scorecardresearch

नवराच ‘बॉडी शेमिंग’ करतो तेव्हा…

मुळातच अनेक गोष्टींमुळे वाढलेली जाडी कमी करणं मनात असूनही तिला अनेकदा ते जमत नसतं. अशावेळी तिला समजून न घेता तिचा नवरा सतत टोमणे मारत असेल तर अशावेळी काय करावं?

weight loss, women, fitness
बाळंतपणानंतर वजन वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, हेही नवरे मंडळींनी समजून घ्यायला हवे…

तुमच्या बाबतीत कधी असं झालं आहे का, की लग्नाआधी आणि पुढे साधारण वर्ष दीड वर्ष तुम्ही चणीने बारीक, सडसडीत बांधा असलेली ‘फिट’ तरुणी होता, पण एक मूल झाल्यानंतर शरीरात बराच बदल झाला आणि तुम्ही थोड्या लठ्ठ किंवा तुमच्याच नजरेत बेढब दिसू लागलात? उत्तर जर ‘हो’ असेल तर असं होणाऱ्या फक्त तुम्हीच नाही. नव्वद टक्के स्त्रिया बाळंतपणानंतर सुटतात. काही लाईफस्टाइलमुळे. अर्थात पुढे प्रयत्न केल्यावर पुन्हा सडसडीतही होऊ शकतात. हे सगळं नैसर्गिक चक्र आहे आणि हे बदल ही न टाळता येण्यासारखे आहेत. असं असूनही अनेक स्त्रियांना या बदलाची प्रचंड भीती वाटते, ताण येतो कारण त्यांचा पती त्यांना त्यांच्या शरीरयष्टीवरून मारत असेलेले टोमणे.

आणखी वाचा : Open Letter : तुझा जीव कसा कळवळला नाही? आईचे तुकडे करणाऱ्या रिंपलला खुलं पत्र

नवरे मंडळींना जर स्वतःच्या रक्तामासाचं मूल हवं असेल तर पत्नीमध्ये होणाऱ्या शारीरिक बदलांकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक ठेवून कसं चालेल? ‘किती लठ्ठ झालीस तू !’ , ‘ मी पसंत केलेली बायको हीच का?‘ , आता मला माझ्या सप्नातली ती सुंदरी पुन्हा कधीच बघायला नाही मिळणार का?’ , ‘ तू इतकी बदलशील हे माहीत असतं तर हे मूल होऊच दिलं नसतं.’ ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ अशी वाक्यं तिच्या मनावर काय काय परिणाम करत असतात याची कल्पना बऱ्याचदा त्या नवरे मंडळींना नसते. कधी कधी बायकोला असं बोलताना त्यांना आसुरी आनंद मिळतो की काय अशी शंका येते. पत्नीच्या शरीरावर टोमणे मारताना परिस्थितीचं आणि तिच्या मनाचं भान ठेवणं गरजेचं आहे.

आणखी वाचा : Golden Day for Girls: ४ सुवर्णपदक तर १ चमचमती गोल्डन ट्रॉफी, भारताच्या लेकींनी रोवले अटकेपार झेंडे! इतिहासात हा दिवस सुवर्ण अक्षरात…

करिश्मा आणि केतन हे एक जोडपं. एका पार्टीला जाण्यासाठी करिश्मा मस्त नवीन डिझायनर ड्रेस, त्याला मॅचींग इतर साऱ्या ॲक्सेसरीज घालून छान तयार होऊन आली. तिला पाहताच केतन म्हणाला, “ तू काय स्वतःला करिश्मा कपूर समजतेस की काय ? आरशात बघ. शोभतोय का हा ड्रेस तुला? कमरेचा ‘ कमरा’ झालाय नुसता. नोकरीवर बसून बसून काम करण्याने बघ कसा शरीराचा ढोल झालाय.” करिश्माच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. खरं तर लग्नानंतर दोन वर्षातच केतनला चक्क टक्कल पडत आलं होतं, पण त्यावरून त्याला न चिडवता ती त्याच्यासाठी होमिओपॅथी उपचार घे म्हणून काळजीने मागे लागली होती. केतनने असं हिणवल्यावर ती पार्टीला गेलीच नाही, आणि तोही सरळ एकटा निघून गेला.

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : ब्रह्मचर्याचं पालन शक्य असेल तरच!

रत्नाची देखील अशीच काहीशी कहाणी. आधी अत्यंत सुडौल असलेल्या रत्नाचं एका गर्भपातानंतर व्यायामाचं आणि खाण्याचं वेळापत्रक बिघडलं आणि तिचं वजन वाढलं. तिच्या नवऱ्याला म्हणजे रोहनला तिच्यातला हा बदल अजिबात आवडला नाही. तो तिला त्यावरून सतत टोमणे मारू लागला. “तुम्ही बायका आम्हा पुरुषांची घोर निराशा करता. आधी एकदम स्वर्गातली अप्सरा आणि नंतर फुगली टराटरा… असं झालंय तुमचं. मग आमचा तुमच्यातला इंटरेस्ट कमी होतो त्याचं काय?” यावर रत्ना जाम भडकली. “तू माझ्याशी फक्त शरीरासाठी लग्न केलंस का ? मी शारीरिक दृष्ट्या तदुरुस्त असावं म्हणून बोलला असतास तर आनंद वाटला असता मला. पण तू माझ्या देहाची खिल्ली उडवत आहेस. आणि ते कशामुळे झालंय याचीही तुला पूर्ण कल्पना आहे. जर आपल्या दोघांत कुठलेही भावनिक बंध नसतील आणि तुझं इमान फक्त माझ्या शरीराशी असेल तर सॉरी… पण तुझं स्वतःचं शरीर बघ आरशात ! केव्हढी ढेरी! पँट कायम खाली घसरायची भीती वाटते. पण मी तुला त्यावरून कधी टोचून बोलले? बॉडी शेमींग केलं कधी? तुझ्यात मी नेहमी एक प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष नवरा बघितला. बाकी तुझे दोष मला इतके मोठे वाटलेच नाहीत !”

पती- पत्नी मधील नातं म्हणजे फक्त शारीरिक नातं असतं का? त्यापलिकडेही कितीतरी अशारीरिक कंगोरे असतात त्याचं काय? आपली पत्नी कायम त्रिलोकीची अप्सराच दिसली पाहिजे अशी अपेक्षा कशी ठेवता येईल? संसार म्हणजे पडद्यावर दिसणारा चित्रपट नसतो. ते वास्तवातील सहचर असतं ही जाणीव असायला हवी ना?
रत्नाच्या या बोलण्यावर खजिल झालेल्या रोहनने तिची माफी मागितली. आणि तिला घट्ट मिठी मारली.
adaparnadeshpande@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 12:26 IST

संबंधित बातम्या