मी आयुर्वेद महाविद्यालयाचा निवृत्त प्राध्यापक आहे. मी मारुतीच्या व्हॅन, अल्टो व झेन एस्टिलो या तिन्ही गाडय़ा वापरल्या आहेत. आता मला नवीन कार घ्यायची आहे. माझे वय ६६ वष्रे असून माझे मासिक ड्रायिव्हग ४०० ते ४५० किमी आहे. माझे स्लिप डिस्कचे ऑपरेशनही झाले आहे. माझे बजेट पाच लाख रुपये असून मी कोणती गाडी घ्यावी.

डॉ. नारायण विद्वांस

सध्या सर्वच गाड्यांमध्ये बकेट सीट्सची व्यवस्था असते. त्यामुळे तुम्ही मारुतीची ईको किंवा ऑटो ट्रान्समिशनवर चालणारी वॅगनआर या गाडय़ांचा विचार करू शकता. तसेच तुम्ही सीट कव्हरच्या साथीनेही तुमच्या आसनव्यवस्थेत सुधारणा करू शकता.

नमस्कार, माझे बजेट तीन ते साडेतीन लाख रुपये आहे. मी व माझे पती आम्ही दोघेही वीकेंडला बाहेर फिरायला जातो. तसेच आम्हा दोघांना गिर्यारोहणाचीही आवड आहे. आम्ही कोणती गाडी घ्यावी, जी लाँग ड्राइव्हसाठीही उपयुक्त ठरू शकेल.

प्रियदíशनी काकडे

मी तुम्हाला रेनॉ क्विड ही गाडी सुचवेन. हिची किंमत किफायतशीर आहे आणि हिचा मायलेज व ग्राउंड क्लिअरन्स हे दोघेही उत्तम आहेत.

मला टोयोटा इनोव्हा गाडी घ्यायची असून माझे बजेट १२ ते १४ लाख रुपये आहे. मी काय करू, मला इनोव्हाविषयी सल्ला द्या.

पवन राठोड

सात-आठ आसनी कार सेगमेंटमध्ये इनोव्हा ही सर्वोत्तम गाडी आहे. तिची रिसेल व्हॅल्यूही चांगली असून इंजिन दणकट आहे. त्याचे आयुष्यही भरपूर आहे. तुम्हाला ऑफ रोड एसयूव्ही घ्यायची असेल तर तुम्ही मिहद्राच्या एक्सयूव्ही ५०० या गाडीचा विचार करावा. या गाडीतील सर्व फीचर्स पाहता तुम्ही जर कुटुंबीयांसाठी गाडी वापरणार असाल तर मी तुम्हाला हीच गाडी घेण्याचा सल्ला देईल.