12 December 2017

News Flash

कोणती कार घेऊ?

सद्य:स्थितीत टाटा टियागोचे पेट्रोल मॉडेल सर्वात चांगले आहे.

समीर ओक | Updated: August 4, 2017 12:55 AM

मला माझ्या कुटुंबासाठी कार घ्यायची आहे, परंतु माझा जरा गोंधळ होतोय. माझे बजेट चार ते पाच लाखांचे आहे. मी वॅगनआर, टियागो आणि डॅटसन गो या गाडय़ा पाहिल्या आहेत. यापकी कोणती कार मला जास्त योग्य ठरेल किंवा तुम्ही तुमचा पर्याय सुचवा.

सुदेश वेंगुर्लेकर

सद्य:स्थितीत टाटा टियागोचे पेट्रोल मॉडेल सर्वात चांगले आहे. हीच गाडी घ्या. हिची किंमतही कमी आहे. गाडी स्टर्डी आहे. आतील रचना चांगली आहे. शिवाय इतर छोटय़ा हॅचबॅक्सच्या तुलनेत हिच्यातील सुरक्षेचे फीचर्स चांगले आहेत. तसेच टियागोचे रिव्हट्रॉन १.२ इंजिन ताकदवान आहे.

मला ग्रामीण भागांतून प्रवास करावा लागतो. दररोज ६० किमीचा प्रवास आहे. माझे बजेट पाच लाखांपर्यंत आहे. कृपया चांगली मायलेज देणारी कार सुचवा.

बी. टी. वायाळ

तुम्ही मारुती इग्निस ही गाडी घ्यावी. ती उत्तम पॉवरची गाडी आहे आणि ग्रामीण भागांत उत्तम सव्‍‌र्हिसही मिळेल. सामानाची ने-आण करायची असेल तर मारुती ईको ही गाडी घ्यावी.

मला कार घ्यायची आहे. मला गाडी येत नाही. मी ऑटो गीअर गाडी घ्यावी की गीअरवाली. कृपया मार्गदर्शन करा.

ऋचा चिकोडे

तुम्हाला जुनी आय१० ऑटोमॅटिक ही गाडी दोन-सव्वादोन लाखांत मिळू शकेल. या गाडीची पॉवरही उत्तम आहे. परंतु मायलेज १२ किमी एवढाच आहे. रनिंग कमी असेल तर गाडी घ्यावी.

माझे बजेट पाच ते सात लाख रुपये आहे. मी होंडा जॅझ घेण्याचा विचार करू शकतो का? पेट्रोल की डिझेल, कोणती गाडी घ्यावी.

संजय घाटगे

मी तुम्हाला पेट्रोलवर चालणारी जॅझ किंवा नवीन बलेनो घेण्याचा सल्ला देईन. दोन्ही गाडय़ा चांगल्या आहेत. मात्र प्रीमियम हॅचबॅकमध्ये जॅझ ही सर्वोत्तम गाडी आहे.

सर, सेकंड हॅण्ड होंडा सिटीबद्दल माहिती द्यावी. माझे ड्रायव्हिंग जास्त नाही. किती रनिंग झालेली होंडा सिटी घ्यावी, हे सांगा.

प्रशांत सूर्यवंशी

तुम्ही निश्चितच वापरलेली होंडा सिटी घेऊ शकता. परंतु तिची सव्‍‌र्हिसिंग वेळच्या वेळी झाली की नाही हे सव्‍‌र्हिस सेंटरमध्ये नीट चौकशी करून घ्यावे. तुम्ही सात-आठ वर्षे आणि ७० ते ८० हजार किमी चाललेली गाडी घेऊ शकता. काही अडचण नाही.

या सदरासाठी प्रश्न पाठवा :  ls.driveit@gmail.com

First Published on August 4, 2017 12:55 am

Web Title: which car to buy car buying guide