scorecardresearch

Premium

मी एका शहीद जवानाची आई वीरमाता बोलतेय…

मी आई बोलतेय, एका वीर शहीद जवानाची आई. देशासाठी माझ्या मुलाने प्राणाची आहूती दिली. एक आई म्हणून दु:ख झाले पण एका जवानाची आई म्हणून मला अभिमान वाटला की, अशा वीर पुत्राला जन्म दिला.

a mother of a Martyred soldier
शहीद जवानाची आई (Photo : Loksatta)

मी आई बोलतेय, एका वीर शहीद जवानाची आई. देशासाठी माझ्या मुलाने प्राणाची आहूती दिली. एक आई म्हणून दु:ख झाले पण एका जवानाची आई म्हणून मला अभिमान वाटला की, अशा वीर पुत्राला जन्म दिला. देशासाठी लढायचं आणि वीरमरण आलं तरी बेहत्तर हा विचार त्याने सैन्यात भरती झाल्यानंतर केला नव्हता; तर लहानपणापासूनच त्याला देशासाठी लढण्याचं वेड होतं आणि आलं तर वीरमरणच यावं असं वाटायचं. तो नेहमी म्हणायचा, “आई, देशासाठी शहीद होण्यात एक गौरव आहे आणि मला तसं मरण आलं तर माझ्यासारखा दुसरा भाग्यवान कोणीही नसेल!”

‘त्या’ यादिवशी सतत भारत- पाक सीमेवर हल्ल्याच्या बातम्या मी ऐकत होते. आणि अचानक बातमी समोर आली पाच जवान शहीद झाले, माझा जीव घाबरुन गेला… बरं ही काही पहिली वेळ नव्हती. जेव्हा जेव्हा देशासाठी जवान शहीद होण्याच्या बातम्या ऐकायची तेव्हा प्रत्येकवेळी कोणताही फोन उचलायची हिम्मत होत नसे. त्या दिवशीही फोन वाजला आणि अंगावर काटाच आला! त्याची बायको किचनमध्ये होती, १० वर्षाची मुलगी शाळेत गेली होती. बाबा माझ्याकडे कान देऊन ऐकत होते फोनवर काय बोलणं होतंय ते… प्रश्न होता आता, कसं, कुणाला आणि काय सांगणार. पण काही क्षणांतच माझा अश्रुंचा बांध फुटला आणि मी ओक्साबोक्शी रडायला लागले. काही वेळातच टीव्हीवर नावही जाहीर झालं…

inspiring story of young deaf lawyer sara sunny who argues case in supreme court in sign language
मूक साराची प्रेरक वकिली!
Anand Mahindra to gift Mohammed Siraj an SUV
चाहते म्हणाले मोहम्मद सिराजला SUV कार गिफ्ट करा, त्यावर आनंद महिंद्रा स्पष्टच बोलले; “आधीच…”
prajakta mali reacted on love and marriage
“खऱ्या आयुष्यात प्रेमात केव्हा पडणार?”, प्राजक्ता माळीने स्पष्टच सांगितलं; म्हणाली, “सध्या मी…”
ajit pawar on contract recruitment
“मला विनाकारण ट्रोल केलं जातंय”, अजित पवारांची नाराजी; म्हणाले, “आम्हाला बदनाम…”

हेही वाचा : घरकामाचं ओझं बाईच्याच खांद्यावर का? आर्थिक जबाबदारी घेतली, घरकामाची जबाबदारीही वाटून घेऊयात की!

मला आजही विश्वास बसत नाही की, आमचा मुलगा आम्हाला सोडून गेला आहे… दिवाळीला गेल्या वर्षी आला होता.. तेव्हापासून त्याला सुट्ट्या मिळाल्या नाही. आमच्या घरी गणपती असतो त्यामुळे गणपतीला आवर्जून सुट्टी काढली आहे असं म्हणाला होता. मी खूप खुश होते, त्याच्या आवडीचे डिकांचे लाडू आधीच बनवून ठेवले होते पण, बातमी ऐकली आणि सर्वच एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

माझं तर आईचं काळीज… पण बायको, मुलगी आणि वडिलांवर त्याचा खूप जीव होता. फोन आला तर तिघांनाही खूप काही प्रॉमिसेस करायचा, हे करू, ते करू… गणपतीमध्ये २० दिवसाच्या सुट्ट्यांमध्येही त्याने बरेच काही प्लान्स केले होते पण सर्व प्लान्स आता…

त्याच्या बायकोने आयुष्यभराच्या सोबतीचा खांदा गमावला, मुलीने डोक्यावरुन वडिलाचं छत्र गमावलं आणि आम्ही दोघांनी आमचा आधार गमावला. तरीही मी खूप खंबीर आहे; कारण मी एका वीर जवानाची आई आहे! एका जवानाची आई म्हणून मला वाटतं की, माझ्या मुलाने देशासाठी सर्वस्वाचा त्याग केला. तो देशासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढला. त्या माझ्या मुलाच्या आहुतीचा आदर तुम्हीही करावा. धर्म, जाती-पाती यावरुन दंगली होणार नाहीत, याची काळजी घ्या. एकमेकांबरोबर वाद घालू नका.

तुम्ही आनंदाने सण साजरा करावा म्हणून कित्येकदा माझ्या मुलाने घरच्यांबरोबर दसरा, दिवाळी, होळी साजरी केली नाही. तुम्ही सुरक्षित राहावे म्हणून त्याने कित्येक महिने आई-बाप, बायको- मुलीचा चेहरा पाहिला नाही. त्याला मुलगी झाल्यानंतर पहिल्यांदा घरी आला तेव्हा मुलगी बाबा म्हणून त्याला हाक मारेल की नाही, यामुळे त्याचा जीव कासावीस होत होता. तो शहीद झाला ही मोठी आहूती तर आहेच पण अनेक लहान- मोठ्या आहुत्या त्याने त्याच्या लष्करी आयुष्यात अनेकदा दिल्या.

हेही वाचा : मुलींनो, सासू कितीही चांगली असो; तिला चुकूनही सांगू नये ‘या’ गोष्टी; जाणून घ्या….

देशासाठी फक्त जवानच नाही तर त्याचं अख्ख कुटूंब लढत असतं. जवानाच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या मनात देशाविषयी अभिमान असतो. देशाबद्दलच्या कर्तव्याची जाण असते आणि म्हणून आम्हाला त्याचा खूप खूप अभिमान आहे.
ही आई लढली आणि पुढेही अशीच लढत राहील. फक्त एकच कळकळीची विनंती आहे… धर्म, जात, प्रांत, भाषा सोडून फक्त आणि भारतीय म्हणून प्रत्येक व्यक्तीने मनात देशप्रेमाची भावना ठेवून जगायला हवे तरच माझ्या शहीद मुलाच्या आत्म्याला शांती मिळेल! अनेकांनी अशा आहुत्या दिल्या आहेत, त्याची कदर करूया!

(प्रस्तुत मनोगत शहीद जवानाच्या आईच्या मनातील विचार काय असू शकतील, या कल्पनेवर बेतलेले आहे.)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A mother of a martyred soldier express feelings of pain and sorrow suffering after loss of child ndj

First published on: 20-09-2023 at 19:30 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×