scorecardresearch

खिडकी… सोशल मीडियाची!

सोशल मीडिया ही फक्त एक खिडकी आहे; ज्यामधून आपण बाहेरचं जग न्याहाळत असतो. तुम्ही खिडकीचं स्वरूप बदललं आहे, असं समजू शकता. कारण- इथेही आपल्याला बाहेरचं जग पाहता येतं.

social media A Window of world
सोशल मीडियाना एका खिडकी सारखं आहे….जिथे बसून आपण बाहेरचं जग न्याहळतं असतो (फोटो सौजन्य – कॅनव्हा)

तुम्ही कधी खिडकीत बसून रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्यांकडे पाहत बसला आहात का? रस्त्यावर येणारे-जाणारे लोक, वाहने, आजूबाजूचा परिसर न्याहाळताना आपण शांतपणे आपल्या घरात बसलेलो असतो; पण आपलं मन मात्र एखाद्या विचारांवर स्वार होऊन धावत सुटतं. स्वच्छंदपणे आपण आपल्या विचारांच्या दुनियेत हरवून जातो. आपली नजर मात्र रस्त्यावरच असते अन् तितक्यात असं काहीतरी घडतं की, आपली विचारांची तंद्री तुटते आणि आपण समोर काय घडलं ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी कोणाची तरी भांडणं सुरू असतात, कधी रस्त्यावर एका वाहनाची दुसऱ्याला धडक होते, कधी एखादं वृद्ध जोडपं एकमेकांचे हात पकडून रस्त्यावरून जाताना दिसतं, कधी एखादी लहान मुलगी एखाद्या फुलपाखराच्या मागे धावताना दिसते, कधी काही मुलं फुगा हातात घेऊन धावताना दिसतात. कधी एखादं नव्यानं प्रेमात पडलेलं जोडपं गुपचूप भेटताना दिसतं. कधी एखादे वडील आपल्या मुलाचा हात पकडून त्याला शाळेत नेत असतात; तर कधी एखादी आई आपल्या लेकराला ऊन लागू नये म्हणून त्याच्या डोक्यावर पदर ठेवून घेऊन जात असते. का कोणास ठाऊक; पण या छोट्या छोट्या गोष्टी मनाला खूप समाधान देऊन जातात, जगण्याची प्रेरणा देतात. आपल्या आयुष्यात काहीही सुरू असलं तरी काही वेळासाठी का होईना आपल्याला या सर्वांतून सुटका मिळते… काही क्षणांची विश्रांती म्हणू या. मग आपण एक मोठा श्वास घेतो आणि पुन्हा आपल्या कामाला लागतो.

हेही वाचा – रंगाच्या भिंती तोडू पाहणाऱ्या सावनीची चूक तरी काय?

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Pankaja Munde
“माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले…
Anil Parab Supreme Court Rahul Narwekar
“सर्वोच्च न्यायालयाच्या खालचं विधानसभा अध्यक्षांचं न्यायालय प्रत्येक आमदाराची…”, अनिल परबांचं मोठं विधान
Marathi Woman Trupti Devrukhkar Shared video
धक्कादायक! मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं, मनसेने इंगा दाखवल्यानंतर माफी, व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त

आजकाल या खिडकीची जागा आपल्या मोबाईलनं घेतली आहे, असं मला वाटते. म्हणजे बघा ना सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण सतत फोनला चिकटून असतो. तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की आपण असं का करतो? सोशल मीडिया हे फक्त निमित्त आहे. सोशल मीडिया ही फक्त एक खिडकी आहे; ज्यामधून आपण बाहेरचं जग न्याहाळत असतो. तुम्ही खिडकीचं स्वरूप बदललं आहे, असं समजू शकता. कारण- इथेही आपल्याला बाहेरचं जग पाहता येतं. आपल्याला काही सुचतं नसतं, तेव्हा आपण पटकन मोबाईल उचलतो आणि व्हिडीओ पाहत राहतो एकापाठोपाठ एक… तोपर्यंत पाहत राहतो जोपर्यंत आपल्याला काहीतरी मजेशीर पाहायला मिळत नाही किंवा काहीतरी प्रेरणादायी गोष्ट पाहायला मिळत नाही. कधी एखादा मजेशीर व्हिडीओ असतो; जो पाहून आपण आपल्या सर्व चिंता विसरतो आणि मनापासून हसतो. कधी एखादा प्रेरणादायी व्हिडीओ असतो; जो पाहून आपल्यालाही प्रेरणा मिळते. हे व्हिडीओ पाहताना काही सुंदर गोष्टी पाहायला मिळतात तेव्हा समाधान मिळतं. आपल्या आयुष्यातून काही क्षणांची विश्रांती मिळते.

हेही वाचा – जगण्याची ऊर्मी देणाऱ्या शांताबाई!

सोशल मीडियाचे अनेक तोटे असतील; पण त्याचे अनेक फायदेही आहेत. फक्त फरक इतकाच आहे की तुमचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे? आणि ते महत्त्वाचं ठरतं. सोशल मीडिया मला कधीही फालतू वाटला नाही. कारण- ती आजच्या काळाची गरज आहे. तुम्हीच बघा ना, सोशल मीडियामुळे कित्येक रोजगार निर्माण झाले आहेत. सोशल मीडिया नसता, तर कन्टेंट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर्स, मोटिव्हेशल स्पीकर्स, ग्राफिक्स डिझायनर्स, व्हिडीओ एडिटर, डायरेक्टर, कन्टेट रायटर यांना रोजगार मिळाला नसता. सोशल मीडियामुळेच या नोकऱ्यांची गरज निर्माण झाली आणि भविष्यातही असे लाखो रोजगार मिळतील. सोशल मीडियाचे तोटे नाकारता येणार नाहीत; पण आपण फायद्यांकडे लक्ष देऊ या. तुम्ही मान्य करा किंवा करू नका; पण आज आपण प्रत्येक जण सोशल मीडियाच्या जगाचा भाग झालो आहोत. काही जण या खिडकीसमोर बसून बाहेरचं जग न्याहाळत आहेत; तर काही लोक खिडकीच्या पलीकडील जग निर्माण करीत आहेत. तुम्हाला या जगाच्या कोणत्या बाजूला जायचंय हे तुम्ही ठरवा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-09-2023 at 09:00 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×