माझे बजेट आठ ते १० लाख आहे. किमान आठ व्यक्ती बसू शकतील अशी गाडी सुचवा. खूप मोठी दिसणारी नसावी. 

प्रशांत कांबळे

८ ते १० लाखांत तुम्हाला रेनॉ लॉजी घेणे उत्तम ठरेल. पण त्याहीपेक्षा आरामदायी गाडी हवी असेल तर तुम्ही महिंद्रा बोलोरो एक्सएल घ्यावी.

सर मी नव्यानेच गाडी शिकलो आहे. मला गाडी घ्यायची आहे. नवीनमध्ये वॅगन आर, सेलेरियो, टिआगो किंवा क्विड कशी आहे. माझा गाडीचा वापर खूपच कमी असेल. तो जवळपास अथवा कधी तरी बाहेर फिरायला हायवेवर जाण्यासाठी होईल. तसेच वापर कमी असल्याने मी सेकंडहॅण्ड गाडीचाही विचार करतोय. कृपया मार्गदर्शन करा.

नितेश भोईर, विरार

तुम्ही सेकंड हॅण्ड इऑन किंवा आय-१० घ्यावी. या गाडय़ा भक्कम आहेत. नवीन घ्यायचीच असेल तर वॅगनआर घ्यावी.

माझा रोजचा प्रवास ८० किमी असून, त्यातील १५ किमी हा खडय़ांचा व साधारण २ फूट ओहळातील पाण्याचा आहे. तरी मला कुटुंबासह सामानाची वाहतूक आरामदायक करता येईल अशी कार सुचवा. बजेट १८ ते २० लाख या दरम्यान आहे.

कार्तिकेश सावंत.

तुम्ही जीपची कंपास घ्यावी. हिच्यातील डिझेल चार बाय चारचे मॉडेल तुम्हाला २० लाखात मिळू शकेल. सध्या तरी हाच सर्वोत्तम पर्याय आहे.

माझा मासिक प्रवास हा जवळपास २०३० किमी असून, शहरात आणि हायवेवर तो १ हजार किमी आहे. माझे बजेट १० ते ११ लाख रुपये आहे. कमी मेन्टेनन्स, उत्तम मायलेज आणि आरामदायक असणारी कार सुचवा. टाटा नेक्सॉन, इकोस्पोर्ट, ब्रेझ्झा, होंडा कार पाहात आहे. कृपया मार्गदर्शन करा.

सचिन जाधववर

मी तुम्हाला फोर्ड इकोस्पोर्ट घेण्याविषयी सुचवेन. ती सर्व रस्त्यांवर मजबूत चालते. आणि चांगले मायलेजही देते. ही भक्कम कार असून, तिला चांगली क्वालिटी आहे.

या सदरासाठी प्रश्न पाठवा :  ls.driveit@gmail.com