16 December 2017

News Flash

टॉप गीअर : स्कूटरमधील व्हेस्पा नावाचे कलात्मक ग्लॅमर

मास मार्केटमधील स्पर्धा लक्षात घेऊन कंपनीने स्वत:ची बाजारपेठ निर्माण करण्याचा निर्णय घेतला.

ओंकार भिडे | Updated: June 30, 2017 1:31 AM

 

आपल्याकडे लाइफ स्टाइल रायिडग प्रचलित नाही. दुचाकी घ्यायची; पण ती कशासाठी घेत आहे, हे आपल्याकडे अनेकांना उमगलेलं नसतं. त्यामुळे लाइफ स्टाइल दुचाकी मग ती मोटरसायकल असो वा स्कूटर या कम्युटिंगसाठी म्हणजेच रोज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी (मोबिलिटी) म्हणून वापरली जाते. काही जण लाइफ स्टाइल स्टेटमेंट म्हणून घेतात ही. मात्र, ती दुचाकी नेऊन सामायिक पाìकगमध्येच लावली जाते. यामुळेच ती अनेक दुचाकींपकी एक दुचाकी होते. वास्तविक पाहता लाइफ स्टाइल सेगमेंटमधील दुचाकी ही खरंच उच्च जीवनशैलीचं एक प्रतीक मानलं जातं. त्यामुळेच अशा दुचाकींसाठी कंपन्या या दणकून पसे घेतात. कारण यात प्रीमियम फॅक्टर अधिक असतो. लाइफ स्टाइल सेगमेंटमध्ये सध्या भारतात मोटरसायकलमध्ये पर्याय अनेक आहेत. त्या तुलनेत स्कूटरमध्ये अत्यल्प पर्याय वा पर्यायच नाहीत, असे म्हणावे लागेल. होंडा, हीरोमोटो कॉर्प, टीव्हीएस, सुझुकी या कंपन्यांच्या अनेक ऑटोमॅटिक स्कूटर बाजारात उपलब्ध आहेत. यात अगदी ८० सीसीपासून ते १२५ सीसीपर्यंतचा पर्याय आहे आणि त्यांच्या किमती पन्नास हजार रुपये ते अगदी ७५ हजार रुपयांपर्यंत आहेत. पण या कंपन्यांकडून विकल्या जाणाऱ्या सर्व ऑटोमॅटिक स्कूटर या मास मार्केट दुचाकी आहेत. त्यामुळेच अशा सेगमेंटमधील पोकळी नक्कीच आश्वासक होती. कारण २००८ नंतर देशातील दुचाकी बाजारपेठ आमूलाग्र बदलली. तसेच, महिला या कामानिमित्त, व्यवसायासाठी बाहेर पडण्याचं प्रमाण वाढलं, क्रयशक्ती सुधारली अन् शहरातील वाढती ट्रॅफिक बघून ग्राहक पुन्हा स्कूटरकडे (ऑटोमॅटिक) वळले. त्यामुळेच भारतीय बाजारपेठेत बजाज ऑटो आणि नंतर एलएमएलबरोबर स्कूटरची विक्री करणाऱ्या पियाज्यो या इटालियन कंपनीने भारतात स्कूटर लाँच करण्याचा निर्णय घेतला. (याचा उल्लेख आपण मागील लेखात पाहिला.)

