सर, माझे बजेट १५ लाख आहे. मी प्रथमच कार घेत असल्याने कोणती कार घेणे माझ्यासाठी फायदेशीर ठरेल?

हर्षल लवांगे

तुम्ही नक्कीच पेट्रोल एसयूव्ही क्रेटा घ्यावी. ही एक उत्तम ठरलेली कंफर्ट लक्झरी कार आहे. सेडान हवी असेल तर मात्र टोयोटा कोरोला अल्टीस घ्यावी.

माझे बजेट ७ लाख रुपये आहे. प्रवास जास्त नाही. कुटुंबासाठी कार घ्यायची असल्याने एक आरामदायक आणि दमदार असणारी कार हवी आहे. कृपया पर्याय सुचवा.

अनुप सावरकर

तुम्ही मारुती वॅगनार आर घ्यावी. ही चार लोकांसाठी आरामदायी आणि उंच अशी गाडी असल्यामुळे उतरा-चढायला सोपी अशी गाडी आहे.

माझे बजेट सात लाखांपर्यंत आहे आणि माझा मासिक प्रवास जवळपास ५०० किमी आहे. माझ्यासाठी कोणती गाडी चांगली ठरेल. रेनॉ क्विड कारबाबत काय वाटते?

महेश गायकवाड

तुमचा मासिक प्रवास कमी असल्याने मी तुम्हाला अल्टो के१० सुचवू शकतो. ती चार लाखांमध्ये उपलब्ध आहे. जर तुमचे बजेट यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही निश्चितच टाटा टिआगो घ्या. रेनॉ क्विडही उत्तम कार असून अधिक वाहतूक असलेल्या ठिकाणी तीचा फायदा होऊ शकतो.

माझे बजेट दीड ते दोन लाख रुपये आहे. मला ही कार प्रवासी कार म्हणून वापरायची आहे. त्यामुळे माझ्या व्यवसायास मदत होईल अशी कार सुचवा.

मुंजाजी साबळे

तुम्ही सेकंड हँड आय १० घ्यावी. ती देखरेखीसाठी उत्कृष्ट आणि विश्वासार्ह आहे. तुम्ही सीएनजी किंवा एलपीजी फिट करू शकता.

मी प्रथमच गाडी विकत घेणार आहे. माझे बजेट ८ ते ९ लाख रुपये आहे. अधिक सस्पेंशन आणि अधिक मायलेज देणारी कार मला हवी आहे. माझा मासिक प्रवास ६०० किमी आहे. कृपया माहिती द्या.

प्रवीण शेळके

तुमचा प्रवास कमी असल्याने मी तुम्हाला पेट्रोल कारचा पर्याय सुचवू शकतो. ह्युदाई, फोक्सवॅगन आणि फोर्ड या कंपन्यांच्या कारचे सस्पेंशन अधिक चांगले आहे. तुम्ही क्रेटा किंवा फोर्ड इकोस्पोर्ट पेट्रोलचा पर्याय निवडू शकता.

या सदरासाठी प्रश्न पाठवा :  ls.driveit@gmail.com