वैद्य धनंजय गद्रे
अभ्यंग म्हणजे सर्वांगाला तेल लावणे. दिवाळीच्या दिवसांत, थंडीमध्ये अभ्यंग करणे विशेष महत्त्वाचे आहे. रोज अभ्यंग केल्यामुळे म्हातारपण लवकर येत नाही. शरीराला आलेला थकवा जातो, तसेच वात दोषाचा नाश होतो. त्वचा, हे वायू दोषाचे स्थान असल्यामुळे, तेथे तेल लावल्यामुळे वायू दोषाचे शमन होते. वायू हा थंड व रुक्ष गुणाचा दोष असल्यामुळे तो थंडीमध्येही वाढण्याची शक्यता असते. तेल, हे उष्ण व स्निग्ध गुणाचे असल्याने तेलाच्या अभ्यंगामुळे वात (वायू) दोषाचे शमन होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये वाढतो ‘ऑस्टिओपोरोसिस’चा धोका; ‘या’ लक्षणांकडे केलेलं दुर्लक्ष ठरेल घातक

शरीराला कच्चे तेल लावण्याऐवजी, आयुर्वेदामध्ये, ‘मूर्च्छना’ विधीने अर्थात, काही विशिष्ठ औषधी वनस्पतीच्या काढे व थोडी कल्क द्रव्ये (वनस्पतीचा वाटून तयार केलेला ठेचा) तेलात टाकून, ते उकळून आटवून फक्त तेल उरवणे, असा संस्कार करून, मग, त्या तेलाचा वापर अभ्यंग करण्यासाठी सांगितले आहे. मूर्च्छना विधीने तेलाचे आम दोष व गंध दोष हे नाहीसे होतात, तसेच त्वचेमधील भ्राजक पित्ताला त्याचे पचन करणे सोप्पे जाते. वेगवेगळ्या व्याधींमध्ये, वेगवेगळ्या वनस्पतींनी सिद्ध केलेले तेल, हे अभ्यंगासाठी वापरण्यास उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ नारायण तेल, विषगर्भ तेल, सहचर तेल, इत्यादी. अनेक प्रकारची सिद्ध तेले आयुर्वेदात वर्णन केलेली आहेत.

आणखी वाचा : मेन्टॉरशिप – पप्पांची समतोल, शांत वृत्ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करतेय…

नियमित तेल अभ्यंगामुळे, बारीक व्यक्तीची तब्येत सुधारू शकते, अर्थात त्याच्या सर्व धातूंची वाढ होऊन, त्याचे बल व वजन वाढू शकते. अश्वगंधा, शतावरी, बलामुळ, कवचबीज इत्यादी वनस्पतीनी सिद्ध तिळाचे तेल अशावेळी वापरले जाते. त्याचप्रमाणे त्रिफळा, नागरमोथा, सुंठ, दारुहळद इत्यादी लेखन (झीज) करणाऱ्या वनस्पतीनी सिद्ध तिळाच्या तेलाचा नियमित अभ्यंग केल्याने, जाड्या किंवा स्थूल व्यक्तींचे (व इतरही आहार विहाराचे पथ्य पाळले, व औषधे घेतली तर) वजन घटू शकते.

आणखी वाचा : उपयुक्त : ‘बीबी क्रीम’ आणि ‘सीसी क्रीम’: फरक काय?

अभ्यंग कधी करावे आणि कधी करू नये
अभ्यंग करताना मात्र शरीरामध्ये आम दोष नसावा. आमदोष म्हणजे अपाचित अन्नरस. अभ्यंग करायचे असल्यास आदल्या दिवशी खाल्लेल्या अन्नाचे पूर्ण पचन झालेले असणे आवश्यक आहे.

ढेकर शुद्ध येणे, उत्साह वाटणे, मल, मूत्र, आदी मलांचे योग्य काळी विसर्जन होणे, शरीर हलके वाटणे, भूक व तहान एकदम लागणे, ही, आधी सेवन केलेल्या आहाराचे पूर्ण पचन झाल्याची लक्षणे आहेत.

ग्लानी (काही ही शारीरिक श्रम न करता थकवा जाणवणे), शरीर जड वाटणे, मल, मूत्र, आदींचा अवरोध होणे, चक्कर आल्यासारखे वाटणे, पोटात वायू फिरणे, करपट वासाच्या ढेकरा येणे किंवा गुदद्वारातून (खालून) वायू सरणे, उलट्या किंवा जुलाब होणे, ही सर्व, आधी घेतलेल्या आहाराचे पचन न झाल्याची लक्षणे आहेत. अशा वेळी किंवा ताप आलेला असताना सुद्धा अभ्यंग करू नये.

