05 July 2020

News Flash

टॉप गीअर : टीव्हीएसचा ‘व्हिक्टर’ नावाचा फिनिक्स

टीव्हीएस मोटर कंपनीच्या वाहनांचा पोर्टफोलिओ खूप मोठा आहे.

टीव्हीएस मोटर कंपनीच्या वाहनांचा पोर्टफोलिओ खूप मोठा आहे. यामध्ये मोपेड, स्कूटर, मोटरसायकल असा समावेश आहे. सुरुवातीस कंपनीने भारतात तंत्रज्ञान साहाय्यासाठी सुझुकीशी सहकार्य केले होते आणि त्यातूनच सुझुकी, शोगन, समुराय, शाउलिन (तशा अनेक पण गाजलेल्यांपकी ही उदाहरणे) या दुचाकी बाजारात आणल्या. टू स्ट्रोक असलेल्या या मोटरसायकलचा पिकअप, रायिडग क्वालिटी, विशिष्ट आवाज यामुळे स्वत:ची अशी ओळख निर्माण केली. नो प्रॉब्लेम बाइक, अशी जपानी व्यक्ती असलेली जाहिरातही अनेकांच्या लक्षात असेल. तसेच, आपल्यापकी काही जणांनी २००० च्या पूर्वी ही चालवलीही असेल. असो. पुढे जाऊन टीव्हीएस आणि सुझुकी या कंपन्या वेगवेगळ्या झाल्या. टीव्हीएस मोटर आता काय सादर करणार, त्यांच्याकडे कोणते तंत्रज्ञान आहे, अशी चर्चा झाली होती. त्याच वेळी टीव्हीएस मोटरने २००१ मध्ये व्हिक्टर ही पूर्णपणे भारतीय बनावटीची, संपूर्ण भारतात भारतीय तंत्रज्ञांनी विकसित केलेली व्हिक्टर मोटरसायकल बाजारात आणली. पाहताच क्षणी मनात भरेल, असे डिझाईन या मोटरसायकलचे होते. कंपनीने व्हिटर मोटरसायकलला ११० सीसीचे फोर स्ट्रोक इंजिन बसविले होते आणि यास कॅटॅलिटिक कन्व्हर्टर बसविला होता. देशात १०० सीसीच्या मोटरसायकलमध्ये पहिल्यांदा असे तंत्रज्ञान टीव्हीएसने आणले व यावरून तंत्रज्ञानाच्या बाबतीत टीव्हीएसने केलेला विचार अधोरेखित होते. टीव्हीएस व्हिक्टर बाजारात आली त्याच काळात देशातील दुचाकीच्या बाजारपेठेत मग ती १०० सीसी असो वा त्यापेक्षा अधिक सीसीची मोटरसायकल, मक्तेदारी होती ती तत्कालीन हिरो-होंडाच्या स्प्लेंडर मोटरसायकलची. त्यामुळेच टीव्हीएस मोटरने बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या मोटरसायकलमध्ये कोणत्या उणिवा आहेत, याचे बारकावे अभ्यासले होते. त्यामुळे मोटरसायकलचा हेडलाइट अधिक प्रखर असण्याबरोबरच त्यास पासिंग लाइटची (ओव्हरटेक करताना वापरायचा दिवा) सुविधा दिली होती. तसेच, इलेक्ट्रिक स्टार्ट, िस्वग आर्म, अधिक रुंद सीट, प्रति लिटर ७०-८० किमी मायलेज आणि याच जोडीला स्पर्धात्मक किंमत. तसेच, टीव्हीएस व्हिक्टरचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून मास्टरब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची नियुक्ती केली. याचाही फायदा टीव्हीएसला व्हिक्टरच्या बाबतीत झाला.

