॉडेल १६ लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम, शहर राज्य, मॉडेलनुसार फरक), एक्सयूव्ही ५०० चे २.२ लिटरचे मॉडेल १५ लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम, शहर राज्य, मॉडेलनुसार फरक) आणि हेक्साचे डिझेल ऑटोमॅटिक १५.४० लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम, शहर राज्य, मॉडेलनुसार फरक) उपलब्ध आहे. एक्सयूव्ही ५०० डब्लू १० ऑटोमॅटिक मॉडेल ऑल व्हिल ड्राइव्हमध्ये उपलब्ध असून, क्रेस्टाच्या टू व्हिल ड्राइव्हच्या तुलनेत अडीच ते पावणेदोन लाख रुपयांनी स्वस्त आहे. हेक्सा फीचर, रायडिंग, स्पेस, किंमत याबाबतीत एक्सयूव्ही ५०० व क्रेस्टाला स्पर्धक नक्कीच आहे. पण टाटा मोटर्सच्या वाहनांना असणारी रिसेल व्हॅल्यू, इमेज नकारात्मक आहे. कमी बजेट असणाऱ्यांसाठी एक्सयूव्ही व क्रॉसओव्हरमध्ये हेक्साचा पर्याय खुला आहे. मात्र बजेट, रिसेल व्हॅल्यू व आफ्टर सेल्स यांचा विचार करूनच पर्याय निवडला पाहिजे.

ls.driveit@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2017 12:57 am

Web Title: tata hexa crysta xuv
Next Stories
1 टॉप गीअर : रॉयल एनफिल्ड बुलेट ब्रॅण्डचं वादळ
2 कोणती कार घेऊ?
3 हॅचबॅक की मिनी क्रॉसओव्हर?
Just Now!
X