डॉ. अमित पी. घावडे
जागतिक आरोग्य संघटना (WHO)आणियुनिसेफच्या शिफारसीनुसार, बाळाला जन्मानंतर पहिल्या सहा महिन्यां पर्यंत केवळ आईचे दूध देणे महत्त्वाचेआहे. मात्र, बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव, अपुरी झोप, प्रसूती नंतर लवकर कामावर रूजू होण्याची गरज, विभक्त कुटुंबपद्धती, सोशल मीडिया वरील चुकीची माहिती आणि कुटुंबीयां कडून पुरेसा आधार न मिळणेयामुळे अनेक नवमातांसाठी स्तनपानाचा प्रवास पूर्वीपेक्षा अधिक आव्हानात्मक ठरतआहे.
स्तनपान ही केवळबाळाला पोषण देण्याची प्रक्रिया नसून आई आणि बाळाच्याआरोग्याशी जोडलेला महत्त्वाचा टप्पा आहे. अनेक मातांना दूध कमी येत असल्याचा गैरसमज होतो, तर काही वेळा बाळाला योग्य पद्धतीने स्तनपान करवता येत नाही.स्तनांमध्ये वेदना, स्तनाग्रांना होणारी जखम किंवा दुखणे, योग्य स्तनपान तंत्राची माहिती नसणे आणि मानसिक ताण यामुळेही अडचणी निर्माण होऊ शकतात. योग्य वेळी मार्गदर्शन न मिळाल्यास काही माता काही आठवड्यांतच स्तनपान थांबवण्याचा निर्णय घेतात.
आजच्या काळात सोशल मीडियामुळे नवमातांकडे माहितीच्या अनेक स्रोत उपलब्ध आहेत. मात्र, सोशल मीडियावर मिळणारी प्रत्येक माहिती योग्य किंवा वैज्ञानिक असेलच असे नाही. इतर मातांशी तुलना, अवास्तव अपेक्षा आणि चुकीचे सल्लेयामुळे अनेक मातांचा आत्मविश्वास कमी होतो.प्रत्यक्षात स्तनपानातील अनेक अडचणी योग्य मार्गदर्शन आणि सुरुवातीच्या काळात मिळणाऱ्या मदतीमुळे सहज दूर करता येतात.त्यामुळे आईने समस्या मनात न ठेवता डॉक्टर किंवा स्तनपान तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
स्तनपानातील प्रमुख आव्हाने
* प्रसूतीनंतरअपुरीझोपआणि शारीरिक थकवा.
* वाढता मानसिक ताण आणिप्रसूतीनंतरचीचिंता.
* प्रसूतीनंतरलवकरनोकरीवररुजूहोण्याचीगरज.
* कुटुंबीयकिंवाजोडीदाराकडूनपुरेसाभावनिक व व्यावहारिक आधार न मिळणे .
* विभक्त कुटुंबपद्धतीमुळे अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन न मिळणे.
* सोशल मीडियावरीलचुकीचीमाहितीआणि गैरसमज.
* कामाच्याठिकाणीस्तनपानासाठी योग्य सुविधा किंवापुरेसावेळ उपलब्ध नसणे.
* दूध कमी येत असल्याचा गैरसमज होऊन बाळाचे पोट भरत नसल्याचे वाटणे आणि लवकर फॉर्म्युला दूध सुरू करणे.
स्तनपान यशस्वी होण्यासाठी केवळ आईची इच्छा शक्ती पुरेशीन सूनतिच्या आजूबाजूचे वातावरणही तितकेच महत्त्वाचे असते. आईलापुरेशी विश्रांती, पौष्टिक आहार, मानसिक आधार आणि योग्य स्तनपान तंत्राची माहिती मिळाल्यास सुरुवातीच्या अनेक अडचणी टाळता येऊ शकतात.
डॉक्टरांच्या मते, नवमातांनी स्तनपान करताना वेदना, बाळाला दूध पिण्यात अडचण, बाळाचे वजन अपेक्षेप्रमाणे न वाढणे किंवा दूध कमी येत असल्याची चिंता जाणवल्यास स्वतःहून निर्णय घेण्याऐवजी त्वरित वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. योग्य वेळीमिळणारे मार्गदर्शन, कुटुंबाचा आधार आणिआईचा आत्मविश्वास हे यशस्वी स्तनपानासाठी महत्त्वाचे घटक आहेत.