चांगले इंजिन, आरामदायी रचना आणि गुणवत्ता याच्या जोरावर व्हिटरने स्प्लेंडरला नक्कीच टक्कर दिली आणि स्वत:ची अशी बाजारपेठ व ओळख निर्माण केली. सुझुकीबरोबर असलेली भागीदारी संपुष्टात आल्यानंतर टीव्हीएसची यशस्वी झालेली ही पहिलीच मोटरसायकल. २००३ नंतर देशातील दुचाकींची बाजारपेठेत १२५ वा त्यापेक्षा अधिक सीसीच्या मोटरसायकलकडे मार्गक्रमण करू लागली होती. त्यामुळेच कंपनीने काळानुसार व्हिक्टरच्या मॉडेलमध्ये आणि इंजिनमध्ये बदल केले. त्यामुळेच कंपनीने व्हिक्टर जीएलएक्स १२५ व व्हिक्टर एज १२५ या मोटरसायकल बाजारात आणल्या. यामध्ये प्रामुख्याने झालेला बदल म्हणजे इंजिन सीसी वाढून १२५ झाली तसेच, चासीबरोबर डिझाईनमध्ये बदल झाला. कंपनीने या व्हर्जनला डिस्कब्रेक, मॅग व्हील दिले. मात्र, याच काळात बाजारपेठेत अन्य मोटरसायकलकडून मोठी स्पर्धा निर्माण झाली होती. तसेच, नव्या मॉडेलना बाजारपेठेतून अपेक्षित असा प्रतिसाद मिळेनासा झाला होता. त्यामुळे अखेरीस २००७ मध्ये कंपनीने व्हिक्टर या मोटरसायकलचे उत्पादनच बंद केले. मात्र, या निर्णयामुळे टीव्हीएसचे अनेक चाहते निराश झाले होते; पण व्यावसायिक युगात भावनेला किंमत नसते, हेच सत्य आहे. कम्युटर मोटरसायकलमध्ये ११० ते १२५ सीसी मोटरसायकलना असणारी मागणी लक्षात घेऊन टीव्हीस मोटरने पुन्हा एकदा व्हिक्टर मोटरसायकल २०१६ मध्ये भारतात लाँच केली. नव्या मोटरसायकलमध्ये खूप मोठे बदल करण्यात आले आहेत.

संपूर्ण आकर्षक, सेमी-स्पोर्ट्स डिझाईन, ब्लॅक ऑलॉय व्हील, डिजिटल कन्सोल, आरपीएम मीटर, डिस्कब्रेक, क्रिस्टल क्लिअर इंडिकेटर, नवा डिझाईन केलेला एक्झॉस्ट, थ्रीडी एब्लेम, इको-स्पोर्ट मोड, उत्तम रंगसंगतीबरोबर वापरण्यात आलेल्या मटेरिअलची गुणवत्ता चांगली आहे. त्यामुळे मोटरसायकलला एक प्रीमियम लुक आला आहे. मात्र, नव्या व्हिक्टरकडे पाहिल्यावर स्टार सिटी प्लस आभास होते आणि हीच केवळ एक उणीव वाटते. मात्र, ११० सीसी सेगमेंटमधील अन्य मोटरसायकलच्या तुलनेत लुक, फीचरबाबतीत नवी व्हिक्टर उजवी ठरते. ११० सीसी नवे इंजिन व्हायब्रेशन देत नाही. तसेच, क्रूिझग स्पीड म्हणजे ५० ते ५५ केएमपीएल उत्तम रायिडगचा अनुभव देतो. तसेच, प्रति लिटर ६० ते ७० मायलेज ११० सीसी सेगमेंटमध्ये उत्तम वाटते. ग्रिप चांगली मिळण्यासाठी विशिष्ट रचना केलेले टायर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे एकूणच नवी व्हिक्टर टीव्हीएसला पूर्वीसारखे यश देणार का हे येणारा काळच ठरवेल, कारण ११० सीसी मोटरसायकल सेगमेंटमध्ये तीव्र स्पर्धा असून, व्हिक्टरची स्पर्धा ही होंडा लिव्हो, पॅशन एक्सप्रो, पॅशन प्रो आदी मोटरसायकलशी आहे.

obhide@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2017 12:16 am

Web Title: tvs victor tvs motors
Next Stories
1 कोणती कार घेऊ?
2 हवीहवीशी हॅचबॅक
3 टॉप गीअर : मोटारसायकलच ब्रँड होतो तेव्हा..
Just Now!
X