शिल्पा घरी आली आणि हुश्श करत तिनं भाजीनं खचाखच भरलेल्या पिशव्या स्वयंपाकघरातल्या टेबलावर ठेवल्या. एरवी पावसाळ्यात मंडईत फिरायला तिला मुळीच आवडत नसे. पायाखाली चिखल आणि किचकिच नुसती! पण आज तिच्या उत्साहाला भरतं आलं होतं. सकाळी लवकर उठून, चहाचे घुटके घेत तिनं मन लावून भाज्यांची यादी केली होती. उत्साहानं लवकरच आवरून ती बाजारात गेली होती आणि खचाखच पिशव्या घेऊन भाज्या घेऊन आली होती. तिची घरात ‘एन्ट्री’ झाली आणि हॉलमध्ये गप्पा मारत बसलेल्या आई आणि सुमा मावशी बघतच राहिल्या.

”काय गं हे?… भाजी आणायला जाते म्हणालीस आणि सगळ्या बिंल्डिंगची भाजी घेऊन आलीस की काय?…” आई अचंब्यानं म्हणाली.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

”मी किनई, आज ऋषीची भाजी करणारे!” शिल्पाच्या चेह-यावर उत्साह अजूनही ओसंडत होता.

आई आणि मावशीनं एकमेकींकडे बघितलं.

सुमा मावशी म्हणाली, ”तुमच्या कॅलेंडरमध्ये ऋषीपंचमी एक दिवस नंतर आलीय की काय बुवा! अगं, झाली काल ती ऋषीपंचमी. दुनियेची करून झाली ऋषीची भाजी. काय बाई शिल्पा, तुझं कायम वरातीमागून घोडं!”

आई तर चिडलीच शिल्पावर. ”वेड्या मुली, गौरी येणार आज! उद्या गौरी जेवण. लोकांकडे सोळा-सोळा भाज्या करतात उद्या. म्हणजे आज भाज्यांचे भाव गगनाला भिडलेले असणार… पर्समध्ये पैसे आहेत म्हणून वाटेल तसे खर्च करावेत काय?… एवढं होतं तर नीट आधी प्लॅन करून आणायच्या होत्या भाज्या आणि काल करायची होतीस ऋषीपंचमीला तुझी ऋषीची भाजी!”

हेही वाचा… एकल माता आणि अपत्यांचा जन्म दाखला!

शिल्पाला या संभाव्य प्रतिक्रियांची कल्पना होती. त्यामुळे तिला मुळीच राग आला नाही. शिल्पाकडे गौरी-गणपती बसत नसे. दहा दिवसांचा गणपती तिच्या मोठ्या काकांकडे असे आणि काकांचे सर्व भाऊ-बहिणी, त्यांची मुलं, मुलांची मुलंबाळं, असे सगळे पाहुणे त्यांची ऑफिसं सांभाळून रोजच्या आरत्यांना हजेरी लावत. अर्थात कुणी कितीही ‘बिझी’ असलं, तरी मोठ्या काकूला गणपतीच्या आधीची तयारी करून द्यायला, गौरी बसण्याच्या दिवशी, गौरी जेवणाला आणि विसर्जनाच्या दिवशी तरुण पिढीतले बहुतेक जण जायला जमवत. वडिलधा-यांची आजवर आपल्या ऑफिसमध्ये गर्क असलेली आणि आता निवृत्त झालेली पिढी सकाळचा चहा-नाष्टा आटोपून मोठ्या काका-काकूंच्या घरी जमत असे आणि संपूर्ण दिवस कामांमध्ये गुंतवून घेत, गप्पा मारत त्यांचा वेळ मात्र मस्त जात असे. पण या सगळ्या ‘सेटअप’मध्ये मजा अशी झाली होती, की ‘ऋषीपंचमी’ या प्रकाराविषयी शिल्पाला आजवर काही माहितीच नव्हती! अर्थातच तिच्या घरात कधी ऋषीची भाजीही झाली नव्हती. काल तिनं यूट्यूब आणि इन्स्टा उघडलं आणि चार-पाच ऋषीच्या भाजीचे व्हिडीओ आणि रील्स धडाधड तिच्या डोळ्यासमोर आले. ‘विकी’वर माहिती वाचून झाल्यावर त्या भाजीनं शिल्पा इतकी इम्प्रेस झाली, इतकी इम्प्रेस झाली, की दुस-याच तिवशी त्या भाजीचं ‘इम्प्लिमेंटेशन’ करून टाकण्याचा निर्णय तिनं घेऊन टाकला होता. तशीही गौरी येणार म्हणून अनायसे सुट्टी घेतलीच होती. तर मग ऋषीची भाजी चापून मगच काका-काकूंकडे जावं असा सूज्ञ विचार तिनं केला होता.