मास मार्केटमधील स्पर्धा लक्षात घेऊन कंपनीने स्वत:ची बाजारपेठ निर्माण करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीत फेब्रुवारी २०१२ मध्ये झालेल्या ऑटो एक्स्पोत व्हेस्पा स्कूटरची पहिली झलक पाहायला मिळाली. व्हेस्पा या ऑटोमॅटिक स्कूटरची १२५ सीसी व १५० सीसीची प्रत्येकी तीन व्हर्जन बाजारात आहेत (अजूनही एक स्कूटर व्हेस्पा ९४६ उपलब्ध आहे. मात्र, तिची किंमत काही लाख रुपयांत आहे.) अन्य ऑटोमॅटिक स्कूटरप्रमाणेच दिसणारी स्कूटर, असं आपण म्हणू शकतो. प्रत्यक्षात या स्कूटरमध्ये बऱ्याच गोष्टी वेगळ्या आहेत. कंपनीने व्हेस्पा लाँच करताना अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यामुळे पूर्वीच्या व्हेस्पा स्कूटरशी मिळतीजुळती, रेट्रो लुक असणारी नवी ऑटोमॅटिक व्हेस्पा आहे. या स्कूटरची फ्रेम ही पूर्ण मेटॅलिक असून, एकसंध आहे. अशी बॉडी पूर्वीच्या गिअर्ड स्कूटरना होती. संपूर्ण मेटल बॉडी असल्याने यावर रंगकामही उत्तम करता येतं. त्यामुळेच यावरील रंगकाम उच्च दर्जाचं असून, स्कूटर उठावदार दिसते. स्कूटरमध्ये क्रोमचा पुरेपूर वार करण्यात आला आहे. त्यामुळेच हेड लॅम्प सर्कल, मोनोग्राम, हँडलबार, गार्ड, मिरर, टॅल लॅम्प यांना क्रोम फििनग आहे आणि यामुळे स्कूटरच्या लुकमध्ये चांगला फरक दिसतो. पुढील फूट रेस्ट फ्लॅट बॉटम नसून, पूर्वीच्या स्कूटरसारखं आहे. इन्स्ट्रमेंट क्लस्टर डिजिटल व अ‍ॅनॅलॉग असून, यात फ्यूएल गॅग, ट्रिप मीटर दिला आहे. व्हेस्पा १२५ सीसी व १५० सीसी व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. कंपनीला सत्तर वष्रे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अ‍ॅनिव्हर्सरी एडिशन लाँच करण्यात आली. या मॉडेलवर ७० आकडा क्रोममध्ये लिहिला आहे. व्हेस्पा व्हीएक्सएलला १५० सीसीचं तीन व्हॅल्व्हचं सिंगल सििलडरचं इंजिन असून, ११ बीएचपी व ११ एनएम टॉर्क मिळतो. सध्या तरी ही सर्वात ताकदीची स्कूटर म्हणायला हरकत नाही. स्कूटरचं फील महत्त्वाचा असल्यानं मायलेजकड दुर्लक्ष करता येऊ शकतं. ही स्कूटरला प्रति लिटर ३५ किमी मायलेज मिळू शकतं. स्कूटरला पुढील बाजूस सिंगल साइड ट्रेिलग िलक सस्पेन्शन दिलं असून, अँटी डाइव्ह सिस्टिममुळे ब्रेक दाबल्यावर चाक एकदम पकड सोडत नाही. पण, टेलिस्कोपिक सस्पेन्शन नक्कीच चांगला असतं आणि ते यामध्ये नाही. अलॉय व्हिल, डिस्क्रब्रेकचा पर्याय यामध्ये दिला आहे. सिटी ट्रॅफिकमध्ये एक चांगला अनुभव मिळतो. अर्थात, कंपनीने केलेल्या ब्रँिडगनुसार व्हेस्पा ही डेली कम्युटिंग स्कूटर नाही. वीकेंड पार्टी, लेजर रायिडगसाठी ही स्कूटर आहे. या स्कूटरकडे कलात्मक दृष्टीने पाहिलं जातं. त्यामुळेच लोकांना आपल्याकडे पाहवा, थोडं हटके आपल्याकडे असावं, असा विचार करणाऱ्यांनी नक्कीच व्हेस्पाचा विचार करायला हरकत नाही. पण त्यासाठी मोजावी लागणारी रक्कम विचारात घेतलेली बरी.

obhide@gmail.com

First Published on June 30, 2017 1:31 am

Web Title: vespa scooter