डॉ. शारदा महांडुळे

शेंगदाण्याचे गुणधर्म हे बरचसे बदामासारखे असतात. म्हणून त्याला ‘गरिबांचे बदाम’ असेही म्हणतात. शेंगदाणा हा अतिशय पौष्टिक असल्याने तो सुकामेव्यातही गणला जातो. मराठीमध्ये ‘भुईमूग’, हिंदीमध्ये ‘मूंगफली’, इंग्रजीमध्ये ‘ग्राऊंडनट’, तर शास्त्रीय भाषेमध्ये ‘अरकिस हायपोगाया’ (Arachis Hypogaea) या नावाने ओळखतात.

A glass of milk a day could help keep bowel cancer away
Milk: रोज एक ग्लास दूध प्यायल्याने आतड्यांच्या कर्करोगाचा धोका कमी होतो का? वाचा काय सांगतात डॉक्टर
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Hundreds of poor patients are receiving free dialysis services at health department hospitals
दुर्गम भागातील रुग्णांसाठी आरोग्य विभागाची ‘टेलीमेडिसिन’ सेवा ठरतेय संजीवनी! सव्वा लाख रुग्णांना झाला फायदा…
Health benefits associated with boiled food
Gurmeet Choudhary: दीड वर्ष साखर, चपाती, भात अन् भाकरी खाल्लीच नाही तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? वाचा तज्ज्ञांचे मत…
mp dr amol kolhe
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्यास विरोध- लढा उभारण्याचा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा
Vegetarian diet for dogs
आता तुमचे पाळीव प्राणीही घेऊ शकतात शाकाहारी आणि वीगन आहार? तज्ज्ञ काय सांगतात…
जेवणापूर्वी व्हिनेगर का पितात जपानी लोक? तज्ज्ञांनी केला खुलासा….
ating eggs with cholesterol
दररोज अंडी खाल्ल्यास शरीरावर नेमका काय परिणाम होतो? बॅड कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणात होते वाढ? वाचा डॉक्टर काय सांगतात

जमिनीखाली शेंगदाणे उगवत असल्यामुळे त्याला भुईमूग असे म्हणतात. याचे झुडूप वर्षातून एकदा येते. याला पिवळ्या रंगाची फुले येतात. फुले आल्यानंतर दोन महिन्यांत जाड टरफलाच्या शेंगा येतात. या शेंगांच्या आतमध्येच शेंगदाणे असतात. शेंगा उन्हात वाळविल्यानंतर त्या फोडून शेंगदाणे तयार कतात. याचे उत्पन्न भारतामध्ये सर्व ठिकाणी घेतले जाते. शेंगदाणा मूळचा दक्षिण अमेरिकेतील आहे. सध्या चीन, जपान, मलेशिया, भारत, पश्चिम आफ्रिका, ब्राझील या सर्व देशांत त्याचे उत्पादन घेतले जाते.

औषधी गुणधर्म :

आयुर्वेदानुसार : शेंगदाणा मधुर गुणात्मक, पौष्टिक, शक्तिवर्धक, उत्साहवर्धक, बलकारक व पित्तकर आहे.

आधुनिक शास्त्रानुसार : शेंगदाण्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह ही जीवनसत्त्वे, बी कॉम्प्लेक्स, प्रथिने, खनिजे, स्निग्धता, आम्ले, तंतुमय व पिष्टमय पदार्थ असतात.

शेंगदाण्यामध्ये सर्वात जास्त १०० टक्के प्रथिने असतात. अंड्याच्या अडीच पट मांसाहारापेक्षाही अधिक व कुठल्याही भाजी, फळे व दुधापेक्षाही जास्त प्रथिने असतात. प्रथिनांबाबत शेंगदाण्याची तुलना फक्त सोयाबीनबरोबर होऊ शकते. शेंगदाण्यामध्ये फक्त ॲमिनो ॲसिड्स कमी प्रमाणात असतात. म्हणून दुधामध्ये ॲमिनो ॲसिड्स जास्त असल्यामुळे भाजलेल्या शेंगदाण्याबरोबर दूध घेतल्यास तो पूर्ण आहार होतो.

