जगातल्या कोणत्याही स्त्रीला न चुकलेला त्रास म्हणजे मासिक पाळीचा (Menstrual Cycle). मासिक पाळी सुरु असताना प्रत्येक स्त्रीला काही शारीरिक आणि मानसिक समस्या भेडसावतात. हा त्रास कसा कमी करायचा यावर अनेक सल्ले, टीप्स नेहमीच दिल्या जातात. पाळीचा खूपच जास्त त्रास होत असेल तर नक्कीच डॉक्टरला दाखवून त्यांच्या सल्ल्याने औषधे घेणे केव्हाही चांगले. पण अनेकदा घरगुती उपायांनी हा त्रास कमी होऊ शकतो. यासाठी आपल्या स्वयंपाक घरातला, मसाल्यातला एक पदार्थ आपल्याला अगदी उपयुक्त ठरू शकतो. तो म्हणजे दालचिनी (Cinnamon)!

आणखी वाचा : सॅनिटरी पॅड्समधल्या ‘या’ रसायनामुळे कॅन्सरचा धोका? जाणून घ्या नेमकं प्रकरण काय

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन
How to choose a perfectly ripe pomegranate with expert tips
रसाळ, लाल दाणे असलेले डाळिंब कसे ओळखावे? उत्तम प्रकारे पिकलेले डाळिंब कसे निवडावे? तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्स

आपल्या सगळ्यांच्या घरात दालचिनी असतेच. जेवणाची चव वाढवण्यासाठी दालचिनीचा वापर करतात हे तर माहिती असेलच. पण हीच दालचिनी मासिक पाळीच्या त्रासावर अगदी जादूसारखं काम करते. दालचिनीचा उपयोग मासिक पाळीचा त्रास कमी होण्यासाठी होऊ शकतो. यामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत. तसंच दालचिनीमध्ये झिंक, व्हिटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, लोह आणि फॉस्फरस हे सगळं तर असतंच. पण दालचिनी अँटीऑक्सिडंट (Anti oxidant ) म्हणून अगदी उत्तमरित्या काम करते.

आणखी वाचा : कोण होत्या मेरी थार्प ?

पाळीमध्ये ओटीपोटात दुखणं, मळमळ, उलट्या, थकवा, डोकेदुखी हे शारीरिक त्रास तर अगदी सर्वसामान्य आहेत. १५ ते ३० या वयोगटातील तरुणींमध्ये हा त्रास होण्याचं प्रमाण जास्त आहे. अशावेळेस पेनकिलर घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. पण एकदम थेट पेनकिलर घेण्याऐवजी दालचिनीची पावडर घेतली तर त्यानं बराच फरक पडतो असं संशोधनातूनही सिध्द झालं आहे. यामुळे पाळीचा त्रास कमी होण्यात नक्की मदत होते. इतकंच नाही तर पाळीच्या वेळेस स्त्री अगदी वेगळ्या मनस्थितीत असते. ही उदास मनस्थिती बदलण्यातही दालचिनी पावडर अगदी मस्त काम करते. या काळात होणारी चिडचिड, अस्वस्थता हे सगळं हार्मोनल बदलांमुळे होत असतं.
चला तर मग पाहूयात मासिक पाळीचा त्रास कमी होण्यात दालचिनीचा कसा उपयोग होतो ते –

आणखी वाचा : तोफांच्या माऱ्याने जमलं नाही, ते डासांनी…

दालचिनी आणि कोमट पाणी-
पाळीमुळे होणाऱ्या असह्य वेदना कमी करण्यासाठी कोमट पाण्यातून (Warm Water) दालचिनी पावडर घेतल्यास वेदना कमी होतात.
पाळी सुरु असताना बऱ्याच स्त्रियांना ओटीपोटात दुखतं. दालचिनी पावडर कोमट पाण्यातून घेतल्याने पोटात येणाऱ्या कळा कमी होतात.
पाळीमध्ये काहीजणींना मळमळ किंवा उलट्या होतात, गरगरणे किंवा चक्कर येण्याचा त्रास होतो, अशक्तपणा जाणवतो, कोमट पाण्यातून दालचिनी पावडर घेतल्यास हे सगळे त्रास कमी होतात.

आणखी वाचा : उंचीनुसार वजन किती हवं? डाएटमध्ये ‘८० टक्के’ रुल काय?.. ‘हे’ ५ नियम पाळून लग्नसराई गाजवा!

