दिंडोरी पोलीस निरीक्षक शेगर यांनी अवैध दारू विक्रेत्यांकडून महिलांना होत असलेल्या त्रासाचा विचार करता महिलांच्या मदतीने या प्रश्नावर तोडगा काढला. दिंडोरी तालुक्यातील वणी खुर्द येथील महिला गावातील अवैध दारू विक्री बंद व्हावी व संबंधितांवर कारवाई व्हावी यासाठी मोर्चा काढत होत्या. पोलीसांकडून संबंधितांवर कारवाई करून देखील यावर आवश्यक तो परिणाम होत नव्हता. उलटपक्षी संबंधित दारू विक्रेत्यांकडून सदर महिलांना दमदाटी करणे, शिविगाळ करणे असे प्रकार वाढल्याने महिलांची सुरक्षादेखील ऐरणीवर आली होती. यापार्श्वभूमीवर शेगर यांनी पुढाकार घेऊन गाव पातळीवर बैठका घेत ग्रामसभेत एकमताने गावात दारू बंदीचा निर्णय घेतला…

ग्रामीण भाग म्हटलं की अवैध धंद्याचा सुळसुळाट… त्यातही गावठी दारू आणि त्यामुळे होणारी भांडणं ही नेहमीची… देशी दारूच्या आहारी गलेल्या घरातील कर्त्या पुरूषामुळे घरातील बाई आणि मुलं पुरती होरपळून जातात. घर-संसार पणाला लागतो. ज्यांना चांगली दारू परवड नाही ते गावठी दारूचा अड्ड्याची वाट धरतात. नवसागर आणि कच्चा गूळ यांपासून तयार होणारी ही दारू आरोग्यास घातक आहेच, पण तिच्या नशेमुळे अनेक संसार उद्ध्वस्त होतात… परिणामी गुन्हेगारी वाढते. दारू बंदी व्हावी यासाठी या महिला आपापल्या परीने धडपड करतात. मात्र काही वेळासाठी तो अड्डा बंद होतो. काही दिवसानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती… नेमका हीच समस्या लक्षात घेऊन दिंडोरीतील पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, वणी खुर्द यांनी गावातील महिलांशी चर्चा करत दारूबंदी समिती स्थापन केली. या समितीवर गावात दारूबंदी करण्याची जबाबदारी देण्यात आली आणि ही जबाबदारी महिलांनी समर्थपणे पेलली आहे.

दिंडोरी पोलीस निरीक्षक शेगर यांनी अवैध दारू विक्रेत्यांकडून महिलांना होत असलेल्या त्रासाचा विचार करता महिलांच्या मदतीने या प्रश्नावर तोडगा काढला. दिंडोरी तालुक्यातील वणी खुर्द येथील महिला गावातील अवैध दारू विक्री बंद व्हावी व संबंधितांवर कारवाई व्हावी यासाठी मोर्चा काढत होत्या. पोलीसांकडून संबंधितांवर कारवाई करून देखील यावर आवश्यक तो परिणाम होत नव्हता. उलटपक्षी संबंधित दारू विक्रेत्यांकडून सदर महिलांना दमदाटी करणे, शिविगाळ करणे असे प्रकार वाढल्याने महिलांची सुरक्षादेखील ऐरणीवर आली होती. यापार्श्वभूमीवर शेगर यांनी पुढाकार घेऊन गाव पातळीवर बैठका घेत ग्रामसभेत एकमताने गावात दारू बंदीचा निर्णय घेतला. गावातील आशा, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्त्या यांना एकत्र आणले. त्यांची समिती गठीत केली. समिती सदस्यांना पोलीस ठाण्यातून ओळखपत्रं देण्यात आले. ज्या ज्या ठिकाणी दारू गुत्ते आहे तिथे या महिला धाड टाकतात. अवैधरित्या सुरू असलेले दुकानवजा टपरी बंद करण्यासाठी दबाव आणला जातो. या महिलांसोबत पोलीस पाटील, ग्रामपंचायतीचे काही सदस्यही असतात. पोलीस बळ मिळाल्यानं गुत्त्यांवरील कारवाया तडक होतात. या विषयी शेगर सांगतात, ‘‘ग्रामीण भागात लग्न असो वा शेतीची कामे निमित्त कुठलेही असो काहींना दारू लागते. क्वार्टसच्या बाटल्या आणत पेलेच्या पेले रिचवले जातात. ही चटक एकदा लागली की दारू सुटत नाही. आणि अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त होतात.

महिलांना या त्रासातून मुक्तता मिळावी यासाठी या महिला पोलीसांकडे येतात. पण हे धंदे छुप्या पध्दतीने सुरू राहतात. म्हणूनच गावात ठराव करत दारूबंदी निर्णय घेण्यात आला. गावात दारू विकली जाणार नाही ही जबाबदारी समितीवर सोपवली. त्याचा परिणाम म्हणजे आज वणी मधील पाच गावांमध्ये दारूबंदीची झाली आहे. महिलांनी नि:संकोचपणे अवैध धंद्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेत त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गावातील दारू विक्रेत्यांवर अंकुश ठेवण्यासाठी झाला असून पुन्हा एकदा गावात शांतता नांदत आहे. वणीसह तालुक्यातील फोफळवाडे, विळवंडी , कोचरगाव, नाळेगाव या गावात देखील राबवण्यात आला.’’

या समितीच्या सोनाली धुळे सांगतात, ‘‘गावात दारू पिऊन मारामारी, भांडणे ही नेहमीचीच होती. अगदी मिसरूड फुटलेला पोरगाही दारू पित असे. नशेच्या अंमलखाली नवऱ्याची बायकोला होणारी मारझोड, ती सहन न झाल्याने बायांनी चढवलेला आवाज… सगळा सावळा गोंधळ. तान्ही पोरं तर बापाच्या व्यवसनापायी कंटाळली होती. हे चित्र बदलावं असं मनापासून वाटत होतं. पोलीस पाठीशी असल्याने गावात माहिती असलेल्या दारूच्या गुत्त्यांवर धाड टाकली. ज्या महिला रोज दारूड्या नवऱ्याकडून मार खायच्या त्यांना सोबत घेतलं… तो गुत्ता गाठला… बोलाचाली करून प्रकरण थांबणार नव्हतं. आम्ही आवाज चढवला, भांडलो, गुत्त्याचा सामान अस्ताव्यस्त केलं. बायका भांडताय आणि रोज प्यायला येणारे केवळ बघतात… पोलीसही महिलांना मदत करत आहे हे पाहून गावातील दुकाने बंद व्हायला सुरुवात झाली. पोरं शाळेत नियमित तर पुरूषही शेतात वा अन्य ठिकाणी कामावर वेळेत पोहचायला लागली आहे. कोणी दुकान परत चालू केलं तर एका तासात होत्याचं नव्हतं करू असा सज्जड दमच भरलाय आम्ही… सध्या तरी गावात शांतता आहे याचा आनंद आहे.’’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वस्तीवरच्या वंदना सांगतात. ‘‘दिवसभर शेतमजुरी करायची… मिळालेल्या पैशातून लेकरांसाठी किराणा आणायचा, पण ती भाकरही नवरा पोटात जाऊ देत नव्हता. दारू पिऊन मारहाण करत राहायचा. समितीविषयी कळलं आणि सगळ्या बायका आहेत म्हटलं तेव्हा मीही त्यात सहभागी झाले. आताही घरात दारू न मिळाल्यो भांडण होताय, पण मारापेक्षा ते बरं असं वाटतंय.’’