नीलिमा किराणे

मी तिसरीत असताना वडिलांच्या बदलीमुळे आम्ही नव्या गावात राहायला गेलो. नव्या शाळेतल्या पहिल्या मैत्रिणीनं एकदा सलगी करत विचारलं, “तुझी ‘चीड’ काय आहे सांग ना, मी सांगणार नाही कुणाला.”
“चीड? म्हणजे?”
“म्हणजे, जे म्हटल्यावर तुला खूप राग येतो. इतका की तू त्या चिडवणाऱ्याला मारायलाही जातेस?”
असं काही असतं हे मला माहीत नव्हतं. मग तिनं उदाहरणं देऊन समजावलं. एका मुलाला ‘चुकलेले शब्द दहा वेळा शब्द लिही’ अशी शिक्षा नेहमी व्हायची. त्याची चीड होती, ‘दहा’ हा आकडा. एकीनं ‘शेळी’ हा ‘रानटी प्राणी’ आहे, असं उत्तर दिलं होतं. तिला मुलं, ‘शेळी’, या नावानं चिडवायला लागले. साहजिकच शेळी तिची ‘चीड’ झाली. वर्गातल्या मुलामुलींच्या जोड्या लावलेल्या असायच्या, तेव्हा जोडीतल्या मुलाचं किंवा मुलीचं नाव ही त्यांची ‘चीड’ असायची. त्यावरून कुणी चिडवलं तर ती मुलं-मुली चिडायची. मग मुलींची भांडणं, मुलांच्या मारामाऱ्या, शत्रुत्व, गटबाजी, टोमणे वगैरे गोष्टी व्हायच्या, त्यातून नवी ‘चीड’ जन्माला यायची. थोड्या चिडवाचिडवीनंतर दुर्लक्ष करून हसून सोडून देणाऱ्या काही मुलांना कायमची चीड नसायची. त्यांची भांडणंही कमी व्हायची आणि शाळेत शत्रूही कमी असायचे.

Stop Breaking Nails While Washing dishes Cooking With Simple Remedies Skin Expert Tells How To Make Nail Grow Faster & thick
भांडी घासली, स्वयंपाक केला तरी नखे सहज तुटणार नाहीत यासाठी डॉक्टरांनी सांगितले उपाय; या टिप्स हात करतील सुंदर
Framework That Stunts Progress
जिंकावे नि जगावेही : प्रगतीला खीळ घालणारी चौकट
Banana peel Benefit
केळ्याची साल कचरा समजून फेकू नका, स्वयंपाकघरातील ‘या’ तीन कामासाठी करू शकता वापर
How to deal with a difficult boss
तुमचा बॉस निर्दयी स्वभावाचा आहे का? खडूस बॉसबरोबर कसे वागावे? तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्स….

आणखी वाचा : मी असुनही नसल्यासारखीच…, नवरा दुर्लक्ष करत असेल कर ‘या’ ५ टिप्स वाढवतील संसारात गोडवा

‘माझी चीड’ हे लहानपणीचं प्रकरण मोठेपणीही रूप बदलून समोर येतच असतं असं अनेकदा जाणवतं. एखादी डॉक्टर सांगते, “आम्ही दोघंही बीझी, रात्री जेवतानाच जरा निवांत भेटतो. त्याचा पहिला प्रश्न असतो, “किती पेशंट झाले आज?” माझं डोकंच सटकतं. ‘कशी आहेस, दिवस कसा गेला?’ वगैरे काही नाही. मग मी पण फटकन काहीतरी बोलते आणि भांडण सुरू होतं.” एखादा मुलगा सांगतो, “माझ्याकडून जराही काही चुकलं, की ‘वाटलंच होतं मला’ असं आई म्हणणारच. माझा संताप होतो. मग मी मुद्दाम दुर्लक्ष करतो किंवा आईच्या चुका काढतो.” थोडक्यात, ‘आज किती पेशंट?’ किवा ‘वाटलंच होतं मला’ हे शब्द या त्यांच्या ‘चीड’ असतात. “तुम्ही तुमच्या आईचंच ऐकणार” किंवा “तू तुझ्या बायकोचंच ऐकणार” अशी वाक्यं बहुसंख्य विवाहित पुरुषांची ‘चीड’ असतात.

आणखी वाचा : यशस्विनी, करिअर : जपानच्या महिला क्रिकेट टीममध्ये चक्क मराठी मुलगी! (उत्तरार्ध)

एखादीचा नवरा तिला न सांगता लहानमोठे निर्णय घेतो आणि वर सहजपणे, ‘अगं, एवढं काय त्यात?’ म्हणतो, तेव्हा ‘एवढं काय त्यात?’ हे शब्द कुणीही उच्चारले तरी तिचा दर वेळी भडका उडतोच. “एवढं काय त्यात? या वाक्यावर समजा तू नाही भडकलीस तर काय घडेल?” असं विचारलं तर ती म्हणते, “असं कसं? नवऱ्यानं एवढे वेळा हे केलंय, की कुणीही ‘एवढं काय त्यात?’ म्हटल्यावर मला गृहीत धरल्याचा राग येणारच आणि भांडणं होणारच ना?” थोडक्यात, ‘‘एवढं काय त्यात?’ हे शब्द माझी ‘चीड’ आहेत हे एकदा ठरल्यावर, माझं चिडणं ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते ना?” असं तिचं म्हणणं असतं. खरं तर हे ‘ट्रिगर पॉइंटस्’ आपणच ठरवून घेतलेले असतात. पूर्वी कधीतरी आपण अशा शब्दांनी, वाक्यांनी दुखावले गेलो असतो हे खरं, पण कालांतराने ते दुखावणं सोडून देण्याऐवजी आपण कुरवाळत राहतो. ‘ते’ शब्द किंवा ते वागणं समोरच्याकडून येणार या कल्पनेनंही कासावीस होतो. परिणाम असा, आपली ‘चीड’ एकदा सर्वांना माहीत झाल्यावर ती वापरून आपल्याला पुन्हापुन्हा जखमी करणं किंवा भडकवणं इतरांना सोपं जातं. वर चिडल्यावर ‘ही तमाशे करते’, ‘तो ऐकूनच घेत नाही’ अशी स्वत:ची प्रतिमा करायला आपण स्वत:च मदत करतो, जी प्रतिमा आपली नवी ‘चीड’ बनते. ‘चीड’चा हा चक्रव्यूह बरीचशी आपल्या मनाचीच करणी आहे हे जेव्हा स्पष्ट होईल, तेव्हा बाहेर पडायचा रस्ताही आपोआप समजेल. अमुक ‘माझी चीड आहे’ आणि त्यानंतर चिडायचंच ही सवय कुरवाळत राहायची, की ‘अमुक माझी चीड नाही, किंवा मला ‘चीड’च नाही असं म्हणून सोडून द्यायचं हा ‘चॉइस तर आपलाच’ असतो, नाही का?”
(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत.)
neelima.kirane1@gmail.com