विंग कमांडर डॉ. सुशील डी. गरुड
मासिक पाळीत शरीरात हार्मोनल बदल होतात. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॅानमधील बदलांमुळे मूत्राशयाच्या कार्यावर परिणाम हाेतो. मासिक पाळीपूर्वी अनेक महिलांना पोट फुगणे, अतिरिक्त पाणी साचणे या समस्या दिसून येतात- ज्या रक्तस्त्राव सुरू झाल्यानंतर कमी कमी होऊ लागतात. परंतु अशावेळी वारंवार लघवीस जावे लागते. दुसरे कारण म्हणजे गर्भाशयाचे आकुंचन. गर्भाशयाचे अस्तर बाहेर पडल्याने, ते मूत्राशयावर दाब आणते परिणामी वारंवार लघवी होते.

अनेक महिलांना मासिक पाळीच्यात वारंवार लघवी होते परिणामी त्यांना मूत्रमार्गाच्या संसर्गाची (UTI) भीती वाटते. या काळात सतत शौचालयात जावे लागणे हे थकवणारे, लाजिरवाणे आणि तणावपूर्णही असू शकते. यामुळे या काळात अनेक महिला तणावाखाली वावरत असतात. कारण या काळात त्यांना नक्की काय करावं असा प्रश्न पडतो.

मासिक पाळीत होणाऱ्या वेदना, असह्य पोटदुखी आणि डोकेदुखी, थकवा, मळमळ आणि उलट्या यांसारख्या लक्षणांमुळे मासिक पाळी महिलांसाठी तणावाची ठरू शकते. इतकेच नाही तर काही महिलांना वारंवार लघवीचा जावे लागते. मासिक पाळी दरम्यान महिलांना वारंवार लघवीचा जावे लागणे हे सर्वसाधारण लक्षण आहे. मात्र अनेकदा ते त्रासदायक व तणावग्रस्त ठते. कारण ते मूत्रमार्गाच्या संसर्गाचे एक (UTI) लक्षण आहे.

मासिक पाळी येणे आणि वारंवार लघवी होणे यातील परस्पर संबंध काय?

मासिक पाळीत शरीरात हार्मोनल बदल होतात. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॅानमधील बदलांमुळे मूत्राशयाच्या कार्यावर परिणाम हाेतो. मासिक पाळीपूर्वी अनेक महिलांना पोट फुगणे, अतिरिक्त पाणी साचणे या समस्या दिसून येतात- ज्या रक्तस्त्राव सुरू झाल्यानंतर कमी कमी होऊ लागतात. परंतु अशावेळी वारंवार लघवीस जावे लागते. दुसरे कारण म्हणजे गर्भाशयाचे आकुंचन. गर्भाशयाचे अस्तर बाहेर पडल्याने, ते मूत्राशयावर दाब आणते परिणामी वारंवार लघवी होते. मूत्राशयाच्या जवळ जळजळ, वेदना, लघवीला फेस येणे, ताप किंवा ओटीपोटात दुखणे यांसारखी लक्षणे आढळल्यास ते मूत्रमार्गाच्या संसर्गाची लक्षणेही असू शकतात. अशा परिस्थितीत, मूत्र चाचणी आणि वेळीच उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य राहिल. मासिक पाळी दरम्यान महिलांनी आपल्याला होणाऱ्या त्रासाचा अभ्यास करावा व डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मासिक पाळी आणि वारंवार लघवीशी संबंधित गैरसमज आजच दूर करा.

१. मासिक पाळी दरम्यान वारंवार लघवी होणे म्हणजे यूटीआयचा म्हणजेच मूत्रमार्गाच्या संसर्गाचा त्रास आहे हा गैरसमज मनातून काढून टाका. खरं तर हार्मोनल बदल आणि गर्भाशयाच्या दाबामुळे संसर्गाशिवायही लघवीचे प्रमाण वाढू शकते. म्हणून घाबरू जाऊ नका कारण हे सर्वसामान्य लक्षण आहे. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

२. कमी पाणी प्यायल्याने वारंवार लघवीस जावे लागणार नाही असाही एक गैरसमज महिलांमध्ये आहे. परंतु दररोज किमान २-३ लिटर पाणी पिणे गरजचे आहे. तुम्हाला वारंवार लघवी होत असल्याने, याचा अर्थ असा नाही की तुम्ही पाणी पिणे टाळावे. शरीराला योग्य प्रमाणात पाण्याची गरज असते.

३. मासिक पाळीदरम्यानच्या स्वच्छतेचा यूटीआयशी काहीही संबंध नाही अस्वच्छता किंवा मासिक पाळी दरम्यान पॅडचा दीर्घकाळ वापर हा संसर्गाची शक्यता वाढवू शकतो. म्हणून योग्य स्वच्छता राखण्याची प्रयत्न करा. योनीमार्ग केवळ पाण्याने स्वच्छ करा. स्वच्छतेसाठी कोणत्याही रासायनिक पदार्थांचा वापर करू नका. औषधांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये. कपडे सुतीच असावेत. ३-४ तासांनी पॅड बदला. मासिक पाळीच्या काळात शरीराची स्वच्छता राखा, बस एवढीच काळजी घ्या.

(लेखक लॅप्रोस्कोपिक आणि युरो-गायनाकॉलॉजी सर्जन आहेत)