मैत्रेयी किशोर केळकर

इंटरनेटवर शोधाशोध करून बियांपासून कमळाची लागवड कशी करायची याची माहिती मिळवली. आता या बिया मिळवायच्या कशा? मग आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात गेले. दहा रूपयाला एक याप्रमाणे पाच बिया आणल्या. कमळाच्या बिया या अतिशय कठीण असतात. त्यांचं वरच काळं आवरण टणक असतं म्हणूनच त्या हजोरो वर्षं आहेत तशाच टिकून राहू शकतात. मला चटकन दुर्गाबाईंच्या लेखाची आठवण झाली. सिद्धेश्वराच्या तळ्यात सुवर्ण कमळाच्या बिया असाव्यात असा उल्लेख त्या लेखात होता.

article analysis about close relationships zws 70
तुम्हालाही आहे जवळीकतेचं वावडं ?
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
IFA Officer Apala Mishra Success Story
UPSC परीक्षेत दोनदा अपयश, मित्रांकडून चेष्टामस्करी होऊनही हार मानली नाही; वाचा, कसा होता IFS अधिकारी अपाला मिश्रा यांचा प्रवास?
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय?
Is surgery necessary for the problem of uterovaginal prolapse
स्त्री आरोग्य : ‘अंग’ बाहेर येणं समस्येसाठी शस्त्रक्रिया करावीच लागते का?
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
TC Ashish Pande Suspended
Ashish Pande : “मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही”, म्हणणाऱ्या टीसी आशिष पांडेचं रेल्वेने केलं निलंबन

कुमुदिनी फुलायला लागल्यावर मी खरेखुरे लक्ष्मी कमळ लावण्याचे प्रयोग करायचं ठरवलं. यासंबंधी शोधाशोध केली तेव्हा फारशी माहिती उपलब्ध झाली नाही. पण डुडुळगावच्या कमळ बागेबद्दल अगदी त्रोटक बातमी कळली होती. डुडुळगाव आळंदीच्या जवळ आहे एवढ्या एका धाग्याचं टोक पकडून मी तिथे पोहोचले. सतिश गदिया यांची ती बाग होती. जमिनीत मोठे खड्डे करून त्यात प्लास्टिक पसरून त्यांनी छोटी तळी तयार केली होती. या तळ्यात अनेक प्रकारच्या वॉटर लीली लावल्या होत्या. याबरोबरच गुलाबी रंगाची आणि पांढऱ्या रंगाची कमळ फुलंही उमलली होती. अनेक पाकळ्या असलेली, पाचच पाकळ्यांची एवढंच काय तर मोठ्या पसरट बशीसारख्या पानांची दुर्मिळ जातही त्यांनी निगुतीने वाढवली होती.

हे सगळं पाहून मी अगदी हरखून गेले. आपणही कमळं फुलवावीत या विचाराने आता जोरदार उसळी मारली. त्यांच्याकडून कमळांचे कंद विकत घेणं मला परवडणारं नव्हतं, त्यामुळे तो विचार सोडला. पण कमळ मात्र मनात रूतून बसलं होतं.

हेही वाचा >>> तुम्हालाही आहे जवळीकतेचं वावडं ?

घरी येऊन इंटरनेटवर शोधाशोध करून बियांपासून कमळाची लागवड कशी करायची याची माहिती मिळवली. आता या बिया मिळवायच्या कशा? मग आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात गेले. दहा रूपयाला एक याप्रमाणे पाच बिया आणल्या. कमळाच्या बिया या अतिशय कठीण असतात. त्यांचं वरच काळं आवरण टणक असतं म्हणूनच त्या हजोरो वर्षं आहेत तशाच टिकून राहू शकतात. मला चटकन दुर्गाबाईंच्या लेखाची आठवण झाली. सिद्धेश्वराच्या तळ्यात सुवर्ण कमळाच्या बिया असाव्यात असा उल्लेख त्या लेखात होता.

