डॉ. उल्का नातू गडम

आज आपण सूर्यनमस्काराचा चौथा टप्पा पाहू या. जणू काही एखाद्या घोड्यावर स्वार झाल्याप्रमाणे ही स्थिती असते. त्यामुळेच याला ‘अश्व संचलनासन’ असे नाव आहे.

Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
pune rain marathi news, pune unseasonal rain marathi news
पुण्यात हलकापाऊस; दुचाकी घसरण्याच्या घटना
traffic problem in Pune
पुण्यातील बिघडलेल्या वाहतूक समस्येची उच्च न्यायालयाकडून दखल, परिस्थितीचा फेरआढावा घेण्याचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश
Danger from electric wires on footpaths Inexcusable negligence of the Municipal Corporation after entrusting the work to the contractors navi Mumbai
पदपथांवरील विद्युत तारांमुळे धोका; कंत्राटदारांकडे काम सोपवल्यावर महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

असे कराल आसन-

सूर्यनमस्कारात ‘प्रणमासना’पासून सुरूवात केली जाते. मग ‘हस्त उत्थानासन’ आणि नंतर ‘ हस्त पादासन’ केले जाते. त्यानंतरचा हा चौथा टप्पा- ‘अश्व संचलनासन’. यात ‘ॐ भानवे नमः’ या मंत्राने सुरुवात करा. आपण हस्त पादासनाच्या पूर्वस्थितीत आहात. आता उजवा पाय, टाच मागे न्या. हात जमिनीला टेकलेले आहेत. पायाची बोटे जमिनीवर घट्ट रोवून धरा. डाव्या पायाचा तळवा जमिनीवर ठेवा. पाय गुडघ्यात दुमडलेला असेल. दोन्ही हातांची बोटे, डावा गुडघा एका सरळ रेषेत असतील. शरीराचा भार दोन्ही हात, उजवा गुडघा, उजव्या पायाची बोटे व डाव्या पावलांवर असेल. डोके किंचित मागच्या बाजूला झुकवा. पाठ कण्याला थोडा कमानीप्रमाणे आकार आणा. (छाती पुढे घेऊन ) नजर वर करा, दोन्ही भुवयांच्या मध्ये नजर स्थिर करण्याचा प्रयत्न करा.

आसनाचे फायदे

या आसनाच्या सरावाने जांघा, गुडघे, घोटे, पाठ, मान या सभोवतीचे स्नायू व सांध्याचे आरोग्य चांगले राहाते. तोल सांभाळता आल्याने एकाग्रता वाढते. शांत वाटते.

स्वत:ला नीट पारखण्याचे शास्त्र शिकू या

या निमित्ताने आपण चौथा नियम अभ्यासायचा आहे.‌ हा नियम म्हणजे ‘स्वाध्याय’. ‘स्वाध्याय मोक्षशास्त्राणाम् अध्ययनम प्रणवजप: वा।’ म्हणजेच स्वाध्याय म्हणजे शास्त्रांचा अभ्यास किंवा ओंकार जप होय. अर्थात शास्त्र म्हणजे केवळ भौतिकतेशी निगडित शास्त्र नव्हे, तर अध्यात्म शास्त्र. ‘अध्यात्म’ या शब्दाची फोड अधि अधिक आत्म अशी आहे. अधि म्हणजे जवळ जाणे आणि आत्म म्हणजे स्वतःच्या जवळ जाणे म्हणजेच स्वतःला नीट ओळखणे, पारखणे! ‘योगेन आत्मदर्शनम्’ अशी योगाची व्याख्या बृहद् याज्ञवल्क स्मृती या ग्रंथाने केली आहे. ‘स्वयम’ ला जाणून घेणे हाच तर खरा योगाचा मूलमंत्र आहे. जगातील आपल्या संपर्कातील प्रत्येकाच्या गुणदोषांचे मूल्यमापन आपण खूप व्यवस्थित करतो, पण स्वतःचे काय? स्वतःतील दोष कळले तरच सुधारण्याला वाव आहे. जर सुधारलो तरच दुसऱ्याला कमी दुखावू. स्वतःचा भावनांक वाढविणे खूप आवश्यक आहे. ओंकार जपातही कदाचित हाच अर्थ समाविष्ट आहे. ओंकार हा निर्गुण निराकाराचे सगुण साकार रूप आहे. थोडक्यात ओंकाराचा अभ्यास म्हणजे स्वतःतील देवत्व शोधण्याचा प्रयत्न!

प्रत्येक योगासनात असा काही ना काही गर्भित अर्थ आहे. शेवटी सर्व गोष्टींचा उद्देश स्वत:ला पारखून शरीराबरोबरच मानसिक प्रगल्भता आणि शांतता प्राप्त करणे हाच म्हणता येईल.

ulka.natu@gmail.com