14 December 2017

News Flash

कोणती कार घेऊ?

टाटा बोल्ट ही उत्तम आणि प्रशस्त गाडी आहे. मात्र पेट्रोलला मायलेज जरा कमी आहे.

समीर ओक | Updated: September 15, 2017 1:53 AM

मी आपले सदर नियमित वाचतो. मला टाटा बोल्ट पेट्रोल एक्सई घ्यायची इच्छा आहे. माझा मासिक प्रवास ४०० ते ५०० किमी दरम्यान आहे. बजेट जास्त नाही. कोणती गाडी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करा.

अविनाश कुलकर्णी, जळगाव

टाटा बोल्ट ही उत्तम आणि प्रशस्त गाडी आहे. मात्र पेट्रोलला मायलेज जरा कमी आहे. तुमचा प्रवास एवढा कमी असेल तर मात्र तुम्ही मारुती स्विफ्ट घेतलेली उत्तम.

माझे बजेट ४ ते ५ लाख रुपये आहे. मला अशी गाडी हवी आहे, ज्यामध्ये ३ लोक आरामात बसू शकतात. तर नवीन गाडी घ्यायची असेल तर कोणती घेऊ अथवा जुनी गाडी घ्यायची असेल तर कोणता पर्याय आहे?

स्वप्निल तोरसकर

नवीन गाडीमध्ये तुम्ही टाटा टिआगो डिझेल घ्यावी. यामध्ये उत्तम जागा आणि कम्फर्ट आहे आणि किंमतही कमी आहे. मायलेजसुद्धा २४ असल्याने तुमच्यासाठी ती योग्य राहील.

माझे बजेट ८ लाख असून, महिन्याचा प्रवास १ हजार किमी आहे. तो ग्रामीण भागामध्ये आहे. ग्रामीण भागात उत्तम चालणारी कोणती कार मी घेऊ याबाबत कृपया मार्गदर्शन करा.

पुरुषोत्तम पऱ्हाड

तुम्ही डिझेल फोर्ड फिगो घ्यावी. तिला अतिशय शक्तिशाली इंजिन आहे आणि मायलेज आणि सव्‍‌र्हिसही उत्तम आहे. ऑटोमॅटिक डिझेल हवी असेल तर मारुती डिझायर घ्यावी.

या सदरासाठी प्रश्न पाठवा :  ls.driveit@gmail.com

First Published on September 15, 2017 1:53 am

Web Title: which car to buy car buying advice 5