डॉ. शारदा महांडुळे

आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतं. आयुर्वेदामध्ये आवळ्याला अत्यंत श्रेष्ठ मानलं आहे. हिंदीमध्ये आँवला, संस्कृतमध्ये आमलकी, इंग्रजीमध्ये ‘एम्ब्लिका मायरोबेलान’ या नावाने परिचित आहे. आवळा पोषणाचं काम करतो. म्हणून आयुर्वेदात त्याला धात्री असंही म्हणतात. वार्धक्य अवस्था टाळून चिरतरुण राहण्यासाठी मदत करतो. म्हणून त्याला वयस्थाही म्हटले जाते. चरकाचार्य, वाग्भट, सुश्रूत या सर्व श्रेष्ठ ऋषींनी औषधामध्ये आवळ्याचा वापर करावयास सांगितलं आहे. उत्तर व दक्षिण भारतात आवळ्याचं उत्पादन घेतलं जातं. गुजरातमध्ये पावागड, डांग आणि सापुतारा येथील जंगलात आवळ्याचे वृक्ष मोठय़ा प्रमाणात दिसून येतात. आवळ्याचे पांढरे आवळे व रान आवळे असे दोन प्रमुख प्रकार आहेत. सुकलेल्या आवळ्यापेक्षा हिरवा ताजा आवळा आधिक गुणकारी असतो. आवळ्याचा छुंदा, मुरंबा, लोणचे, चटणी, अवलेह, कँडी, सरबत, सुपारी करून वर्षभर आवळा सेवन करता येतो.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
How Suryanamaskar and pranayama help to fight allergies
तुम्हाला वारंवार ॲलर्जी होते? सूर्यनमस्कार आणि प्राणायाम ठरतील फायदेशीर

आणखी वाचा : चॉइस तर आपलाच : मन चिंता करू लागलं तर?

औषधी गुणधर्म – आवळा रक्तदोषहारक, पित्तशामक, सारक व रुचकर आहे. आवळा हा आम्ल-मधुर रसाचा, शीत-वीर्यात्मक व मधुर विपाकी असल्यामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करतो. यामध्ये शोधनाचा गुण असल्याने रक्तात साचलेली विषद्रव्ये दूर करून रक्त शुद्ध करतो. अशाच प्रकारे रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र या सप्तधातूंमध्ये जाऊन प्रत्येक धातूतील विषद्रव्ये दूर करून सर्वच धातूंना शुद्ध बनवतो. या त्याच्या गुणांमुळेच शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणूनच नियमितपणे आवळा सेवन करणे आवश्यक आहे. ताजा आवळा उपलब्ध नसेल तर वाळलेल्या आवळ्याची पूड म्हणजेच आवळा चूर्ण औषधामध्ये वापरावे. आवळा चूर्णमध्येही ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते.

आणखी वाचा : हम काले है तो क्या हुआ!