दालचिनी तेल
मासिक पाळीत मूड स्विंग्जचा अनुभव तर प्रत्येक स्त्रीला येतो. विनाकारण चिडचिड, निराश, संताप येतो. या सगळ्यांवरही दालचिनी पावडरचा अगदी उपयोग होतो. थोडंसं दालचिनी तेल पाठीला आणि पोटाला लावल्यास त्यामुळे मूड चिडचिड, थकवा कमी होतो. किंवा दालचिनी तेलाचे अगदी दोन थेंब तुम्ही तुमच्या वाफ घेण्याच्या भांड्यात घालून त्यानं वाफ घ्या. त्यानंही मूड बदलण्यास मदत होते. दालचिनीचा सुगंध आपली मनोवृत्ती प्रसन्न करतो.

आणखी वाचा : पुरुष इतके हिंस्त्र का आहेत?

साध्या पाण्यातून दालचिनी पावडर घेण्याऐवजी कोमट पाण्यातून घेतल्यास जास्त फायदा होतो. तुम्हाला आवडत असेल तर दालचिनीचा चहाही करून पिऊ शकता. दालचिनी पावडर कोमट दुधातून घेतल्यास किंवा दालचिनी तेलाने पोटावर थोडा मसाज केल्यास बराच फरक पडू शकतो. यामुळे असह्य वेदना थांबतात आणि सूजही कमी होते.
-पाळीमध्ये काही स्त्रियांना अति रक्तस्त्राव होतो. त्याममुळे खूप अशक्तपणा (Weakness) येतो, अस्वस्थ वाटतं. नोकरी करणाऱ्या, कामासाठी घराबाहेर असणाऱ्या स्त्रियांना तर अति रक्तस्त्राव खूप त्रासदायक ठरतो. अशा परिस्थितीत दालचिनीमुळे नक्की फायदा होऊ शकतो.
-काही स्त्रियांना पाळीमध्ये रक्ताचे क्लॉट्स (clots) म्हणजे गाठी होतात. या त्रासावरही दालचिनीची पावडर अत्यंत उपयुक्त ठरते असा अनेकजणींचा अनुभव आहे. तुमच्या जेवणात दालचिनीचा वापर केल्यास तुमचा मूड तर फ्रेश होतोच पण त्यामुळे तुम्हाला बरंही वाटतं.
-पाळीच्या त्रासात दालचिनी पावडरमुळे तुमचा थकवा आणि तणावही (Stress and Strain) कमी होतो. कोमट पाण्यात दालचिनी पावडर मिसळून ते पाणी दिवसभर थोडं थोडं पित राहिल्यास बराच फरक पडतो. अर्थात दोन किंवा तीन ग्लासांपेक्षा जास्त हे पाणी पिऊ नये. आपल्या रोजच्या पाण्याचा हा पर्याय नाही हेही आवर्जून लक्षात ठेवा.

आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : स्तन मोठे करता येतील

दालचिनी आणि मध
दालचिनी आणि मध (Honey) हे दोन्ही अँटीऑक्सिडंट्स म्हणून ओळखले जातं. हे दोन्ही एकत्र घेतल्यास अनेक रोगांना प्रतिबंध होऊ शकतो. मधामध्ये दालचिनी पावडर मिसळून घेतल्यास पाळीबद्दलच्या बऱ्याच तक्रारी कमी होतात. पाळीच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये मध आणि दालचिनी कोमट पाण्याबरोबर घेतल्यास वेदना कमी होतातत आणि मनस्थितीतही फरक पडतो. तुम्हाला हव्या असल्यास यामध्ये मनुकाही घालू शकता.

आणखी वाचा : मेन्टॉरशिप : लीना मोगरे – अनुभवच माझे मेन्टॉर्स

फक्त भारतातच नाही तर जगभरातील सर्वच देशांमध्ये दालचिनीला अत्यंत औषधी म्हणून गणले जाते. आपल्याकडे मसाल्यामध्ये तर दालचिनीचा वापर केला जातोच. पण त्याचबरोबर अनेक आजारांवरही दालचिनी गुणकारी आहे. स्त्रियांच्या अनेक समस्यांवर दालचिनीचा औषध म्हणून उपयुक्त आहे. दालचिनी ही एक औषधी वनस्पती आहे. त्याला इंग्रजीमध्ये सिनॅमन आणि भारतात दालचिनी म्हटले जाते. गुणकारी असली तरी दालचिनीचा अति वापर यकृतासाठी घातक ठरू शकतो. पण रोजच्या वापरातली दालचिनी स्त्रियांच्या नको वाटणाऱ्या त्रासावर मात्र अगदी उपयुक्त आहे.

(शब्दांकन : केतकी जोशी)