स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता असते, असं प्रसिद्ध वचन आहे. मातृत्वाची भावना ही काही फक्त माणसाची मक्तेदारी नाही. सर्व चराचरातील प्राणीमात्रांमध्ये स्त्रीत्वाचे अस्तित्व आहे, त्या सगळ्यांमध्ये मातृत्व, वात्सल्य या भावना असतातच. उंच आभाळात उडणाऱ्या घारीचं लक्ष जसं घरट्यातल्या पिलापाशी असतं, अंधार पडताच बाळाच्या काळजीने कासावीस झालेली हिरकणी कड्यावरून जीवावर उदार होऊन उतरायलाही मागेपुढे पहात नाही तसंच पाण्यात राहणाऱ्या किलर व्हेल किंवा ओरकासारख्या मत्स्य प्रजातींचं लक्ष आपल्या पिलांच्या निकोप संगोपनावर केंद्रित झालेलं असतं. आई आपल्या पिलांसाठी, लेकरांसाठी कोणत्याही आव्हानांना झेलायला, पेलायला तयार असते. याला प्राणीजगतही अपवाद नाही.

आणखी वाचा : २१ हजार फूट उंचीवर लिंगभेदाला मूठमाती कशी ते जाणून घ्या | success story …

human personality mask
जिंकावे नि जगावेही: मुखवट्यांच्या आड
New procedure regarding online booking by LPG Company to customers
आता ‘ओटीपी’ सांगितल्याशिवाय गॅस सिलेंडर मिळणारच नाही; कशी आहे नवीन प्रक्रिया?
Loksatta ulta chashma
उलटा चष्मा: बैलबुद्धी? नंदीबैल?
retirement planning, financial freedom, emotional aspects, senior financial planning, peace of mind, financial mentor, heritage, family values, mental preparation,
निवृत्तीच्या उंबरठ्यावरचं अर्थकारण!
parental challenges, children s independence, generational tensions, family dynamics, emotional support, parent child relationship,
सांधा बदलताना : कळा ज्या लागल्या जीवा
how to become a loco pilot training to become loco pilot
चौकट मोडताना : हळूहळू सकारात्मक होणारा समाजाचा दृष्टिकोन
Ladki Bahin Yojana, brothers, Ladki Bahin,
‘बहिणीं’नो, दीड हजार रुपयांसाठी ‘भावां’ना प्रश्न विचारण्याची ताकद गमावू नका…
friendship, unspoken bond, lifelong connection, love and labels, emotional journey, mutual respect, supportive relationship, life decisions
माझी मैत्रीण : ‘रिश्तों का इल्जाम ना दो’

याच संदर्भात उत्तर पॅसिफिकमधील ओरका माशांच्या मादींसंदर्भात झालेल्या अभ्यासामधे असे आढळून आले आहे, की पिलांची वाढ निकोप, सुदृढ व्हावी म्हणून ओरका मादी आपले अन्न आणि ऊर्जा दोन्हींचे बलिदान देते. उत्तर पॅसिफिक समुद्रात राहणारे किलर व्हेल हे निवासी प्रकारात येतात. जपान, रशिया, अलास्का, ब्रिटीश कोलंबिया, वॉशिंग्टन वगैरे ठिकाणी यांचा अधिवास आढळतो. निवासी, ऑफशोअर, मोठे किलर व्हेल यांच्या आकार, शरीररचनेत, वर्तणूक, आहार आदींमध्ये फरक असतो.

आणखी वाचा : घटस्फोट म्हणजे काही रोग नव्हे घटस्फोटिता कुटुंब नवरा बायको लग्न संसार …

पिलांच्या पोषणासाठी ओरकाची मादी आपल्या शारीर ऊर्जेचा वापर करत असल्यामुळे भविष्यात तिच्या पुनरूत्पादनाची क्षमता लक्षणीयरित्या कमी होत असल्याचेही या अभ्यासातून समोर आले आहे. १९८२ आणि २०२१ या वर्षी वैज्ञानिकांनी ४० ओरका मादींच्या जीवनशैलीविषयी संशोधन केले. त्यात त्यांच्या असे निदर्शनास आले, की एका जिवंत पिलाचे संगोपन करण्याच्या तिच्या क्षमतेमध्येही फरक पडत जातो. दोन वर्षापासून ते एक वर्षापर्यंतच्या पिलाचे संगोपन करण्याची ओरका आईची वार्षिक क्षमता ही निम्म्याने कमी होते, असे हा अभ्यास नोंदवतो. ओरका माता आणि मुलगे एकत्रितपणे पुरूषांच्या प्रौढत्वाचे साक्षीदार होतात. ओरका माता अगदी त्यांनी पकडलेले साल्मन मासेदेखील आपल्या मुलांना खाऊ घालतात, असे प्रो. डॅरेन क्रॉफ्ट स्पष्ट करतात. याउलट या प्रजातीतील प्रौढ माद्या स्वतंत्रपणे शिकार करतात.

आणखी वाचा : महिला वैमानिकाची सर्वाधिक टक्केवारी भारतातच का | why india has more …

किलर व्हेल किंवा ओरका लैंगिकदृष्ट्या वयाच्या १० ते १८ व्या वर्षीपर्यंत प्रौढ होतात. या प्रजातीमध्ये वीणीचा हंगाम वर्षभर असला तरीही मादीचा गर्भारकाळ १५ ते १८ महिन्यांचा असतो. त्यांना होणारे पिल्लू –हे जन्मतः साधारण ६ ते ७ फूट उंचीचे असते. जन्मानंतर त्यांचे वजन सुमारे ४०० पौंड इतके असते. वयाच्या ४० व्या वर्षापर्यंत ओरका माद्या प्रजननक्षम असतात, असे अभ्यास सांगतो. नर व्हेलचे सरासरी आयुर्मान हे ५० ते ९० वर्षे असते. ओरकाविषयीच्या उपलब्ध माहितीवरून असे लक्षात येईल की, जन्मजात इतक्या वजनी असलेल्या पिल्लाच्या वाढीसाठी तितक्याच प्रमाणात खाद्याची आवश्यकता असणार. असे पिल्लू शिकार करण्याइतके तरबेज वा तयार होईपर्यंत त्याच्या संगोपनाची जबाबदारी ही सर्वस्वी ओरका आईवर पडल्यामुळे स्वाभाविकपणे ती मातृत्वाला जागत आपल्या अन्नाकडे, स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून पिलाची मात्र डोळ्यात तेल घालून काळजी घेताना दिसते.

आणखी वाचा : भारतीय महिलांच्या नेतृत्त्वाखालील स्टार्टअपना गुगलकडून ७५ दशलक्ष …

ती आई आहे म्हणूनच पिलाच्या संरक्षण, आरोग्य याची काळजी ती वेळोवेळी घेताना दिसते. माणसांमध्येसुद्धा एका विशिष्ट वयापर्यंतच्या मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी ही संपूर्णपणे आईवरच असते. बाहेरील जगात जगण्यायोग्य होईपर्यंत मुलांची निगा राखणे, त्यांना सकस आहार पुरवणे हे करताना स्त्रिया आपल्या तब्येतीची हेळसांड करतात. मुलांच्या वाढीपुढे त्यांना आपल्या तब्येतीची काहीच किंमत वाटत नाही. हिच बाब किलर व्हेल मातेबद्दलही या अभ्यासातून समोर आलेली आहे. स्त्रीत्व, मातृत्व ही भावना माणूस, प्राणी, पक्षी यांत एकसमान आहे. तिथे अन्य कशालाही महत्त्व नाही.