Valentine’s Day व्हॅलेंटाईन डे जवळ आलाय. या दिवशी आपण आपल्या सगळ्यांत प्रिय व्यक्तीबरोबर असावं, असं प्रत्येकाला वाटतं. पण, अनेकदा कर्तव्यापुढे हार मानावी लागते. व्हॅलेंटाईन डे ला आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी आवडत्या गोष्टी करणं यासारखी आनंदाची गोष्ट नाही. पण, अनेकदा शिक्षण, करियर, नोकरी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी तुमच्या प्रियकरापासून किंवा नवऱ्यापासून दूर राहावं लागत असेल तरीही तुम्ही तुमचा आणि त्याचा व्हॅलेंटाईन डे स्पेशल करू शकता. एकमेकांबरोबर प्रत्यक्ष वेळ घालवणं शक्य नसलं तरी तुमच्या जीवलगाला त्याची आवडती गोष्ट नक्कीच पाठवू शकता, किंवा त्याच्या आवडीची गोष्ट करून तुम्ही तुमचा व्हॅलेंटाईन स्पेशल साजरे करू शकता.

लाँग डिस्टन्स रिलेशनशिप वाटते तेवढी सोपी नक्कीच नसते. विशेषत: ‘व्हॅलेंटाईन डे’ला तुमचा जीवलग लांब असेल तर नक्कीच मानसिक त्रास होतो. सतत आठवण येत राहते. गिफ्ट्स पाठवणं, फोन करणं, व्हिडिओ कॉल करणं या गोष्टी तर तुम्ही करालच, पण त्याशिवायही काही छानशा गोष्टी तुम्ही नक्की करू शकता. त्यामुळे, कितीही अंतरावर असलात तरीही तुमचा व्हॅलेंटाईन डे स्पेशल होईल. तुम्हीही लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असाल आणि तुम्हाला व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा असेल तर काही टीप्स लक्षात ठेवा –

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Man wraps utensils in plastic to avoid washing them.
भांडी घासावी लागू नये व्यक्तीने शोधला भन्नाट जुगाड! हर्ष गोयंकांनी शेअर केला मजेशीर व्हिडीओ
terrifying moment man fall off swing
मित्राला झोका देता देता घसरून पडला व्यक्ती, थेट दरीत…. थरारक घटनेचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
this unique way of crossing road was seen for the first time you will not stop laughing after watching video
VIDEO : … तर गाडीची काच फुटलीच म्हणून समजा; रस्ता ओलांडण्याची ‘ही’ पद्धत तुम्ही कधी पाहिली का?

रोमँटिक मेसेज पाठवा

‘व्हॅलेंटाईन डे’ची सुरुवात तुमच्या पार्टनरला मस्त रोमँटिक मेसेज पाठवून करा. तुमच्या मनातल्या भावना शब्दांमधून व्यक्त करा. तुम्हाला शक्य असेल तर छानशी चारोळी किंवा स्वत: कविता करून तुमच्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचवा. तुमच्या मेसेजमधून तुम्ही त्याला किती मिस करताय आणि तुमचे त्याच्यावर किती प्रेम आहे, ते त्याला कळू दे.

हेही वाचा – विवाह समुपदेशन : पुन्हा सूर जुळवताना!

प्रेमपत्र पाठवा

थोडं जुन्या काळातलं वाटेल, पण खरोखरंच या ‘व्हॅलेंटाईन डे’ला तुमच्या प्रिय व्यक्तीला तुमच्या हातानं लिहिलेलं पत्र पाठवा. पूर्वी जेव्हा इंटरनेट नव्हतं, सोशल मीडिया नव्हतं तेव्हा अशा पत्रांमधूनच तर संवाद होत असे. तुम्हीही तो फील पुन्हा घेऊ शकता. तुमच्या पार्टनरला तुमच्या हातानं लिहिलेलं पत्र मिळेल तेव्हा आश्चर्याचा सुखद धक्का बसेल हे नक्की.

छानसं गिफ्ट पाठवा

व्हॅलेंटाईन डे ला आपल्या प्रिय व्यक्तीकडून छानसं गिफ्ट मिळावं असं प्रत्येकाला वाटत असतं. एकमेकांपासून दूर असलात म्हणून काय झालं? तुम्ही तुमच्या प्रियकराला त्याच्या आवडीचं गिफ्ट तर नक्कीच पाठवू शकता. हल्ली ऑनलाईन गिफ्ट्समध्ये भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. किंवा तुम्ही तिथे राहणाऱ्या एखाद्या मित्राच्या हातीही गिफ्ट पाठवू शकता. सुगंधी परफ्यूम, खास त्याच्यासाठी कस्टमाईज्ड केलेलं वॅलेट, पर्सनलाईज्ड किंवा तुमचा एकत्र फोटो असलेला कॉफी मग, कुशन, फोटोफ्रेमपासून अनेक खास पर्याय तुमच्यापुढे आहेत. पर्सनलाईज्ड कॅरिकेचर, बेडरूम लाईट हेही त्यातले पर्याय आहेत.

