वनिता पाटील

‘तुला उकडीचे मोदक येतात ना?’ कुणीतरी सुचवलेलं ‘स्थळ’ एका कॉफी हाऊसमध्ये मला भेटायला आलं होतं आणि ‘ममाज बॉय’ छाप चेहरा करून हा प्रश्न विचारत होतं…

Man wraps utensils in plastic to avoid washing them.
भांडी घासावी लागू नये व्यक्तीने शोधला भन्नाट जुगाड! हर्ष गोयंकांनी शेअर केला मजेशीर व्हिडीओ
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
2024 Bajaj Pulsar N125
Hero, Honda चा खेळ खल्लास करण्यासाठी बजाज खेळतेय नवा गेम, देशात आणतेय नवी Pulsar, किंमत…
long distance marriage marathi news, long distance marriage tips
समुपदेशन : ‘लाँग डिस्टन्स’ लग्न टिकतात?

अरे टोणग्या लग्न करण्यासाठी जिला भेटायला आला आहेस तिला निदान सेक्सबद्दल तरी विचार, किस नीट करता येतो का विचार… उकडीचे मोदक काय रे ..? माझं आपलं मनातल्या मनात चिंतन सुरू…

ते जरा बाजूला ठेवून मी फिस्सकन् विचारलं…
‘क्का?’

आणखी वाचा : नातेसंबंध : जास्त इनव्हॉल्व्हमेंट नकोच!

‘मला आवडतात… उकडीचे पांढरेशुभ्र, लुसलुशीत, कळीदार मोदक. त्यात गुळाचं सारण हवं, वेलदोड्याची चव हवी… पारी अशी सुरेख जमलेली हवी. वर तुपाची धार… आहाहा… मी ठरवलं आहे की जिला उकडीचे मोदक नीट करता येत असतील अशाच मुलीशी लग्न करायचं…’

गरम कॉफीचा ठसकाच लागला मला एकदम…
‘आत्ता गणपती सुरू आहेत ना, म्हणून आठवलं…’ ‘ममाज बॉय’ म्हणाला…
सॉलिड इंटरेस्टिंग होतं प्रकरण. आता चावी द्यायलाच पाहिजे होती.
‘आणखी काय काय यायला हवं तुझ्या बायकोला…?’
‘ममाज बॉय’ आणखी खुलला.

‘सुरेख पुरणपोळी यायला हवी. त्यात वेलदोडे नाही, जायफळ लागतं, ते माहीत असायला हवं. रोजची पोळी तर मला तव्यावरचीच लागते. टम्म फुगलेली. वाफेवरची पोळी खाऊन निघतो मी रोज ऑफिसला जायला. ती तर येतेच ना प्रत्येक मुलीला…’
अलेले… खलंच की… मला उठून ‘ममाज बॉय’चा एकदम गालगुच्चाच घ्यावासा वाटला… तिकडे फेबुवर उकडीच्या मोदकांच्या स्पर्धा झडताहेत ते सोडून इथे कॉफी शॉपमध्ये कुठे आलं हे बाळ?
प्रत्येक मुलीला येतेच टम्म फुगणारी पोळी?
प्रत्येक मुलीला येतेच पुरणाची पोळी ?
प्रत्येक मुलीला येतोच उकडीचा मोदक?
उकडीचा की तळणाचा… साखरेतला की गुळातला…
अश्शी पारी सुरेख बाई वाला की पिठाचे गोळे वाला…

माव्याचा की ड्राय फ्रूटचा…
चॉकलेटचा की आंब्याचा की गुलकंदाचा…
प्रत्येक मुलीला येतोच ?
कोण म्हणतं?

मला नाही येत मोदकबिदक… उकडीचा नाही, कुठलाच येत नाही. पुरणाची पोळी सोडा, टम्म फुगणारी घडीची पोळी पण नाही येत… सो व्हॉट्ट?
इथे कुणाला यायला हवंय हे सगळं?

आणखी वाचा : अपुरी झोप हेच विस्मृतीचे कारण

मला गरजेपुरता कूकर लावून वरणभात करता येतो. मला जेवणात किती प्रोटीन हवं, फायबर हवं, कार्ब्स हवेत, फॅट्स हवेत हे गणित करता येतं. त्यासाठी मला ऑनलाइन ऑर्डर देता येते. ते काम घरी येऊन कुणीतरी करावं आणि ते करणाऱ्याला त्यासाठी नियमित आणि चांगला पगार द्यावा एवढं कमावता येतं. हे काम करवून घेता येतं.

मला मोटारगाडी चालवता येते. मला इंटरनेटवरून जगात विमानं हॉटेलपासून कुठलंही, कसलंही बुकींग करता येतं. मला कुठेही, कधीही एकटीने प्रवास करता येतो. मला एकटीने हॉटेलात जाऊन हवी ती ऑर्डर देऊन मस्त चापून खाता येतं. मला मित्रमंडळींबरोबर हवी तेव्हा जाऊन वाईन पिता येते. मला चाळिशीत रिटायरमेंट घेऊन हवं ते करण्यासाठी इनव्हेस्टमेंट करता येते. शेअर्सची खरेदी विक्री करता येते. मला माझ्या हक्कांसाठी ऑफिसातच काय कुठेही भांडता येतं. मला माझी सामाजिक जबाबदारी कळते. ती घेता येते. ती निभावता येते.
आणि हो, मला किस नीट घेता येतो आणि सेक्सबद्दलही व्यवस्थित शास्त्रीय आणि पूरक दोन्ही माहिती आहे.

मी पण आहे ‘ममाज गर्ल’ आणि ‘पपाज प्रिन्सेस’…
पण… मला नाही येत बुवा मोदकबिदक…
सो व्हॉट्टं…?