डॉ. उल्का नातू – गडम

आपल्याला वाचून फार गंमत वाटेल पण आसनांना फार प्राचीन परंपरा आहे. मोहेंजोदारो, हरप्पा येथील उत्खननांमध्ये विविध आसन स्थितीतील मूर्ती सापडल्या आहेत. अथर्व वेद संहिता ( इ. स. पूर्व १५००) या ग्रंथातही आसनांचा उल्लेख आढळतो. पातंजल योगसूत्रांमध्ये आसनांची नावे दिलेली नाहीत. परंतु अगदी थोडक्यात तीन सूत्रांमध्ये लाभ व तत्व दिले आहे. योग याज्ञवल्क, योग कौस्तुभ, महाभारतातही आसनांचा उल्लेख आढळतो.

Do not come to ask for votes placards from onion growers in Malwadi
मत मागण्यासाठी येऊ नये, माळवाडीत कांदा उत्पादकांकडून फलक
thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
Techie doubles his income
वर्षाला १ कोटी रुपये कमावण्यासाठी व्यक्तीने शोधला जुगाड, लाखोंचे शैक्षणिक कर्जही फेडलं, एकाच वेळी केल्या….
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग

अनेक पुराणे, तथा हठयोगाच्या ग्रंथामध्ये विशेष करून हठयोगप्रदीपिका हठरत्नावली आदी ग्रंथांमध्ये आसनांचा विशेष उल्लेख आढळतो.

आणखी वाचा : योगमार्ग : अर्धपद्मासन

बऱ्याच वेळा आसने अथवा प्राणायामाच्या सरावाला बसलेले असताना आपल्या दोन्ही नाकपुड्या बंद आहेत, अथवा एक नाकपुडी चोंदली आहे असे जाणवते. अशा वेळी श्वसनमार्गशुद्धी, कपालभातीच्या जोडीला पादधीरासनाचा सराव उपयुक्त ठरू शकतो. या आसनाचा सराव करताना प्रथम वज्रासनात या. या आधीच्या लेखांकांमध्ये वज्रासनाची कृती दिलेली आहे.

वज्रासनामध्ये दोन्ही हातांची घडी छातीसमोर अशा रीतीने ठेवा की उजवा हात डाव्या काखेमध्ये व डावा हात उजव्या काखेमध्ये राहील. हाताचा अंगठा बाहेर व वरच्या दिशेला राहील.

ही स्थिती अधिक प्रभावशाली होण्यासाठी अंगठा बाहेर ठेवून हाताची मूठ काखेत ठेवली. तर खूप चांगला दाब येतो. डोळे शांत मिटून लक्ष श्वासावर एकाग्र करण्याचा मनापासून प्रयत्न करा. संथ, लयबद्ध, खोलवर व मनापासून घेतलेला श्वास खूप परिणामकारी असतो.

थोड्या वेळानंतर दोन्ही नाकपुड्या उघड्या असल्याचे जाणवेल. जुन्या काळी ऋषीमुनी नाकपुड्या उघडण्यासाठी योगदंडाचा वापर करीत.

आणखी वाचा : मुलींसाठी औद्योगिक प्रशिक्षण

दोन्ही नाकपुड्या उघड्या झाल्याने अनुकंपी व परानुकंपी (Sympathetic/ Parasympathetic- सूर्यनाडी व चंद्रनाडी) या दोहोंमध्ये साम्यावस्था आणता येते. थोडक्यात, उद्विग्न झालेल्या मनाला शांत करण्यासाठी, हार्मोन्सचे संतुलन साधण्यासाठी या आसनाचा सराव उपयुक्त ठरू शकतो.

ulka.natu@gmail.com