18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

कोणती कार घेऊ?

मोठी एसयूव्ही हवी असेल तर टीयूव्ही ३०० हा एक चांगला पर्याय आहे.

समीर ओक | Updated: June 16, 2017 1:28 AM

 

मला कॉम्पॅक्ट सेडान कार घ्यायची आहे. जी शहरात आणि हायवेलाही उत्तम असेल. चांगले सेफ्टी फीचर्सही तिच्यात असायला हवेत. मला झेस्ट, स्विफ्ट डिझायर आणि होंडा अमेझ या तीनही गाडय़ा आवडतात. परंतु नेमकी कोणती घ्यावी, याविषयी गोंधळ आहे. कृपया मला योग्य गाडी सुचवावी.

विलास  दोरुगडे

तुम्हाला मोठी एसयूव्ही हवी असेल तर टीयूव्ही ३०० हा एक चांगला पर्याय आहे. परंतु तुम्हाला सेडानच घ्यायची असेल तर फोक्सवॅगन अ‍ॅमिओ टीडीआय हा उत्तम पर्याय आहे.

 

मी प्रथमच गाडी विकत घेणार आहे. माझे बजेट साधारण पाच ते सात लाख रुपये आहे. कृपया मला चांगली गाडी सुचवा.

राणा शिंगाडे, सिन्नर

तुमच्या एकंदर बजेटनुसार तुमच्यासाठी टाटा झेस्ट ही गाडी तुम्हाला योग्य ठरेल. हिचे रिअर सीट अगदी आरामदायी आहे तसेच ड्रायव्हिंग केबिनही सायलेंट आहे आणि व्हायब्रेशन्स कमी जाणवतात.

 

नवीन घेतलेल्या गाडीत स्थानिक दुकानांतून विकत घेतलेल्या इलेक्ट्रिकल अ‍ॅक्सेसरीज लावल्या तर त्यामुळे कारच्या वॉरंटीमध्ये काही फरक पडू शकतो का.

ओमकार दिवे

होय, परंतु पूर्ण वॉरंटी जात नाही फक्त इलेक्ट्रिकल कॉम्पोनन्ट्सची वॉरंटी बाद होते. परंतु साध्या म्युझिक सिस्टीम लावण्याने काही होत नाही. पण जर तुम्ही जास्त व्ॉटचे हॅलोजन लावत असाल तर बॅटरी, सर्किटवर ताण येतो.

 

माझा रोजचा प्रवास ४४ किमीचा आहे. त्यात ४० किमी हायवे आहे. मला कमी मेन्टेनन्स आणि चांगला मायलेज असलेली गाडी हवी आहे. टियागो, क्विड, अल्टो आणि ग्रँड आय१० यांपकी कोणती गाडी घ्यावी.

श्रीराम जानकर.

तुमच्या ड्रायिव्हगचा प्रकार पाहता मी तुम्हाला फोर्ड फिगो १.५ डिझेल ही गाडी सुचवेन. हिचे इंजिन ताकदवान तर आहेच शिवाय हिचा मायलेजही प्रतिलिटर २४ किमी एवढा आहे. तुम्ही याच गाडीला प्राधान्य द्या.

 

मला रोजच्या वापरासाठी ऑटोमॅटिक गीअरवर चालणारी गाडी घ्यायची आहे. माझा रोजचा प्रवास किमान ३५ किमीचा आहे. माझ्या घरातील सगळेच सदस्य सहा फूट उंचीचे आहेत. त्यामुळे गाडी उंच हवी. बजेट साधारणत: ९ ते १० लाख रुपये आहे.

मयेकर

तुम्ही स्विफ्ट डिझायर झेडडीआय ही ऑटोमॅटिक गाडी घ्यावी. तुम्हाला ही गाडी साडेनऊ लाखांत मिळू शकते. डिझेलवर चालणारी असल्याने या गाडीचे मायलेजही चांगले आहे.

या सदरासाठी प्रश्न पाठवा :  ls.driveit@gmail.com

First Published on June 16, 2017 1:28 am

Web Title: which car to buy car advice