आणखी वाचा : मी दीपिका नाही पण… ट्रेन मध्ये दिसलेली ‘ती’, जगातील सर्वात सुंदर महिला!

अभ्यंग आणि वजन
वजन वाढवायचे असल्यास हात (बोटांपासून खांद्यांपार्यंत) व पाय (बोटांपासून खुब्याच्या सांध्यापर्यंत) यांच्या खालच्या भागापासून वर च्या भागापर्यंत (रोम्ररंध्र यांच्या विरुद्ध दिशेने) अभ्यंग करावा. वजन कमी करायचे असल्यास, हात व पाय यांच्या वरील भागांपासून खालच्या भागांपर्यंत अभ्यंग करावा. छाती, पोट, पाठ व सांधे येथे, घड्याळाच्या काट्यांप्रमाणे हात गोल फिरवून (तो सुद्धा त्याच दिशेने- क्लॉकवाइज) अभ्यंग करावा. हलक्या हाताने त्वचेमध्ये तेल जिरवावे. व्यक्तीच्या भूक व पचन शक्तीनुसारच अभ्यंग तेलाची मात्रा (प्रमाण) घ्यावी.

आणखी वाचा :

अभ्यंग केल्यानंतर…
अभ्यंग झाल्यावर, थोडा वेळ तरी तसेच बसावे. तेल अंगात मुरू द्यावे. तेल लावल्यानंतर लगेच सकाळच्या कोवळ्या उन्हात बसता आले तर खूपच चांगले. स्वत:च्या बलानुसार व ऋतूनुसार व्यायाम करावा. हेमंत व शिशिर (थंडीचे ऋतु) या दोन ऋतुंमध्ये आपली शारीरिक क्षमता उत्तम असते. त्यावेळी आपल्या अर्ध्याशक्तीने व्यायाम करणे शक्य असते. निरोगी तरुण व्यक्तीने इतका व्यायाम करावा. व्यायाम करताना, कपाळावर घाम आला व आपली श्वासोत्श्वासाची गती वाढली, की आपण, आपल्या अर्ध्या शक्तीने व्यायाम केला असे म्हणता येते.

आणखी वाचा : कौतुकास्पद! २६ वर्षांची तरुणी झाली स्वीडनच्या क्लायमेट खात्याची मंत्री; जाणून घ्या रोमिना पौर्मोख्तरी आहे तरी कोण?

नित्य व्यायाम केल्याने शरीर पिळदार व बलवान होते. दु:ख सहन करण्याची क्षमता सुधारते. मेहनतीचे काम करण्याची क्षमता वाढते. भूक व पचनशक्ती सुधारते. शरीरात वाढलेली चरबी झडून जाते. शरीराची अंगप्रत्यंग प्रमाणबद्ध दिसू लागतात. आपला आत्मविश्वास वाढतो. शारीरिक, मानसिक व बौद्धिक स्थिरता वाढते. चालण्याची पद्धत सुधारते. ताठपणा येतो.

आणखी वाचा : असे का होते, समजून घ्या! गरोदर असल्याचे कळले आणि… ४८ तासांत बाळही जन्मास आले

व्यायाम केल्यानंतर आंघोळ अर्थात स्नान करावे. शरीर जोपर्यंत बलवान असते, तोपर्यंत थंड पाण्यानेच स्नान करणे चांगले असते. पण शरीर जर, वातदोष वाढल्याने किंवा आजारपणामुळे दुर्बल झाले असेल, तर मात्र गरम पाण्याने स्नान करावे.

आंघोळ करताना, अंगाला औषधी वनस्पतींपासून तयार केलेले सुगंधी उटणे लावून आंघोळ करावी. उटणे लावल्याने घामाच्या दुर्गंधीचा नाश होतो. त्वचेची रोमरंध्र शुद्ध होतात. त्वचेचा मल दूर होतो. त्वचेमधील चरबी पातळ होऊन झडते.

आणखी वाचा : मराठी अभिनेत्रींनी बोल्ड सीन दिले म्हणून त्यांचे कुटुंबीय दोषी कसे?

अशा प्रकारे दिनचर्येचे वर्णन करून, आयुर्वेदामध्ये, आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्य रक्षणाचे उपाय आपोआपच आपल्या दैनंदिन जीवनात अंतर्भूत केलेले आहेत.
(सूचना : आपल्या घराजवळच्या/ओळखीच्या, सुजाण वैद्याला आपली प्रकृती दाखवून, मगच हे उपाय करणे जास्त सयुक्तिक ठरेल.)
chittapawan1@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali fitness early morning bathing why do people have abhyang snan what are the benefits vp
First published on: 20-10-2022 at 16:50 IST