डॉ. राधिका प्रशांत हेडाऊ

पारंपरिक आहाराच्या जागी इंस्टंट नूडल्स, चिप्स, बर्गर, सॉफ्ट ड्रिंक्स आणि अतिप्रक्रिया केलेले अन्नपदार्थ आले आहेत. पूर्वी भारतातील बहुतांश मुलींनापहिली मासिक पाळी साधारणतः १३-१४ व्यावर्षीयेतअसे; मात्र आज अनेक मुलींमध्ये मासिक पाळीचीसुरुवात ९-११ व्यावर्षांदरम्यानहोतानादिसतआहेआणिकाही वेळा तीअगदी ८ व्यावर्षीहीसुरू होत असल्याचेबालरोगतज्ज्ञसांगतात. लहान वयातसुरूहोणाऱ्यापौगंडावस्थेची(PrecociousPuberty)प्रकरणेअलीकडीलकाळातवाढतानादिसतआहेत. WHO, NFHSआणि इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स (IAP)यांनीही या बदलाकडे गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्येप्रमाणेपाहण्याससुरुवातकेलीआहे. पुणे आणिकर्नाटकातीलकाहीअभ्यासांमध्येमुलींच्यापाळीचेसरासरी वय १२.४वर्षांपर्यंत खाली आल्याचेआढळलेआहे.

शरीरातीलचरबी बनते हार्मोन अलार्म-

आजची जीवनशैली मुलांनानकळतस्थूलतेकडेढकलतआहे. पारंपरिक आहाराच्या जागी इंस्टंट नूडल्स, चिप्स, बर्गर, सॉफ्ट ड्रिंक्स आणिअतिप्रक्रियाकेलेलेअन्नपदार्थआलेआहेत.शरीरातीलचरबी ही फक्त अतिरिक्त ऊर्जा नसूनहार्मोन्सतयारकरणारी सक्रिय प्रणाली असते. वजन वाढल्यावर‘लेप्टिन’नावाचा हार्मोन मेंदूला शरीर वयातयेण्यासाठीतयारअसल्याचा संदेश देतोआणित्यामुळे पाळी लवकरयेऊशकते. आज मुलांच्याताटात काय आहे, त्यावरउद्याचे हार्मोनल आरोग्य ठरतआहे.

स्मार्टफोननेबदललेमुलांचे जैविक घड्याळ

समस्या फक्तखाण्यातनाही;तीस्क्रीनमध्येहीआहे.IAPनुसारमुलांनादररोजकिमान६०मिनिटे मैदानी खेळ आवश्यक आहेत. पण आज मैदानी खेळांची जागा मोबाईल, गेमिंग, सोशल मीडिया आणिरील्सयांनीघेतलीआहे.मोबाईलआणिटीव्हीमधीलनिळा प्रकाश ‘मेलाटोनिन’ हा झोप नियंत्रित करणारा हार्मोन कमी करतो.झोप कमी झाली की शरीरातील नैसर्गिक ‘हार्मोनब्रेक’सुटतोआणिपौगंडावस्थालवकरसुरूहोऊशकते. आज अनेक मुलांचीरात्रमोबाईलच्याप्रकाशातसंपतेआणिसकाळथकलेल्याशरीरानेसुरूहोते.तज्ज्ञांच्या मते, मुलांच्या निरोगी वाढीसाठी८–१०तासांची शांत झोप अत्यंत आवश्यक आहे.झोप ही केवळविश्रांतीनसूनशरीरातील वाढ, मेंदूचीपुनर्बांधणीआणिहार्मोन्सचे संतुलन नियंत्रित करणारीमहत्त्वाची जैविक प्रक्रिया आहे.

सोशल मीडिया, मानसिक ताण आणि अदृश्य रसायनांचा धोका-

सोशलमीडिया, सतत तुलना करणारी‘इन्फ्लुएन्सर संस्कृती’, प्रौढ डिजिटल कंटेंट आणि ऑनलाइन ताण यामुळेमुलांचेमेंदू सतत सक्रिय राहतात.‘कॉर्टिसोल’सारखे स्ट्रेस हार्मोन्सवाढल्यानेशरीराच्या नैसर्गिक वाढीच्याप्रक्रियेत बदल होऊशकतो.

