12 December 2017

News Flash

कोणती कार घेऊ?

मारुती बलेनो महाग असली तरी हीच गाडी घेणे योग्य ठरेल.

समीर ओक | Updated: July 21, 2017 2:00 AM

सर, माझे मासिक ड्रायव्हिंग २०० किमी आहे. सहा महिन्यांत दोनदा सहलीला जातो. माझे बजेट पाच ते सहा लाख रुपये आहे. मला इग्निस व केयूव्ही१०० गाडय़ा आवडल्या आहेत. यांपैकी कोणती गाडी घेणे योग्य ठरेल. कमी मेन्टेनन्स असलेली आरामदायी गाडी सुचवा.

कौशिक सरदेसाई

तुम्ही चार ते पाच लाखांत डिझेल गाडी मिळणे कठीण आहे. तुम्ही डिझेलमध्ये टाटा टियागो घ्यावी. तिची किमान किंमत साडेसहा लाख रुपये आहे. हल्ली शेवर्ले एन्जॉय सात लाखांत मिळत आहे. ती घ्या.

मारुती बलेनो डेल्टा १.२ ऑटोमॅटिक आणि टाटा टियागो १.२ रिव्हट्रॉन एक्सझेडए ऑटोमॅटिक यांपैकी कोणती गाडी घेणे योग्य ठरेल.

कृष्णकांत, पुणे

मारुती बलेनो महाग असली तरी हीच गाडी घेणे योग्य ठरेल. त्यात सीव्हीटी ट्रान्समिशन आहे, ज्यात उत्तम अ‍ॅक्सिलरेशन आणि स्मूथ पिकअप मिळेल. क्वालिटी आणि मेन्टेनन्सच्या दृष्टीने हीच गाडी घ्यावी.

मी सरकारी नोकर असून मला माझ्या कुटुंबासाठी कार घ्यायची आहे. माझे बजेट पाच ते सहा लाख रुपये आहे. मारुती सेलेरिओ किंवा अल्टो के१० बद्दल काय मत आहे.

प्रवीण शिरांबेकर

तुम्ही ह्य़ुंडाई ग्रँड आय१० ही गाडी घ्या. महामार्गावर चालवण्यासाठी ही गाडी उत्तम आहे. तसेच सर्व मारुती गाडय़ांपेक्षा ही गाडी सर्वोत्तम आहे.

माझ्या गाडीचा मायलेज दरमहा एक हजार किमीपेक्षा जास्त आहे. माझ्याकडे सध्या सँट्रो कार आहे. कामानिमित्ताने खूप फिरणे होते. माझी गाडी सेकंड हँड आहे. पाच-सहा लाखांत कोणती पेट्रोल गाडी घेणे योग्य ठरेल.

अमृता मोहोळे

तुम्ही फोर्ड फिगो १.५ टीडीसीआय ही गाडी घ्यावी. उत्तम कार असून तिचा मायलेजही चांगला आहे. २३ किमी प्रतिलिटर एवढा मायलेज देते ही गाडी. मेन्टेनन्सही खूप कमी आहे.

या सदरासाठी प्रश्न पाठवा :  ls.driveit@gmail.com

First Published on July 21, 2017 2:00 am

Web Title: which car to buy car buying advice 3