मला सेकंड हँड कार घ्यायची आहे. माझे बजेट तीन लाख रुपये आहे. मला एअरबॅग्ज असलेली कार घ्यायची आहे. कृपया मार्गदर्शन करा.

उमेश जंबुरे

तुम्ही सेकंड हँडमध्ये किमान आठ वर्ष वापरलेली होंडा सिटी कार घेऊ शकाल. झेडएक्सआय व्हर्जनमध्ये एअरबॅग्ज असलेली कार तुम्हाला मिळू शकेल.

माझ्या घरात एकूण दहा माणसे आहेत. आम्हाला एक कार घ्यायची असून अमचे बजेट दहा लाख रुपये आहे. मायलेजच्या दृष्टीने कोणती गाडी चांगली ठरेल.

सुनील थोरवे

तुम्हाला दहा लाखांत रेनॉ लॉजी ही आठ आसनी गाडी घेता येईल. मात्र, त्यात तुमचे संपूर्ण कुटुंब बसू शकेल. ती तुम्ही डिझेल व्हर्जनमधील घ्यावी. तिच्या इंजिनाचा परफॉर्मन्स उत्तम आहे आणि मायलेजही चांगला मिळतो.

माझ्याकडे सध्या आय१० ही गाडी आहे. गेल्या सात वर्षांपासून ती मी वापरतो आहे. आता मला नवीन कार घ्यायची आहे. माझा गाडीचा रोजचा वापर थोडाच आहे परंतु महिन्यातून एकदा मी ४००-५०० किमी फिरायला जातो. माझे बजेट दहा लाखांच्या आत आहे. मला इटिऑस पेट्रोल गाडीबद्दल सांगा.

प्रसाद धर्म, उस्मानाबाद

तुम्ही मारुती सिआझचे पेट्रोल व्हर्जन घेऊ शकता. ती तुम्हाला नऊ लाखांपर्यंत मिळू शकेल. दहा लाखांच्या आतील ही एक सर्वोत्तम कार आहे. तुम्हाला एसयूव्ही हवी असेल तर ह्य़ुंडाईची क्रेटा उत्तम आहे. परंतु तिचा मायलेज कमी आहे.

माझे बजेट फक्त पाच लाखांचे आहे. मला गाडी घ्यायची असून मला मार्गदर्शन हवे आहे.

मनोज डोहाले

तुम्ही सेलेरिओ ही गाडी घ्यावी. ती तुमच्यासाठी उत्तम ठरेल.

ऑटोमॅटिक कारमध्ये कोणती गाडी सर्वोत्तम आहे. सात लाखांचे माझे बजेट आहे. ऑटोमॅटिक आणि गीअर गाडय़ांमध्ये अ‍ॅव्हरेजचा फरक काय असतो. मला माझ्या बजेटमध्ये सेडान मिळू शकेल का.

अतुल कुलकर्णी

तुम्ही साडेसहा लाखांत मारुती इग्निस अथवा डिझायर या ऑटोमॅटिक गाडय़ा मिळवू शकता.

या सदरासाठी प्रश्न पाठवा :  ls.driveit@gmail.com