थंडीत संपूर्ण शरीरावरचीच त्वचा कोरडी पडते. त्यातही तोंड, हात, तळहात, पावलं आणि तळपाय नेहमी उघडे राहात असल्यामुळे त्या ठिकाणची त्वचा आणखी कोरडी होते. अनेक लोक थंडीत बाहेर पडताना किंवा ऑफिसला जाताना पायमोजे घालतात. परंतु आपल्याकडे घरातल्या घरात किंवा झोपताना मात्र सहसा पायमोजे वापरले जात नाहीत. त्यामुळे पावलं आणि तळपाय शुष्क होऊन पांढरे पडतात आणि अनेकदा त्यांना भेगा पडतात. या भेगांची समस्या वाढली, तर फार त्रासदायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. चालताना भेगा पडलेल्या ठिकाणी तीव्र वेदना होणं, या भेगांमधून रक्त येणं असे प्रकारही होऊ शकतात. त्यामुळे भेगा पडूच नयेत म्हणून प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यासाठी काय करता येईल? ‘अमेरिकन अकॅडमी ऑफ डरमॅटोलॉजी असोसिएशन’नं दिलेल्या या काही टिप्स पाहू या.

आणखी वाचा : आहारवेद : कढीपत्ता- अनियमित मासिक पाळीवर गुणकारी

children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…
gut health diet
आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘या’ बाबी आवश्यक; अन्यथा पोटाची दुर्दशा
diy skin care prevent foot odour this summer expert tips on how to keep your feet fresh all day
उन्हाळ्यात घामामुळे पायांना दुर्गंधी येतेय? मग फॉलो करा डॉक्टरांनी सांगितलेले ‘हे’ सोपे उपाय

थंडीत आंघोळ कमी वेळात आटपा-
थंडीत गरम पाण्यानं आंघोळ करण्यासारखं सुख नाही. परंतु हात-पाय अधिक कोरडे होणं टाळायचं असेल, तर खूप वेळ आंघोळ करून चालणार नाही. तेव्हा थंडीत ५ ते १० मिनिटांत आंघोळ आटोपलेली बरी.

सौम्य क्लिंझर वापरा-
आपण सहसा चेहऱ्याची खूप काळजी घेतो. चेहऱ्यावर वापरण्यासाठीची उत्पादनं विचारपूर्वक निवडतो. परंतू हातापायांना लावण्याची उत्पादनं खरेदी करतानाही विचार करायला हवा. पायांना लावण्यासाठीही फार कठोर (harsh) साबण वापरून चालणार नाही. हातापाय धुण्यासाठीसुद्धा सौम्य साबण किंवा सौम्य क्लिंझर वापरलेलं चांगलं, म्हणजे त्या त्वचेतला ओलावा टिकून राहू शकतो. त्वचा खूप संवेदनशील असेल, तर बिनवासाचा (फ्रेगरन्स फ्री) साबण वा क्लिंझर वापरा.

आणखी वाचा : आईने कट रचला, बाबांनी आठ दिवस सलग..केरळच्या Lesbian तरुणीचा ‘हा’ अनुभव आणेल डोळ्यात पाणी

आंघोळीनंतर तळपायांनाही ‘मॉईश्चराईझ’ करायला हवं-
आंघोळीनंतर आपण चेहऱ्याला आणि अंगाला मॉईश्चरायझर लावतो. पण त‌ळपायांना भेगा पडत असतील, तर आंघोळीच्या नंतर ५ मिनिटांच्या आत अंगाबरोबरच तळपायांना- म्हणजे टाचांनाही मॉईश्चराईझ करायला हवं. त्यासाठी तळपाय व टाचांना लावण्यासाठी खास क्रीम्स मिळतात, ती वापरता येतील. टाचांना लावायच्या मॉईश्चरायझिंग क्रीममध्ये काय पहावं? त्यात १० ते २५ टक्के युरिया, अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड किंवा सॅलिसायलिक ॲसिड हे घटक असतील तर फायदेशीर ठरतील. आंघोळीनंतर लगेच शरीरात अधिक प्रमाणात ओलावा असतो, तेव्हाच मॉईश्चरायझेशन मिळाल्यास फायदा होतो.

झोपताना टाचांना पेट्रोलियम जेली लावा-
पेट्रोलियम जेली घट्ट असते तसंच त्यामुळे कोरडी त्वचा लगेच मऊ पडते. त्यामुळे रात्री झोपताना तळपाय आणि टाचांना पेट्रोलियम जेली लावल्यास उपयुक्त ठरेल. ती पांघरूणाला लागू नये म्हणून झोपताना मोजे घातलेले चांगले.

आणखी वाचा : केम्ब्रिज डिक्शनरीमध्ये बदलण्यात आली ‘महिला’ शब्दाची व्याख्या; जाणून घ्या काय आहे नवा अर्थ

टाचांना जपा-
तळपायांना भेगा पडण्याची शक्यता असेल किंवा भेगा पडल्या असतील, तर योग्य प्रकारची पादत्राणं वापरणं फार आवश्यक आहे. मागून उघडी असणारी किंवा पायांना नीट न बसणारी पादत्राणं वापरू नयेत. पायांच्या भेगांमध्ये जंतूंना प्रवेश मिळू नये याची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी दिवसाही मोजे घालून वावरता येईल. हल्ली ‘लिक्विड बँडेज’ हा एक प्रकार मिळतो. ते लहान स्वरूपातल्या जखमांवर वापरता येतं. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं ते पायांच्या भेगांसाठी वापरता येईल. काही वेळा काही आजारांमध्येही पायांना भेगा पडू शकतात. उदा. मधुमेह. पायांच्या खूपच भेगा पडल्या असतील किंवा वर दिलेल्या टिप्स अवलंबल्यानंतरसुद्धा भेगा बऱ्या होत नसतील, तर मात्र आपल्या डॉक्टरांचा किंवा त्वचारोगतज्ञांचा सल्ला घ्यावा.