उपयोग :

१. शेंगदाण्यामध्ये अनेक पौष्टिक घटकांतील प्रथिने, फॉस्फरस, थायामिन, नायसिन हे महत्त्वाचे घटक असल्यामुळे शाळकरी मुले, गर्भवती स्त्रिया व प्रसूती झालेल्या स्त्रिया यांनी शरीर सुदृढ राहण्यासाठी भाजलेले शेंगदाणे व गूळ नियमित खाचेत व त्यानंतर एक कपभर दूध प्यावे.

२. मासिक पाळीमध्ये रक्तस्राव जास्त प्रमाणात होत असेल, तर त्या स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात रोज मूठभर शेंगदाणे व थोडासा गूळ खावा. याने रक्तस्राव कमी होऊन अशक्तपणा दूर होतो.

३.अति स्थौल्याचा त्रास असणाऱ्यांनी मूठभर भाजलेले शेंगदाणे जेवणापूर्वी खाल्ल्यास भूक शमली जाऊन जेवण कमी जाते व आपोआपच वजन हळूहळू कमी होते. कारण शेंगदाणा हा जास्त प्रथिनयुक्त आहार आहे.

४. मधुमेही रुग्णांना ‘ब’ जीवनसत्त्वाची कमतरता भासत असल्यामुळे त्यांनी रोज मूठभर शेंगदाणे खावेत. यामध्ये असणाऱ्या नायसिनमुळे अशक्तपणा दूर होतो व रक्तवाहिन्यांमधील दोष कमी होतात.

५. बळकट होण्यासाठी भाजलेल्या शेंगा किंवा शेंगादाणे खावेत. शेंगदाणे चावून खाल्ल्याने दातांजवळील रक्तपुरवठा सुधारतो व त्यामुळे दातांवरचे एनॅमल टिकून राहते. फक्त शेंगदाणे खाल्ल्यानंतर दात स्वच्छ घासून तोंड धुवावे, नाहीतर शेंगदाण्याचे कण अडकून दात किडण्याची शक्यता असते.

६. रोज भाजलेले मूठभर शेंगदाणे खाल्ल्यास आतड्यांची हालचाल वाढून मल पुढे ढकलण्यास मदत होते व शौचास साफ होते.

७. रक्त कमी असणाऱ्या स्त्रिया, गर्भवती स्त्रिया व बाळंतिणी यांनी नेहमी रोज मूठभर शेंगदाणे व त्यासोबत गुळाचा खडा किंवा गूळ-शेंगदाणे यांचा रोज एक लाडू खावा.

८. शेंगदाण्यापासून लाडू, चिक्की, खारे शेंगदाणे, चॉकलेट असे विविध प्रकार बनविता येतात. तसेच शेंगा भाजून किंवा उकडूनही खाता येतात.

९. उपवास असेल तर साबुदाण्याएवेसी शेंगदाण्यापासून बनविलेले पदार्थ, तसेच बटाट्यापासून बनविलेल्या पदार्थांचा व फळांचा वापर करावा.

१०. शेंगदाणे भिजत घालून मोड आणून खाल्ल्यास त्रास कमी होऊन ते सहज पचतात व त्यातील पोषणमूल्य व ‘ब’ व ‘क’ जीवनसत्त्वे दुपटीने वाढतात.

सावधानता:

शेंगदाणे पित्तकर असल्यामुळे सहसा ते भाजून उकडूनच खावेत. तसेच पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी शेंगदाण्याचा वापर कमी प्रमाणात करावा. अनेकजणांना शेंगदाण्याची ॲलर्जी असते. अशा व्यक्तींनी शेंगदाणे खाणे टाळावे. दम्याचा त्रास असणाऱ्यांनी शेंगदाणे खाणे टाळावे. जास्त प्रमाणात शेंगदाणे खाल्ल्यास जठरातील पित्त वाढून आम्लता वाढते व त्यामुळे आम्लपित्त, अपचन, छातीत व पोटात जळजळ होणे व तीव्र डोकेदुखी, मळमळ अशा स्वरूपाचा त्रास होऊ शकतो.

dr.sharda.mahandule@gmail.com

Story img Loader