हेही वाचा – मासिक पाळी सुसह्य करायचीय? मग या टिप्स वाचाच!

डेट प्लान करा

एकमेकांसोबत असताना कदाचित हे शक्य आहे. पण दोन ग्रहांवर दोघे असताना एकत्र डेट कशी शक्य आहे? मग तंत्रज्ञानाचा कधी उपयोग करणार? तुम्ही तुमचं घर, रूम मस्तपैकी डेकोरेट करा आणि तुमच्या पार्टनरला व्हिडिओ कॉल करा. तुम्ही एकमेकांसोबत व्हर्च्युअल कँडल लाईट डिनरही प्लान करू शकता. एकमेकांच्या आवडीच्या डिश ऑर्डर करून या डेटला तुम्ही आणखी खास बनवू शकता.

आवडीचं खाणं ऑर्डर करा

हृदयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग पोटातून जातो हे तुम्हाला माहीत असेलच. एकत्र रेस्टॉरंटमध्ये जाता आलं नाही म्हणून काय झालं? तुमचा पार्टनर ज्या शहरात राहतोय तिथल्या स्पेशल स्थानिक डिशेस किंवा त्याच्या खास आवडीचे पदार्थ त्याच्यासाठी ऑनलाईन ऑर्डर करू शकता.

हेही वाचा – बिझनेस वूमन अभिनेत्री

रोमँटिक चित्रपट पाहा

ओटीटी प्लॅटफॉर्मवर व्हॅलेंटाईन डे स्पेशल रोमँटिक मूव्हीज भरपूर असतात. एकमेकांसोबत मूव्ही पाहण्याची वेळ नक्की करा. त्यावेळेस इतर सर्व कामं बाजूला ठेवा. तुमच्या पार्टनरसोबत तुम्हाला दोघांना आवडणारा एखादा मस्त रोमँटिक सिनेमा ऑनलाईन पाहा. यामुळे त्याच्यासोबत तुम्हाला वेळ घालवण्याचं समाधानही मिळेल.

सरप्राईज द्या

‘व्हॅलेंटाईन डे’ला तुमच्या पार्टनरला काहीतरी सरप्राईज गिफ्ट द्यायचं तुमच्या मनात असेल तर कितीही लांब असलात तरी तुम्ही ते देऊ शकाल. तुमचा पार्टनर जर रूम शेअर करून राहत असेल तर त्याच्या रूम पार्टनर्सची मदत घेऊन तुम्ही तुमचं सरप्राईज देऊ शकता. तो राहत असलेल्या रूममध्ये विविध ठिकाणी गिफ्ट्स लपवून ठेवायला सांगा आणि व्हॅलेंटाईन डे’ला त्याला शोधायला सांगा. गिफ्ट्स शोधत असताना व्हिडिओ कॉल करायला विसरू नका. म्हणजे गिफ्ट्स मिळाल्यानंतरचा त्याला झालेला आनंद मिस होणार नाही.

हेही वाचा – मुलाखत : अभिनेत्री रकुल प्रीत सिंग; बिझनेस वूमन, अभिनेत्री

गाणं रेकॉर्ड करून पाठवा

प्रत्येक जोडप्याचं एखादं तरी आवडतं गाणं नक्की असतं. तुम्हीही एखादं खास गाणं दोघं मिळून एंजॉय करत असाल. त्या गाण्याबरोबर तुमच्या छानशा आठवणी जोडल्या गेल्या असतील. जेव्हा जेव्हा तुम्ही ते गाणं ऐकता तेव्हा या सुखद आठवणी जाग्या होतात. आता तुमचा पार्टनर अंतरानं जरी लांब असला तरी या गाण्यानं तुम्ही हे अंतर सहज कापू शकता. तुमचं हे खास गाणं तुम्ही तुमच्या आवाजात रेकॉर्ड करून पार्टनरला पाठवा. तुम्ही प्रोफेशनल गायक नसाल किंवा तुमचा आवाजही अगदी गोड नसेल. पण, हे खास गाणं म्हणण्याचा तुमचा प्रयत्न तुमच्या पार्टनरपर्यंत नक्की पोहोचेल आणि तुमचा व्हॅलेंटाईन डे स्पेशल होईल.