14 December 2017

News Flash

कोणती कार घेऊ?

स्पेशियस अशी योग्य गाडी म्हणजे डॅटसन गो.

समीर ओक | Updated: April 21, 2017 12:16 AM

वाहनमालक घरबसल्या इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या वाहनाची नोंदणी करू शकेल

 

मासिक ड्रायव्हिंग ६०० किमी असून बजेट साडेतीन लाख रुपये आहे. माझी उंची सहा फूट असून मला सुरक्षितता, आराम, कमी मेन्टेनन्स आदी गुणवैशिष्टय़े असलेली कार घ्यायची आहे. कृपया वेगवेगळ्या कार सुचवा.

अमोल इंगळे

तुम्हाला स्पेशियस अशी योग्य गाडी म्हणजे डॅटसन गो. ती तुम्हाला साडेतीन लाखांत मिळू शकेल. आणि तुमच्या उंचीसाठी योग्य अशी ही कार आहे. बजेट थोडे वाढवले तर त्याच मॉडेलमध्ये तुम्हाला एअरबॅग्जही मिळतील.

मी प्रथमच कार घेणार आहे. माझा रोजचा प्रवास ३५ ते ४० किमी आहे आणि दोन महिन्यांतून एकदा तरी मी माझ्या गावी जातो, जे ४०० ४५० किमी लांब आहे. माझी उंची पाच फूट ९ इंच आहे. मी कोणती गाडी घेऊ, नवी की जुनी? त्याचे फायदे-तोटे काय? कमी मेन्टेनन्स असणाऱ्या गाडीच्या मी शोधात आहे. 

शिवानंद एकतपुरे,

चार-पाच वष्रे जुनी असलेली स्विफ्ट कार तुमच्यासाठी योग्य आहे. सीएनजीऐवजी तुम्ही डिझेल कार वापरा. मात्र, तुम्हाला नवीकोरीच गाडी घ्यायची असेल तर सेलेरिओ सीएनजी हा सर्वोत्तम पर्याय आहे. मी तुम्हाला सेलेरिओ सीएनजी ही गाडी सुचवेन. तिला मायलेज चांगला आहे आणि मेन्टेनन्सही कमी आहे.

सर मी पहिल्यांदा गाडी घेत आहे. मला टाटाची टियागो गाडी आवडते. माझे बजेट साडेचार लाख रुपये आहे. कृपया मार्गदर्शन करा.

नरेंद्र देशपांडे

तुमची निवड सर्वोत्तम आहे. टाटा टियागो पेट्रोल एक्सई हे मॉडेल तुम्ही घेऊ शकता. त्यात ड्रायव्हर एअरबॅग आहे. बजेट थोडे वाढवले तर एबीएस घेता येईल. ते आवश्यक आहे. मायलेज बाकी लहान गाडय़ांपेक्षा जरा कमी आहे; परंतु गाडी पॉवरबाज आहे.

माझे बजेट तीन ते चार लाख रुपये आहे. माझा गाडीचा वापर प्रतिमहा ७०० ते ८०० किमी असेल. वर्षांतून एकदा लाँग ड्राइव्ह असेल. मला ऑटोमॅटिक तसेच मॅन्युअल ट्रान्समिशनची सोय असलेली गाडी हवी आहे. तुम्ही कोणती गाडी सुचवाल? सेकंड हँड गाडी घ्यावी का?

कौस्तुभ कुलकर्णी

तुमचा वापर जर ७००-८०० किमी प्रतिमहा असेल तर तुम्ही नवीन गाडी घेणेच योग्य ठरेल. ऑटोमॅटिक ऑप्शनमध्ये तुम्ही मिनिमम अल्टो के१० घेऊ शकता. तिची किंमत साडेचार लाख रुपये आहे.

या सदरासाठी प्रश्न पाठवा :  ls.driveit@gmail.com

First Published on April 21, 2017 12:16 am

Web Title: which car to buy 34