दुचाकींच्या बाजारपेठेत एंट्री लेव्हल ते प्रीमियम सेगमेंटमध्ये अनेक स्कूटर व मोटारसायकलचे पर्याय उपलब्ध आहेत. प्रत्येक कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अधिकाधिक फीचर्स, तंत्रज्ञान आकर्षक किमतीत कसे देता येईल, यासाठी प्रयत्न करीत असते. मात्र असे असले तरी प्रत्येक सेगमेंटमध्ये एखाद्या मॉडेलची विक्री सर्वाधिक असते आणि उरलेला हिस्सा हा अन्य मॉडेलचा असतो. त्यामुळेच अशाच प्रत्येक सेगमेंटमधील कोणती दुचाकी अधिक चांगली यशस्वी ठरली आहे, हे पाहूयात.

सध्या दुचाकींमध्ये स्कूटरची विक्री सुसाट असून, त्यात गेल्या काही काळापासून सातत्याने वाढ होत आहे. प्रस्थापित कंपन्यांकडून स्कूटरची नवी मॉडेल व आधीच्या मॉडेलचे नवे व्हर्जन बाजारपेठेत येत आहे. स्कूटरचा सेगमेंट हा एंट्री लेव्हल ते प्रीमियम सेगमेंट, असा विभागला आहे. यातील सर्वात बेसिक स्कूटर ही स्कूटी पेप आहे.

indian man killed in canada
कॅनडामध्ये भारतीय तरुणाची हत्या? कारमध्ये आढळला मृतदेह, पोलीस म्हणाले…
whatsapp and instagram down
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सेवा खंडीत; जाणून घ्या मध्यरात्री काय झालं?
earthquake in taiwan
VIDEO : तैवानमध्ये महाभूकंप! बहुमजली इमारती पत्त्यांसारख्या कोसळल्या, त्सुनामीचा इशारा
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!

शंभर सीसी सेगमेंट

देशात एकूण विकल्या जाणाऱ्या गिअरले स्कूटरमध्ये ७० टक्क्यांहून अधिक हिस्सा १०० व ११० सीसी स्कूटरचा आहे. या सेगमेंटमध्ये गेल्या दोन दशकांहून एकाच ऑटोमॅटिक स्कूटरचे अधिराज्य आहे आणि ती म्हणजे होंडाची अ‍ॅक्टिव्हा. २०००-०१ मध्ये मोठय़ा दिमाखात संपूर्ण मेटल बॉडी, बटन स्टार्ट, महिला-पुरुष दोघेही वापरू शकतील, अशी अ‍ॅक्टिवा ही ऑटोमॅटिक स्कूटर होंडाने लाँच केली. आतापर्यंत या स्कूटरमध्ये काळानुसार तांत्रिक, रचना आणि वैशिष्टय़ांच्याबाबतीत अनेक बदल झाले आहेत. शंभर सीसीपेक्षा अधिक सीसीचे इंजिन असणारी ही स्कूटर १०० ते ११० सीसी स्कूटरच्या सेगमेंटमधील सर्वोत्तम स्कूटरच आहे. अर्थात, या सेगमेंटमध्ये टीव्हीएसने लाँच केलेली ज्युपिटर ही ऑटोमॅटिक स्कूटरही चांगली आहे. अ‍ॅक्टिव्हाच्या तुलनेत ज्युपिटरचे सस्पेन्शन चांगले आहे. तसेच, इलेक्ट्रिक स्टार्ट, इको मोड, बॅटरी चार्जर, कमी देखभाल खर्च ही ज्युपिटरची जमेची बाजू आहेत. त्यामुळे या सेगमेंटमध्ये ज्युपिटरदेखील खरेदी करण्याचा विचार करता येऊ  शकतो.

१२५ सीसी सेगमेंट

स्कूटरमधील हा पॉवरफूल सेगमेंट समजला जातो. अधिक क्षमतेचे इंजिन असल्याने अशा ऑटोमॅटिक स्कूटरचे मायलेजही थोडे कमी असते. पण पॉवर आणि पिकअप या जमेच्या बाजू असतात. त्यामुळे या दोन गोष्टींना प्राधान्य देणाऱ्यांनी १२५ सीसी इंजिन क्षमतेची स्कूटर घेण्याचा विचार करावा. या सेगमेंटमध्ये होंडाची अ‍ॅक्टिव्हा, ग्राझिया, सुझुकीची अ‍ॅक्सेस, व्हेस्पा १२५ आहे. यातील सुझुकी अ‍ॅक्सेस ही सर्वात जुनी स्कूटर असून, या रेट्रो लुक आहे. तसेच होंडाची अ‍ॅक्टिव्हा असून, मायलेज, आफ्टर सेल्स सव्‍‌र्हिस आणि देखभाल यांच्याबाबतीत अ‍ॅक्सेसच्या तुलनेत अ‍ॅक्टिव्हाचा विचार या सेगमेंटमध्ये करता येऊ  शकतो. व्हेस्पा ही या सेगमेंटमधील फॅशन स्कूटर आहे. उत्तम रंग, पॉवरफूल इंजिन, मेटल बॉडी आणि रेट्रो डिझाइन स्टाइल हे या स्कूटरच्या जमेच्या बाजू आहेत. मात्र त्यासाठी एक्स्ट्रा प्रीमियम किमतीच्या रूपाने मोजावा लागतो. कम्युटिंगपेक्षा लाफस्टाइल स्कूटर म्हणून दुचाकी घ्यायची असल्यास व्हेस्पा १२५चा विचार करता येईल. होंडाची ग्राझिया ही या सेगमेंटमधील नवी आलेली स्कूटर आहे. त्यामुळे त्याबद्दल येथे फक्त उल्लेख केला आहे.

शंभर सीसीपेक्षा कमी

शंभर सीसीपेक्षा कमी सीसीची असणारी ही ऑटोमॅटिक स्कूटर ही खासकरून महिलांसाठी बनविण्यात आलेली स्कूटर आहे. त्यामुळे वजनाला हलकी आणि महिलांची सर्वसाधारण उंची लक्षात घेऊन याचे डिझाइन तयार करण्यात आले आहे. इलेक्ट्रिक स्टार्ट, इको मोड, बॅटरी चार्जर, कमी देखभाल खर्च, वजनाला हलकी आहे. तशीच या स्कूटरची किंमतही सर्वात कमी आहे. त्यामुळेच जास्त पैसे खर्च न करता एक चांगली ऑटोमॅटिक व कमी देखभाल खर्च असणारी स्कूटर हवी असल्यास स्कूटी पेप हा उत्तम पर्याय आहे. तसेच, उंची कमी असणाऱ्या महिलांसाठी ही स्कूटर सर्वोत्तम पर्याय आहे. स्कूटी पेप हा ऑटोमॅटिक स्कूटरमधील एक जुना आणि नावाजलेला ब्रॅण्ड आहे.

obhide@gmail.com