15 December 2017

News Flash

टॉप गीअर : यामाहा फसिनो; फॅशन स्कूटरचा पर्याय

डिझायनर वा रेट्रो लूक असणारी स्कूटर घेण्याची इच्छा असलेली व्यक्ती ही स्कूटर बजेट वाढत

ओंकार भिडे | Updated: July 7, 2017 1:00 AM

 

 

देशातील स्कूटरची बाजारपेठ वाढत आहे. त्यामुळेच या सेगमेंटकडे दुर्लक्ष करून चालणार नसल्याने परकी कंपन्याही ऑटोमॅटिक स्कूटरवर लक्ष केंद्रित करीत आहेत. आपल्याकडे पारंपरिक डिझाईनच्या स्कूटर होंडा, हिरोमोटोकॉर्प, टीव्हीएस यांच्याकडून विकल्या जातात. या स्कूटरचे डिझाईन डिझाईनर वा रेट्रो लूक असणारे नाही. रेट्रो लूक वा डिझाईनर लूक असणारी स्कूटर घ्यायची झाल्यास सर्वाधिक पर्याय पियाज्योच्या व्हेस्पा या स्कूटरमध्ये आहे. मात्र, ही स्कूटर अन्य स्कूटरच्या तुलनेत महाग आहे. त्यामुळेच डिझायनर वा रेट्रो लूक असणारी स्कूटर घेण्याची इच्छा असलेली व्यक्ती ही स्कूटर बजेट वाढत असल्याने घेईलच, असे नाही. मात्र, लोकांना जरा हटके वा रेट्रो व नव्या लूकचा मेळ घातलेली स्कूटर घेणे आवडत आहे. तशी यामाहा ही मोटरसायकल त्यातही हायएंड मोटरसायकलसाठी ओळखली जाणारी कंपनी आहे. मात्र, ही कंपनी स्कूटर सेगमेंटमध्ये आपले नशीब अजमावत आहे. त्यामुळेच यामाहा या कंपनीने स्कूटर सेगमेंटमध्ये तीन ते चार स्कूटर लाँच केलेल्या आहेत. यातील प्रत्येक स्कूटर ही विशिष्ट ग्राहक व किंमत डोळ्यापुढे ठेवून तयार केली आहे, पण बाजारपेठेत (ऑटोमॅटिक स्कूटर) आपले स्थान निर्माण करण्यासाठी कंपनीने नव्या व जुन्या डिझाईनचा मेळ घालत फसीनो ही ऑटोमॅटिक स्कूटर दोन वर्षांपूर्वी बाजारात लाँच केली. या वर्षी एप्रिलमध्ये पर्यावरणाचे नवे मानक लागू झाल्यावर बीएसआयव्ही फोर असणारी फसिनो डय़ूएल टोनमध्येही उपलब्ध करून दिली आहे.

कंपनीने फसिनो लाँच करताना तिला डिझायनर लूक असला तरी ती ग्राहकांच्या बजेटमध्ये कशी राहील, याची काळजी घेतली आहे. त्यामुळेच यामध्ये अधिकाधिक फायबरचा वापर केला असला तरीही स्कूटर आकर्षक आहे. फसिनोला रेट्रो लूक देताना त्यात एकसंधता कशी राहील यावर भर दिला आहे. तसेच, हेडलाइटला क्रोम फिनििशग दिले असून, डिझाईन त्रिकोणी आकार दिला आहे आणि हा लूक लक्षवेधक आहे. आरशांनाही क्रोम फिनििशग देण्यात आले आहे. स्कूटरची पुढील बाजू ही अन्य स्कूटरच्या डिझाईनपेक्षा वेगळी असल्याचे जाणवते. तसेच,  स्कूटरवर बसल्यावर सर्वप्रथम लक्ष जाते ते इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर. अर्थात, ते डिजिटल नसले तरी ते आकर्षक आहे. यामध्ये फ्यूएल गॅग, स्पीडोमीटर आहे. स्कूटरचे रिअर डिझाईनही वेगळे असून, ग्रॅब रेल आकर्षक आहे. मागील बाजूसही क्रोमचा वापर करण्यात आलेला आहे. तसेच, स्कूटरचा एक्झॉस्टही स्टायलिश दिला आहे. त्यामुळे या स्कूटरचे रियर डिझाईनही हटके आहे.

रेट्रो लूक असणारी व्हेस्पा ही १२५ सीसी असली तरी यामाहाने फसिनोला ११३ सीसीचे सिंगल सििलडरचे इंजिन बसविले आहे. हे इंजिन यामाहाच्या अन्य स्कूटरनाही बसविण्यात आले आहे. मात्र, हे इंजिन अन्य केवळ ७.१ पीएस पॉवर निर्माण करते. ऑटोमॅटिक स्कूटर असल्याने प्रति लिटर अधिकाधिक मायलेज कसे मिळेल, यावर कंपनीने लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळेच प्रति लिटर ६६ किमी मायलेज देते असा कंपनीचा दावा आहे. अर्थात, शहरात ऑटोमॅटिक स्कूटर सर्वसाधारणपणे प्रति लिटर ४०-४५ किमी मायलेज देते. पॉवरबाबत स्कूटर मागे पडत असली तरी शहरात चालविण्यासाठी पुरेशी आहे. स्कूटरचे इंजिन सायलेंट असून स्मूथ रायिडगचा अनुभव येतो. तसेच, पुढील चाकास टेलिस्कोपिक व मागे सिंगल िस्प्रग सस्पेंशन दिले असून ते चांगले आहे. तसेच, पुढील बाजूस बॉटल वा मोबाइल ठेवण्यासाठी एक जागा दिली आहे. तसेच, स्कूटरची डिकी २१ लिटरची आहे. ऑटो हेडलँप ऑन हे नवे फीचर समाविष्ट करण्यात आले आहे.

डिझाईनच्या बाबतीत बजेट स्कूटर घेणाऱ्यांना हा नवा पर्याय नक्कीच चांगला आहे. कारण फसिनोमध्ये रेट्रो व नव्या डिझाईनला लुकचा उत्तम मेळ घातला गेला आहे. त्यामुळेच पारंपरिक डिझाईन नको असलेल्यांना हे डिझाईन नक्कीच आवडेल. त्याचप्रमाणे व्हेस्पाच्या तुलनेत फसिनोची किंमत कमी असल्याने आणि पारंपरिक स्कूटरशी मिळतीजुळती असल्याने फसिनोकडे डिझायनर स्कूटरचा पर्याय म्हणून नक्कीच पाहता येईल.

obhide@gmail.com

First Published on July 7, 2017 1:00 am

Web Title: yamaha fascino yamaha scooty fascino fashion scooter