काहीही झालं तरी कमळ लावायचंच हे पक्कं होतं. मग पॉलिश पेपरच्या तुकड्यावर बिया घासून घेतल्या. बीच्या टोकाशी असलेलं काळं आवरण घासून आतला पांढरा भाग दिसेल इतपत घासाघाशी केली. मग पाण्याच्या भांड्यात बिया ठेवून रोज इमानेइतबारे पाणी बदलत राहिले. पाचापैकी दोन बिया अंकुरल्या. इवलाली पानं दिसू लागली. पंधरा दिवसात छान वाढ झाली. मग एका प्लास्टिकच्या टबमध्ये शेणामातीचा गारा करून बिया अलगद लावल्या. टब हलकेच पाण्याने भरला. वाटलं जमलं बरं का आपल्याला, पण अगदी थोडक्या वेळात माझी रोपं तितक्याच हळूवारपणे पाण्यावर तरंगत वर आली. आता ही जर अशी तरंगत राहिली तर वाढायची कशी? मग फिश टॅंकमध्ये घालतात त्या दगडांचा दाब देऊन परत एकदा रोपं मातीत दाबून बसवली. आता हळूहळू पाणी घातलं. हा प्रयोग थोडाफार यशस्वी झाला. यातलं एक रोप टिकलं, दुसरं मात्र खराब झालं. दोन-चार दिवस असेच गेले. आता सूर्यप्रकाशामुळे ते इवलं तळं शेवाळ्यानं झाकून गेलं. हलक्या हातानं ते शेवाळं काढायचं आणि लांबूनच आपलं रोपं नीट आहे ना हे निरखायचं अशी मेहनत सुरू झाली.

हळूहळू रोप वाढीला लागलं. चार हिरवीगार पानं पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन तरंगत राहिली. पानांची संख्या वाढतच होती. पानं पाण्यावर तरंगत होती, पण फुलांचा पत्ता नव्हता. एक मात्र लक्षात आलं होतं की कुमुदिनीची पानं आणि कमळाची पानं यात खूप फरक आहे. दोन्ही पानांवर मेणासारखं आवरण आहेच, पण पानांच्या आकार, प्रकार आणि रंगात फरक आहे.

हेही वाचा >>> पतीनं बाहेर संबंध ठेवू नये म्हणून पत्नींसाठी चीनमध्ये खास शिबिराचं आयोजन, सोशल मीडियावर लोक म्हणाले…

कमळ लावता आलं, टिकवता आलं याचा आनंद झाला होताच. तरीही फक्त एवढंच समाधान पदरी पडलं होतं. सहा महिने झाले, आठ महिने झाले पण पानांचाच पसारा वाढत होता. माझी बागेची आवड कसली वेडच ते… साधारण सगळ्या परिचितांना माहीत होतं, त्यामुळे एका मित्राने मला एक कमळ काकडीचा रूजेल असा छोटा तुकडा दिला. ही जाडजूड कमळं काकडी मी मातीत खोचून परत एकदा दगडांचा दाब देत एका छोट्या टबमधे लावली. हिची वाढ झपाट्याने झाली. पाण्यालगत पानं तर वाढलीचं, पण काही महिन्यांनंतर पाण्याच्या वर येऊन पानं डोलू लागली. तोवर माझी कमळांबद्दलची समज पुष्कळ वाढली होती. प्राध्यापिका आणि संशोधक असलेल्या हेमा साने यांचं कमळ या विषयाची साद्यंत माहिती देणारं पुस्तक मला मिळालं होतं. यात कमळाची जीवशास्त्रीय माहिती तर होतीच, पण सांस्कृतिक, ऐतिहासिक, पौराणिक महत्त्व याविषयीसुद्धा बरंच लिहिलं होतं. पांढरं पुंडरीक कमळ, हलकं गुलाबी लक्ष्मी कमळ अशा अनेक जाती आणि नावांचा परिचय मला झाला. ही नवीन माहिती मिळताच मी अगदी हरखून गेले. फुलांचा मात्र पत्ता नव्हताच.

एरियल लिव्हज् म्हणजे पाण्यापेक्षा उंच वाढणारी पानं आली होती. मिळालेल्या माहितीनुसार आता फुलं यायला हवीतच की. पण तसं घडलं नाही. शरद ऋतूत कमळ फुलतं, तो ऋतूही सरला. मी आता पुरती निराश झाले. बियांपासून लावलेलं कमळही फक्त आणि फक्त पानंच तयार करत होतं.

छे, आपल्या प्रयोगाला काही यश येत नाहीये असं ठामपणे वाटू लागलं. काय करावं या विचारात होते. पावसाळा सुरू झाला. निलंबिएसी कुळातील कमळं आणि निंफीएसी कुळातील वॉटर लीलींना ऊन फार मानवतं, म्हणजे आता पावसाळ्यात फुलांची आशा करायलाच नको.

त्यापेक्षा आपल्या भाजीपाला आणि फळं यांच्या प्रयोगाकडे लक्ष द्यावं असं ठरवून मी पावसाळ्यातील भाज्यांची रोपं तयार करायला घेतली. एक दिवस मात्र नवलं घडलं . ती सगळी हकिगत सविस्तर सांगेनच पण पुढच्या लेखात.