इकडे आईचं सुरूच होतं. ”बाहेर कुठे बोलू नकोस बाई हे! नाहीतर आम्ही तुला आपल्या परंपरांविषयी, आपल्या पदार्थांविषयी काही सांगितलंच नाही, असं म्हणून लोक आम्हाला बोल लावतील!”

आता मात्र शिल्पानं आईला थांबवलं. ”काय आई तू पण! आपण नाही केली ही भाजी आजवर म्हणून काय झालं? तेव्हा तू, बाबा दोघंही ऑफिसला जायचात. नाही जमलं कधी आपल्याला एवढी सगळी तयारी करायला. चालतं गं तेवढं! पण आता तरी मला माहिती झालंय ना! आज करणार आहे मी मस्त भाजी. माझी ऋषीची भाजी खाल्ल्याशिवाय तू आणि सुमामावशी, तूपण कुठेही जायचं नाही आज!”

हेही वाचा… चॉइस तर आपलाच: इट इज नॉट अबाऊट यू, आई!

आई म्हणाली, ”अगं, पण तुला ऋषीच्या भाजीचंच एवढं कौतुक कुठनं आलं?”

”आई, कालचे ते रील्स बघताना मला जाणवलं, की ही भाजी नुसती पारंपरिक नाहीये. कित्ती हेल्थी वाटतेय ती बघ ना! म्हणजे केवढ्या भाज्या एकत्र! लाल भोपळा, सुरण, रताळं, दोडका, फरसबी, पडवळ… त्यात पुन्हा अळू, लाल माठ घालायचा… कच्च्या केळ्याचे तुकडे, भुईमुगाच्या ताज्या शेंगा सोलून काढलेले ताजे शेंगदाणे… मक्याच्या कणसाच्या जाडसर चकत्या… ओलं खोबरं… शिवाय मसाले जवळपास नाहीतच. साधं खोबरं आणि हिरव्या मिरचीचं वाटण घातलं, मीठ घातलं आणि आंबटपणाला चिंचेचा कोळ घातला की झालं जंक्शन काम! म्हणजे बघ, जणू ‘वन पॉट मील’ असल्यासारखंच! मी म्हणते फक्त एक दिवसापुरतीच का असावी ही भाजी? जितके दिवस या भाज्या ताज्या मिळतील, तोवर कधीही करायला उत्तमच आहे की ती!”

ऋषीच्या भाजीतल्या भाज्यांची लांबलचक यादी पोरीनं तोंडपाठ म्हणून दाखवली, हे बघून सुमा मावशीनं तोंडात बोट घातलं. आईचीही अवस्थाही काही वेगळी नव्हती. ‘हेल्थी’ आणि ‘वन पॉट मील’ या आज चलती असलेल्या शब्दांनी का होईना, पण आपल्या लेकीचं लक्ष वेधून घेतलं आणि त्याच्या नादानं का होईना, पण पडवळ, दोडका, सुरण या ज्या भाज्यांकडे शिल्पा पूर्वी ढुंकूनही पाहात नसे, त्या ती आज स्वत: घेऊन आलीये, हे पाहून आईच्या चेह-यावरून लेकीचं कौतुक सांडू लागलं. तिनं यूट्यूब आणि रील्सचे मनोमन आभार मानले. आपलं जे सांगायचं आजवर राहून गेलं होतं, ते काम सोशल मीडियानं केलं, हे बघून ती कृतकृत्य झाली.

शिल्पासह दोघी तिला भाजीची तयारी करून देण्यासाठी स्वयंपाकघरात शिरल्या आणि आज मोठ्या काकांकडे जाताना शिल्पाची ही भाजी नक्की न्यायची, असं ठरवून आईनं एक मोठ्ठा रिकामा डबा टेबलावर काढून ठेवलाही!

lokwomen.online@gmail.com

Story img Loader