डॉ. वैशाली वलवणकर

प्रत्येक स्त्री सुंदर व आकर्षक दिसू शकते. जर ती शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी असेल तर. स्त्रीचे वय कितीही असले तरी त्वचा निरोगी असेल तर तिचे सौंदर्य खुलून दिसते. आता आपण तेलकट त्वचेची काळजी कशी घ्यावी याविषयी काही उपाय थोडक्यात पाहूया.

triphala in excess is beneficial or harmful for health
जास्त प्रमाणात त्रिफळाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत..
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Prajwal Revanna Rape Victime
Prajwal Revanna Chargesheet: ‘बलात्कार करताना पीडितेला हसायला सांगायचा’, प्रज्ज्वल रेवण्णाच्या विकृतीचा कळस
Miscarriages Frequently
स्त्री आरोग्य : वारंवार गर्भपात होतोय का?
Advanced Artificial Intelligence Techniques for Flood Forecasting
कुतूहल : पुराच्या अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
Driving a scooty in the wrong way
चुकीच्या पद्धतीने स्कुटी चालवल्याने उद्भवतील अनेक समस्या; ‘या’ टिप्स करतील मदत
drinking hot lemon water in a copper pot
तांब्याच्या भांड्यात गरम लिंबू पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते? तज्ज्ञांनी मांडले मत..
increasing weight, health special, health,
health special : वाढत्या वजनाने मानसिकतेवर कसा परिणाम होतो?

तेलकट त्वचा

त्वचा तेलकट असण्याचे काही फायदे आहेत, तर काही तोटेही. त्वचा तेलकट असेल तर चेहऱ्यावर विशिष्ट तेज दिसून येते. आणि सुरकुत्याही लवकर पडत नाहीत. परंतु जास्त तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणे, चेहेऱ्याला खाज येणे, त्वचा काळवंडल्यासारखी दिसणे, ब्लॅक हेडसचे प्रमाण वाढणे अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे त्वचेचा तेलकटपणा कमी करताना ती खूप रुक्षही होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागते.

आणखी वाचा : सुंदर मी होणार! – त्वचेचे सौंदर्य

तेलकट त्वचेची घ्यावयाची काळजी

१) वारंवार अति तीव्र साबणाने चेहेरा धुवू नये.

२) अति प्रमाणात टोनर, ॲस्ट्रिन्जटचा वापर करू नये.

३) सौम्य फेसवॉशचा वापर करावा.

४) सौम्य फेसस्क्रबचा वापर आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच करावा.

(उदा – गव्हाचे पीठ चाळल्यानंतर वरती जो कोंडा रहातो तो एक चमचा घेवून, त्यात थोडा मध टाकून पेस्ट तयार करून ही पेस्ट हलक्या हाताने चेहऱ्यावर चोळावी, नंतर पाण्याने चेहरा धुवून टाकावा. यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचेचा थर निघून जातो आणि मुरुम येण्याचे प्रमाण कमी होते.

५) तेलकट त्वचा असणाऱ्यांनी ऑईल फ्री मॉईश्चरायझर तसेच कमी तेलकट सनस्क्रीन वापरावे.

६) मेकअप करतानाही जास्त तेलकट सौंदर्य प्रसाधनांचा वापर टाळावा.

७) आठवड्यातून एकदा गरम पाण्याची वाफ घ्यावी. त्यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेलकटपणा कमी होवून त्वचेवरील रंध्रे मोकळी होतात.

८) गाडीवर प्रवास करताना स्कार्फचा वापर करावा.

आणखी वाचा : Navratri 2022 :  उपास नव्हे उपवास… जाणून घ्या का आणि कशासाठी केला जातो उपवास?

मुरुम / तारुण्यपीटिका

सर्वांच्या अत्यंत जवळचा विषय म्हणजे तारुण्यपीटिका. प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधीतरी या समस्येचा सामना करावाच लागतो. त्यातल्या त्यात १२ वर्षांपासून ते साधारण २५ वर्षांपर्यंत याचा त्रास जास्त होतो. काही स्त्रियांना वयाच्या चाळीशी नंतर हार्मोन्सच्या असंतुलनामुळेही पिंपल्सचा त्रास होतो.
आपल्या त्वचेवर अनेक तैलग्रंथी असतात. त्यातून सतत तेल स्रवत असते. या तैलग्रंथीच्या मुखाशी अडथळा निर्माण झाला की ते तेल आणि मृत पेशी साठून राहतात. त्याचे मुरूम/ पिंपल तयार होते. अशा पिंपलला हाताळून त्यात जिवाणूंची वाढ होते आणि त्यात पू भरतो, त्याजागी जखम होवून व्रण तयार होतो.

