डॉ. मेधा ओक, मधुमेह तज्ज्ञ

पूर्वीच्या शांत आणि समाधानी जीवनशैलीची जागा नवीन ‘फास्ट लाइफस्टाइल’ने म्हणजेच चंगळवादी जीवनशैलीने घेतली आणि आजारांना निमंत्रणच दिले! अर्थात हे काही एका दिवसात झाले नाही. जस जशी जीवनशैली बदलू लागली, चुकीची होऊ लागली तसतसे आजारांचे स्वरूप अक्राळविक्राळ होऊ लागले. अधिक अपेक्षा, हाव, चुरस, नोक-यांमध्ये ‘हायर ॲण्ड फायर’ संस्कृती आणि आजारांसाठी वाढणारा खर्च, असं दुष्टचक्र सुरू झालं.

land reforms
UPSC-MPSC : भारतातील जमीन सुधारणा अपयशी का ठरल्या? त्यामागची नेमकी कारणे काय होती?
Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….

आणखी वाचा : मासिक पाळी दरम्यान ‘या’ चुका टाळाच; नाहीतर भोगावे लागतील गंभीर परिणाम

विज्ञानाच्या प्रगतीमुळे चांगली औषधे, सुलभ उपचारपद्धती आणि निदानासाठीची सामग्री उपलब्ध झाली, पण दुर्दैवाने आजारांची कारणेही वाढली. मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, स्थूलता या समस्या मोठ्या प्रमाणावर पसरू लागल्या. आहार, व्यायाम, चैन आणि आराम या सगळ्यांच्या संकल्पना बदलत गेल्या. आपल्या परंपरागत आहाराच्या, व्यायामाच्या पद्धती ‘ओल्ड फॅशन्ड’ वाटू लागल्या. नवीन आहारपद्धती, व्यायाम, चैनीच्या गोष्टी बरोबर आहेत का, हे पडताळायला वेळच नाही हल्लीच्या पिढीकडे! त्यामुळे ‘आता तरी जागे व्हा’ हे आवर्जून सांगावंसं वाटतं.

आणखी वाचा : त्वचा कोरडी पडते? अशी घ्या काळजी…

भारतातील ‘टाईप टू’ मधुमेही तसंच आशिया व आफ्रिका खंडातील मधुमेही हे पश्चिमेकडील मधुमेहींपेक्षा वेगळे आहेत. एका पाहणीत असं लक्षात आलं आहे, की बहुतांशी भारतीय मधुमेही जाडे, स्थूल नसून बारीक असतात (लीन डायबेटिक). ९५ टक्के मधुमेहींना ‘टाईप टू मधुमेह’ असतो. या मधुमेहींचे वजन पुष्कळदा सामान्य असते किंवा कधी कधी २० टक्के कमीही असते. ८० टक्के मधुमेही हे मध्यम वजनी होते. या कमी वजनाच्या व्यक्तींमधील ‘टाईप टू’ मध्ये न्यूरोपॅथी, संसर्ग, अर्धांगवायू हे जास्त दिसून येते, तर उच्च रक्तदाब व हृदयविकार त्या मानाने कमी. याउलट वजन जास्त असल्यास उच्च रक्तदाब व हृदयविकार जास्त आढळतो.

आणखी वाचा : मधुमेहापासून बचावासाठी काय कराल, काय टाळाल?

‘बीएमआय’ म्हणजेच ‘बॉडी मास इंडेक्स’ मोजण्यासाठी BMI= Weight in KG / Height in meter square हे सूत्र वापरतात. स्त्रियांचा बीएमआय २५ च्या वर व पुरुषांचा २७ च्या वर असल्यास त्यांना आपण वजन जास्त असल्याचे सांगतो. ३० च्या वर BMI असल्यास अति-लठ्ठपणा असे वर्गीकरण करण्यात येते. आपल्याकडे लठ्ठपणा याला आजार मानत नाहीत. वास्तविक हेच इतर आजारांचे मूळ कारण असून मधुमेह, उच्च रक्तदाब, अथरोस्क्लेरोसिस यांना स्थूलता आमंत्रण देते.

