राष्ट्रकुल स्पर्धेसाठी होणाऱ्या निवड चाचणी स्पर्धेत ऑलिम्पिक विजेत्या बॉक्सर मेरी कोमला मात देतच नितू घंघासने राष्ट्रकुल स्पर्धेतील जागा निश्चित केली. नीतू घंघासचा जन्म १९ ऑक्टोबर २०००मध्ये हरियाणातल्या भिवनी जिल्ह्यातील धनाना या गावी झाला. घरची परिस्थिती अगदीच बेताची होती. आई मुकेश देवी, वडील जय भगवान घंघास आणि एक भाऊ असं तिचं कुटुंब. त्याची संपूर्ण जबाबदारी एकट्या वडिलांच्या खांद्यावर. २००८ साली भिवनीचे बॉक्सर विजेंद्र सिंग यांनी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावलं; तेव्हापासून नीतूला या खेळानं मोहिनी घातली होती. कुटुंबानंही तिला प्रोत्साहन दिलं. त्यामुळे तिच्यासाठी हा प्रवास सोपा झाला. २०१२ मध्ये प्रथमच नीतूनं बॉक्सिंगचे डावपेच शिकण्यासाठी जगदीश सिंह यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी तिला गावापासून बसने रोज २० किमी.चा प्रवास करून जावं लागत असे. पण ती कधीच कंटाळली नाही. तिचे वडील कायम तिच्यासोबत असत. बॉक्सिंग या खेळासाठी सर्वात महत्वाची लागणारी गोष्ट म्हणजे तंदुरूस्त शरीर. नीतूला योग्य तो आहार मिळावा, दूध, तूप, लोणी अशा पौष्टिक गोष्टी तिला भरपूर आणि चांगल्या प्रतीच्या मिळाव्यात म्हणून तिच्या वडिलांनी कर्ज काढून तब्बल अडीच लाखाची म्हैस विकत घेतली.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boxer nitu ghanghas life journey and her struggle kmd
First published on: 19-08-2022 at 06:00 IST