उपयोग –

  • खरं तर आम्लधर्मी पदार्थाने पित्ताची वृद्धी होते, परंतु आवळा आम्लधर्मी असला तरी त्याचा विपाक मधुर असल्यामुळे त्याच्या मधुर व शीतल गुणांमुळे त्याच्या सेवनाने पित्त वृद्धी न होता पित्तप्रकोप कमी होतो. त्यामुळे शरीराचा दाह होत असेल तर अशा अवस्थेत आवळ्याचा रस प्यावा.
  • रक्त विकारांमध्ये उदा. नाकाचा घोळणा फुटला असेल, शौचामधून रक्त पडत असेल, मुळव्याधीतून रक्त जात असेल तसंच स्त्रियांमध्ये मासिक पाळीत अतिरक्तस्राव होत असेल तर या सर्व विकारांमध्ये आवळाचूर्ण किंवा आवळा रस घ्यावा.
  • आवळा, हिरडा, बेहडा ही द्रव्ये समप्रमाणात घेऊन त्याचं चूर्ण बनवावं यालाच त्रिफळा चूर्ण असं म्हणतात. हे चूर्ण रोज पाण्यात भिजत घालून सकाळी ते पाणी वस्त्रगाळ करून गाळलेल्या पाण्याने डोळे धुवावेत. असं केल्याने डोळ्यांचं तेज वाढतं. तसंच रात्री झोपताना गरम पाण्यातून एक चमचा त्रिफळा चूर्ण घेतलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी शौचास साफ होतं.
  • जर डोकंदुखीचा त्रास होत असेल तर आवळ्याचं चूर्ण, तूप व खडीसाखर समप्रमाणात घेऊन एकत्र करावं. सकाळच्या वेळी उपाशी पोटी हे मिश्रण सेवन केल्याने डोके दुखीचा त्रास नाहीसा होतो.
  • केसांच्या तक्रारींवर उदा. केस गळणं, पांढरे होणं, कोंडा होणं, केस निस्तेज होणं या सर्वावर आवळा, शंखपुष्पी, ब्राम्ही, जास्वंद यांनी युक्त तेल केसांना लावावं. काही दिवसांमध्येच केसांची वाढ चांगली होते. केस गळणं थांबतं. केसांचा रंग टिकून राहतो व रात्री शांत झोप लागते.
  • तोंड बेचव होऊन मळमळ किंवा उलटी होत असल्यास आवळ्याचा रस व मध यांचं चाटण करावं. तोंडास रुची प्राप्त होते.
  • गर्भारपणात स्त्रीला उलटी व मळमळ वारंवार होत असते. अशा वेळी आवळा सुपारी, कँडी व सरबत यांचा वापर करावा. यामुळे तोंडास रुची निर्माण होऊन मळमळ कमी होते.

आणखी वाचा : Open Letter: अहो गृहमंत्री, लक्ष कुठे देणार? दीपिकाच्या कपड्यांकडे की हुंडाबळींच्या मोठ्या संख्येकडे?

  • नियमित आवळा सेवनाने स्मरणशक्ती व बुद्धी वाढते. म्हणून आवळ्यापासून तयार केलेला च्यवनप्राश आहारात नियमितपणे घ्यावा.
  • आवळा, हिरडा, बेहडा, जांभुळ बी, कडूलिंबाचं चूर्ण, गुळवेल व कारली सुकवून त्यांची पूड समप्रमाणात घेतल्यास मधुमेह हा आजार आटोक्यात ठेवता येतो. हे चूर्ण मधुमेही रुग्णांनी पाण्यासोबत सकाळ – संध्याकाळ १-१ चमचा घ्यावं.
  • नियमित आवळा सेवनाने शरीरातील रसरक्तभिसरण क्रिया सुरळीत चालू राहते व त्यामुळे कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी होऊन हदयविकार टाळता येतो.
  • ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्वचा रोगावर आवळा हे उत्तम औषध आहे. एक चमचा आवळा चूर्ण नियमितपणे सेवन केल्यास त्वचारोग होत नाहीत.
  • नियमितपणे आवळा सेवन केल्यास त्यात असणाऱ्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे हृदय, केस, मांसपेशी व शरीरातील अनेक ग्रंथींना बळ मिळतं व त्यामुळे तारुण्यावस्था जास्त दिवस टिकून ठेवता येते. म्हणूनच वार्धक्यावस्था टाळण्यासाठी च्यवनऋषींनी आवळ्यापासून बनविलेला च्यवनप्राशावलेह सेवन केला व तारुण्यप्राप्त करून घेतलं. म्हणूनच बाराही महिने रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहण्यासाठी व त्यातून आरोग्य टिकण्यासाठी नियमितपणे च्यवनप्राश सेवन करावा.

सावधानता –
हिवाळ्यामध्ये सर्दी, खोकला, ताप हे आजार झाले असतील तर फ्रिजमध्ये ठेवलेले थंड आवळे सेवन करू नयेत. तसंच कच्चे आवळे खाऊ नयेत. यामुळे वरील आजार वाढतो. याशिवाय आवळा कुठल्याही स्वरूपात शरीरास रसायनाप्रमाणे उपयुक्तच आहे. नियमितपणे रोज आवळा किंवा त्याचे पदार्थ सेवन केले तर तुम्हाला डॉक्टरांची गरज भासणार नाही.
sharda.mahandule@gmail.com