याशिवाय प्लास्टिक कंटेनर, अतिप्रक्रियाकेलेले अन्नपदार्थ, पॅकेज्ड फूड, सुगंधी कॉस्मेटिक्स आणिकीटकनाशकांमधीलकाहीरसायनेइस्ट्रोजेनसारखीवागतातआणिशरीरालावयाआधी बदल घडवूनआणूशकतात.

पालकांनीकोणतीलक्षणेओळखावी?

पोटाभोवतीवाढणारे वजन, ८ वर्षांपूर्वीस्तनांची वाढ, खूपलवकरउंची वाढणे, लहान वयात मुरुम, शरीराला वास किंवा केस येणे, रात्रीउशिरापर्यंतमोबाईल वापरणे, जंक फूडचेजास्त सेवन, मैदानी खेळांचा अभाव आणिवयानुसार अयोग्य डिजिटल कंटेंट पाहणे ही अकाली पौगंडावस्थेचीचिन्हेअसूशकतात.कुटुंबातलवकर पाळी किंवास्थूलतेचा इतिहास असल्यासधोका अधिक वाढूशकतो.

लवकरयेणाऱ्यापाळीचे दुष्परिणाम-

लहान वयात पाळी येणे हे केवळ शारीरिक बदल नसूनत्याचे दूरगामी परिणाम होऊशकतात.हाडांचीवाढलवकरथांबूनउंची कमी राहू शकते, तसेचपुढीलआयुष्यातपॉलीसिस्टिकओव्हेरियन सिंड्रोम (PCOS), स्थूलताआणिमधुमेहाचाधोकावाढूशकतो.यासोबतच मानसिक ताण, न्यूनगंड, नैराश्य आणिशरीराविषयीअसुरक्षिततावाढूशकते. शरीर मोठेदिसतअसलेतरी मन अजूनहीबालपणातचअडकलेलेअसते.

पालकांनी काय करावे?

मुलांच्याआहारात विविध अन्नगटांचा समावेश असलेला संतुलित आहार आवश्यक आहे.हिरव्या पालेभाज्या, फळे, मिलेट्स, कडधान्ये, सुकामेवातसेच मोड आलेलेआणिआंबवलेले पदार्थ आतड्यांचे आरोग्य आणिहार्मोन्सचे संतुलन सुधारण्यासमदतकरतात. दररोजकिमान एक तास मैदानी खेळ, मर्यादित स्क्रीन टाइम आणि योग्य झोप अत्यंत आवश्यक आहे.प्लास्टिकमध्ये अन्न गरम करणे टाळाआणिशक्यतो ताजे, कमी प्रक्रिया केलेले अन्न वापरा.

मुलींमध्येघटतचाललेलेपाळीचे वय ही केवळवैद्यकीय समस्या नसूनती आधुनिक बालपणाचा गंभीर इशारा आहे.यासाठी शाळा, पालक, आरोग्यतज्ज्ञआणिमुलांनी एकत्र येऊन योग्य आहार, झोप, मानसिक आरोग्य, स्क्रीन टाइम आणि निरोगी जीवनशैलीबाबत जागरूक होणे आवश्यक आहे. अधिक जनजागृती, शालेय आरोग्य शिक्षण आणि वैज्ञानिक मार्गदर्शक तत्त्वेराबवलीगेल्यासमुलींचे निरोगी बालपणजपण्यासमोठीमदतहोऊशकते.

(लेखिका पोषणतज्ज्ञ व सिंबायोसिस स्कूल ऑफ कुलिनरी आर्ट्स अँडन्यूट्रिशनलसायन्सेसयेथेसहाय्यक प्राध्यापक आहेत.)

radhikaphedaoo@gmail.com