आणखी वाचा : मेन्टॉरशिप : सुप्रिया सुळे -‘उत्तम ते सर्वोत्तम’ या प्रवासात लाभले अनेक मेन्टॉर्स!

आपल्याकडील लोकांचा पोटाचा घेर वाढलेला दिसतो. ते ३० ते ३५ वयानंतर नोकरी व्यवसायात स्थिर झाल्याने सुबत्ता येते व व्यायामाचा अभाव, अशा एकत्रितपणे गोष्टी घडतात आणि पोटाचा घेर वाढत जातो. ही वाढलेली चरबी म्हणजेच ‘ट्रंकल किंवा सेंट्रल ओबेसिटी’. ही इन्सुलिनला नीट काम करू देत नाही आणि त्यामुळे रक्तातील साखर व अतिरिक्त चरबी अनियंत्रित होते. जेव्हा रक्तशर्करा खूप वाढते तेव्हा बीटा पेशी पण नीट काम करू शकत नाहीत आणि रक्तशर्करा कमी करण्यात असफल ठरतात.

आणखी वाचा : हिवाळ्यासाठी तंतूमय पदार्थ आवश्यक

स्त्रियांचे स्वत:कडे दुर्लक्षच!
भारतात सर्व कुटुंबाची जबाबदारी महिलांवर पडते. मधुमेह लिंगभेद करत नसला, तरी भारतात स्त्री मधुमेहींकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष होते. एक तर त्या स्वतःची काळजी घेत नाहीत आणि दुसरं म्हणजे कुटुंबातील सदस्यही लक्ष देत नाहीत. त्यामुळे बरेच वेळा त्यांचे निदानच होत नाही आणि झाले तरी उपचार व्यवस्थित घेतले जात नाहीत. आजकाल लॅपटॉपवर काम करणाऱ्या, मोबाइलवर दंग असणाऱ्या पुरुषांच्या बरोबरीने त्याच क्षमतेने काम करणाऱ्या स्त्रिया दिसतात. त्यांच्या मदतीला असतात आधुनिक उपकरणे. घरची तसेच ऑफिसची जबाबदारी स्त्रिया तितक्याच ताकदीने सांभाळतात. पण, त्याचबरोबर त्यांची झालेली ओढाताण, तारेवरची कसरत पटकन लक्षात येत नाही. या स्त्रियांचे आहाराकडे व्यायामाकडे बरेच दुर्लक्ष होते. घरचे, ऑफिसचे ताणतणाव पेलताना त्यांची मानसिक शांतता बिघडते. आजारांना लहान वयातच आमंत्रण मिळते. याला बळी पडणारा वयोगट म्हणजे : वय वर्ष २५ ते ४०.

आणखी वाचा : नातेसंबंध : विवाहबाह्य आकर्षण वाटतंय?

स्त्रियांकडे या वयात निसर्गाने एक मोठी जबाबदारी दिलेली आहे ती म्हणजे प्रजनन क्षमता, हे आपण कधीच विसरून चालणार नाही. वरील सगळ्या समस्या प्रजननशक्ती कमी करतात किंवा क्वचितप्रसंगी नाहीशी करू शकतात व स्त्रियांना वंध्यत्व येते.
अनियंत्रित मधुमेह असताना जर स्त्री गर्भार राहिली, तर गर्भपात, अपुऱ्या दिवसांचे, जन्मजात दोष असलेले, कमी वजनाचे बाळ जन्माला येऊ शकते. त्यामुळे गर्भधारणेआधीच खूप काळजी घेणे आवश्यक आहे. मधुमेहावर नियंत्रण ठेवल्यास वंध्यत्वावर मात करणे सहज शक्य आहे. तसेच त्यामुळे त्या स्त्रीला निरोगी बाळाला जन्म देणे सुकर होते.
oakmedha51@gmail.com