नरोत्तम सेखसारिया हे आपल्या देशातील एक महत्वाचे उद्योजक आहेत. अम्बुजा सिमेंट उद्योगाची त्यांनी स्थापना केली. या कंपनीला त्यांनी देशातील आघाडीची सिंमेंट कंपनी करण्यात त्यांचा मोठा हात आहे. २००२ साली त्यांनी विविध प्रकारच्या सामाजिक कार्यासाठी नरोत्तम सेखसारिया फाउंडेशनची स्थापना केली. त्यामार्फतच देशातील गुणंवत विद्यार्थ्यांच्या परदेशातील आणि देशातील उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य केलं जातं.

आणखी वाचा : करिअर : अनुसूचित जाती संवर्गातील विद्यार्थिनींना उच्चशिक्षणासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

अमेरिका, आस्ट्रेलिया, कॅनेडा, इंग्लंड या सारख्या परदेशातील आणि देशातील नामवंत विद्यापीठांमध्ये सामाजिक शास्त्रे, उपयोजित शास्त्रे, विज्ञान, विधी, स्थापत्यकला, व्यवस्थापन या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी अभ्यासक्रम करु इच्छिणाऱ्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना या योजनेतंर्गत शिष्यवृत्ती मिळू शकते. परदेशातील विद्यापीठांमध्ये स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी, बर्कले युनिव्हर्सिटी, विस्कॉनसिन युनिव्हर्सिटी, एमआयटी, मिनेसोटा युनिव्हर्सिटी, पेन युनिव्हर्सिटी, इलिनॉइस युनिव्हर्सिटी, जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी, हार्वर्ड युनिव्हर्सिटी, मिशिगन युनिव्हर्सिटी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ॲण्ड पोलिटिकल सायंस, केंब्रिज युनिव्हर्सिटी, नार्थ इस्टर्न युनिव्हर्सिटी इत्यादींचा समावेश आहे.
या योजनेंतर्गत २० लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य केलं जातं. ते व्याजमुक्त(इंटरेस्ट फ्री लोन) कर्ज स्वरुपातील आहे.

आणखी वाचा : यशस्विनी : दुबईमध्ये योग लोकप्रिय करणारी ‘ती’ आहे तरी कोण?

अटी आणि शर्ती
(१) उमेदवार भारतात राहणारा भारतीय नागरिक असावा/ असावी.
(२) संबंधित उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा कमी असावे.
(३) विद्यापीठ अनुदान आयोग अथवा शासन मान्यतप्राप्त विद्यापीठ अथवा शैक्षणिक संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असावी.
(४) परदेशातील दर्जेदार विद्यापीठामध्ये पदव्युत्तर पदवी/ पीएचडीसाठी प्रवेश मिळालेला असावा.
(५) ज्या विद्यार्थीनीं/ विद्यार्थ्यांनी परदेशातील अभ्यासक्रमासाठी अर्ज केला असेल व ज्यांना अद्याप संबंधित विद्यापीठ/शैक्षणिक संस्थेचे स्वीकृती/प्रवेश प्रत्र आले नसेल, असेही उमेदवार शिष्यवृत्तीसाठी अर्ज करु शकतात. मात्र, संबंधित विद्यापीठात प्रवेश मिळाल्याचं अंतिम स्वीकृतीपत्र आल्यावरच त्यांचा शिष्यवृत्तीसाठी विचार केला जातो.

आणखी वाचा : यशोगाथा : ‘ती’ने केली पोलिओवर मात अन् झाली डॉक्टर!

या शिष्यवृत्तीसाठी केवळ ऑनलाइन पध्दतीनेच अर्ज करता येतो. यासाठी संस्थेच्या संकेतस्थळावर जाऊन लॉग-इन करावं लागतं.
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करुन त्यातील निवडक विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावलं जातं.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
(१) पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व वर्षांच्या स्वाक्षरांकित गुणपत्रिका,
(२) गेट- ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग, कॅट-कॉमन ॲडमिशन टेस्ट, जीआरई- ग्रॅज्युएट रिकॉर्ड एक्झामिनेशन, जीमॅट- ग्रॅज्युएट मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट अशा पात्रता परीक्षांच्या स्वाक्षरांकित प्रती,
(३) स्वीकृतीपत्र आणि शैक्षणिक शुल्काची माहिती,
(४) प्रतिष्ठित व्यक्तिंचे संदर्भ पत्र,
(५) (असल्यास) – इतर दुसरी शिष्यवृत्ती, अर्थसहाय्य, शुल्कातून सूट आदींची कागदपत्रे,

आणखी वाचा : विद्यार्थिनींना देशापरदेशातील शिक्षणासाठी व्याजमुक्त अर्थसहाय्य

(६) सर्वाधिक नजिकच्या काळातील पालकांचे आयकर प्रमाणपत्र,
(७) नजिकच्या काळातील स्वाक्षरांकित पासपोर्ट आकाराचे छायाचित्र.
या अर्थसहाय्याच्या माध्यमातून आतापावेतो ३०० हून अधिक विद्यार्थिनी /विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेणं शक्य झालं आहे. या सर्वांची उत्तम संपर्कसाखळी या फाऊंडेशनने तयार केली असून, त्यांच्यामार्फत नव्या शिष्यवृत्तीधारकांना करिअर संदर्भात सर्वतोपरी सहाय्य केलं जातं. जुने शिष्यवृत्तीधारक नव्यांसाठी मार्गदर्शक (मेन्टॉरची भूमिका बजावतात.)
संपर्क – नरोत्तम शेखसारिया फांऊडेशन,पहिला माळा, निर्मल बिल्डिंग ,नरिमन पाईंट, मुंबई- 400021,

संकेतस्थळ – http://pg.nsfoundation.co.in/

Story img Loader