आणखी वाचा : Navratri 2022: असा करा गरबा-दांडियासाठी मेकअप

तारुण्यपीटिका नियंत्रणात ठेवण्यासाठीचे उपाय

१) चेहरा धुण्यासाठी तीव्र साबणाचा वापर न करता सौम्य फेसवॉशचा वापर करावा.

२) दिवसातून दोन वेळा चेहरा धुवावा. चेहरा धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू नये. त्यामुळे चेहऱ्यावरील रंध्रे खुली होतात म्हणून थंड पाण्याने चेहेरा धुवावा.

३) तारुण्यपीटिका असताना तेलकट मेकअपचा वापर करू नये.

४) आठवड्यातून एकदा पाण्याची वाफ घ्यावी.

५) चेहऱ्याला वारंवार हात लावू नये.

६) सध्या स्टेरॉईडचे मलम पिंपल कमी करण्यासाठी वापरतात अशा प्रकारचे मलम नायटा कमी करण्यासाठी वापरायचे असतात. परंतु असे मलम लावल्यामुळे प्रचंड दुष्परिणाम होतात. त्यामुळे अशाप्रकारच्या मलमांचा वापर करू नये.

(उदा – बेटनोव्हेट, लोबेट, पॅनडर्म अशा क्रीम अजिबात वापरू नयेत.)

७) दिवसातून ८ – १० ग्लास पाणी प्यावे.

८) जेवणात तिखट, मसालेदार पदार्थांचा वापर करू नये.

९) नियमित व्यायाम करावा.

१०) ८ ते १० तास पुरेशी झोप घ्यावी.

११) मन प्रसन्न ठेवावे.

१२) नियमित प्राणायाम व योगासने करा.

१३) पोट साफ होण्यासाठी आठवड्यातून एकदा एरंडेल तेल घ्यावे.

१४) बाहेर जाताना स्कार्फचा वापर करावा.

१५) औषधी द्रव्ये असलेल्या फेसपॅकचा वापर करावा.

आणखी वाचा : ॲनिमिया स्त्रियांचा कायमचा सोबती

काही नैसर्गिक फेसपॅक

फेसपॅक नं. १ –

शतावरी+ मंजिष्ठा+सारिवा +वाळा +नागरमोथा+ ज्येष्ठमध पावडर समप्रमाणात एकत्र करणे.

फेसपॅक नं. २ –

नागरमोथा+ कचोरा +निंब+ वाळा+ मंजिष्ठा+ चंदन+ अनंतमूळ (सरिवा) इ. ची पावडर समप्रमाणात एकत्र करणे.

फेसपॅक नं ३ –

चंदन+ सरिवा +मंजिष्ठा+वाळा+ आंबेहळद इ. पावडर समप्रमाणात+ वरील मिश्रणाइतक्या प्रमाणात मसूरडाळ पावडर+ दूध किंवा गुलाबपाणी

या फेसपॅकमध्ये कोरड्या त्वचेसाठी दूध आणि तेलकट त्वचेसाठी पाण्यात एकत्र करून वापरणे.

आणखी वाचा : महिलांचे पित्त विकार आणि आहार

फेसपॅक वापरण्याची पद्धत

१) पॅक जास्त घट्ट किंवा पातळ असू नये.

२) पॅक लावताना खालून वरच्या दिशेने लावावा.

३) पॅक पूर्ण सुकण्याच्या आधी धुवावा.

४) पॅक लावल्यानंतर चेहऱ्याच्या जास्त हालचाली करू नयेत अन्यथा सुरकुत्या पडण्याची शक्यता असते.

५) पॅक धुताना जास्त घासून धुवू नये.

६) पॅक रात्रभर लावून ठेवू नये.

आणखी वाचा : ‘वजेशियल’ – ‘त्या’ ठिकाणचं ‘फेशियल’!

टीप –

फेसपॅकमध्ये किंवा रंग उजळण्यासाठी वापरण्याची हळद काही संस्कार करून वापरली तर तिचे गुणधर्म वाढतात.

(उदाहरणार्थ – ४- ५ हळकुंड पातेल्यात तुरीची डाळ शिजविताना टाकावीत. डाळ शिजल्यानंतर हळकुंड बाजूला काढून धुवून घ्यावीत. असे तीनदा करावे. नंतर ती हळकुंडे सूर्यप्रकाशात वाळवून घ्यावीत. त्याची पावडर करून घ्यावी अशी हळद वापरल्यानंतर नैसर्गिक पॅकचे गुणधर्म वाढतात.
v.valvankar@gmail.com