विद्युत सुरक्षा ऑडिट म्हणजे संपूर्ण विद्युत संचमांडणी, त्यावरील विद्युत भार, डिझाइन, गुणवत्ता, संरक्षण व्यवस्था (Protection)आणि कार्यपद्धती (OperationalPractices) यांचे सखोल आणि पद्धतशीर परीक्षण होय. हे ऑडिट केवळ विद्युत मोजमापांपुरते मर्यादित नसून विद्युत आगीच्या दृष्टीने एकूण सुरक्षिततेचा सर्वंकष आढावा घेते.ऑडिटची सुरुवात उपलब्ध रेखाचित्रे(drawings) आणि कागदपत्रांच्या (documents) अभ्यासाने केली जाते. सिंगल लाईन डायग्राम (SingleLine Diagram), लोड लिस्ट (Load List), पूर्वीचेचाचणीअहवाल(TestReports) यांचा अभ्यास करून प्रत्यक्ष संचमांडणीची तुलना मंजूर रेखाचित्रांशी(approveddrawings)केलीजाते.कालांतरानेकाही बदल किंवा अतिरिक्त विद्युत भार जोडला गेला आहे का, याची पडताळणी केली जाते. या प्राथमिक चाचणी टप्प्यामुळे संचमांडणीत काही बदल (Deviation)किंवा संभाव्य ओव्हर लोडिंग स्थिती हे ओळखता येते.

यानंतर संपूर्ण विद्युत संच मांडणीची सखोल दृश्य तपासणी (VisualInspection)केली जाते. केबल (Cables) आणि वायर (Wires) यांची स्थिती, लोडनुसार योग्य आकार (sizing), उष्णता (heating), ओलावा(wet)किंवा यांत्रिक नुकसान (mechanicaldamage) यांचा परिणाम तपासला जातो. वितरण फलक (Distribution Boards), पॅनल्स(Panels)आणिस्विचगिअर(Switchgear)यांचीजोडणी (mounting), प्रवेशयोग्य (Accessibility), वायु वीजन(Ventilation)आणि स्वच्छता यांची पडताळणी केली जाते. न वापरलेली उघडी प्रवेशद्वारे, छिद्र योग्य प्रकारे बंद केलेलीआहेत का, जोडणीलग्स(Lugs)आणिफेरूल्स(Ferrules)वापरून केलीआहे का, तसेच जोडणी सैल (LooseConnection) नाही ना याची खात्री केली जाते. सैल जोडांमुळे स्थानिक (Localized) उष्णता निर्माण होऊन ठिणगी ( Sparking)होऊशकते आणि पुढे आग लागण्याचा धोका निर्माण होतो.

पॅनल्स(panels)आणि वितरण फलक (DistributionBoards) यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाते, कारण हे बहुधा बिघाडाचे प्रमुख केंद्र असतात. या ठिकाणी ओव्हरलोडिंग, फेज बॅलन्सिंगआणि संरक्षण उपकरणांची योग्य निवड व समन्वय तपासला जातो.बसबार (Busbars), इन्सुलेशन(Insulation)आणि अंतर्गत वायरिंग यांची स्थिती तपासताना उष्णतेचा संपर्क (Glowing Contact), रंग बदल किंवा जळल्याचा वास ही दृश्य लक्षणे (VisibleSigns)ओळखली जातात.तसेच पॅनल्स प्रवेश योग्य(Accessibility) उपलब्ध असणे आवश्यक आहे, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित ऑपरेशन आणि त्वरित वेगळेकरणे(Isolate)साधता येईल.

लोड विश्लेषण (LoadAssessment) हा ऑडिटचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. यात प्रत्यक्ष चालू असलेला विद्युत भार आणि प्रणालीची डिझाइन क्षमता यांची तुलना केली जाते. अनेक वेळा संचमांडणीत अतिरिक्त भार जोडला जातो, परंतु त्यानुसार संच मांडणीची क्षमता वाढवलेली नसते (Upgradation).त्यामुळे केबल्स आणि उपकरणांवर ओव्हर लोडिंग येते.तसेच जोडांमध्ये निर्माण होणारी उष्णता किंवा बसबारजोड सैल होणेयामुळे स्थानिक तापमान वाढते आणि कालांतराने ते पसरून आग लागू शकते. थर्मल इमेजिंग (ThermalImaging)च्या सहाय्याने असे उष्णकेंद्र (HotSpots)ओळखता येतात आणि वेळेवर सुधारणा करता येते.

अर्थिंग प्रणाली (EarthingSystem) ही विद्युत सुरक्षा आणि अग्नि प्रतिबंधासाठी अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे तिचे सखोल परीक्षण केले जाते. अर्थ पिट्स(EarthPits) ची स्थिती, विद्युत प्रतिकार (EarthResistance)मोजले जाते आणि अर्थिंग कंडक्टरची सलगता (Continuity)तपासले जाते. सर्व धातूंच्याभागांची सुसंगत जोडणी(Bonding)असणे आवश्यक आहे, जेणेकरून संभाव्य विद्युत दाब फरक टाळता येईल.याशिवाय सॉकेट्स साठी लूप इम्पेडन्स(LoopImpedance) तपासणेही आवश्यक असते.

इन्सुलेशन रेसिस्टन्स चाचणी(InsulationResistanceTesting)मेगर(Megger)च्या सहाय्याने केली जाते.कालांतराने केबल्सचेइन्सुलेशन खराब होत जाते आणि सूक्ष्म दोष निर्माण होतात. हे दोष सुरुवातीला लक्षात येत नाहीत, परंतु योग्य चाचण्यांद्वारे त्यांचा शोध घेऊन संभाव्य बिघाड टाळता येतो. संरक्षण प्रणाली (ProtectionSystem) ही ऑडिटमधील आणखी एक महत्त्वाची बाब आहे. संरक्षण उपकरणे योग्य प्रकारे कार्य करतात का, त्यांची सेटिंग योग्य आहे का आणि समन्वय (Coordination) योग्य आहे का हे तपासलेजाते.चुकीची सेटिंग किंवा निष्क्रिय संरक्षणामुळे दोषाच्या वेळी प्रणाली वेगळे होत नाहीआणि मोठे नुकसान तसेच आग लागू शकते.

याशिवाय लाइटिंग सर्किट्स(Lighting Circuits), फॉल्स सीलिंगमधील काम आणि लपलेले वायरिंगमधील दोष (HiddenInstallation)यांची तपासणी करून कोणतेही नुकसान नाही याची खात्री केली जाते.ऑडिटमध्येआजूबाजूचा भाग, बाजूचे पर्यावरण आणि अग्नि जोखमींचाही सखोल विचार केला जातो. विद्युत उपकरणे ज्वलनशील पदार्थांपासून दूर ठेवली आहेत का, परिसरात धूळकिंवा कचरा साठलेला नाही ना, तसेच पाणी गळती किंवा ओलाव्याचा परिणाम होत नाही ना याची पडताळणी केली जाते.काही वेळा इलेक्ट्रिकल रूम किंवा आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग (EmergencyExitRoutes)स्टोरेज साठी वापरले जातात, जे अत्यंत धोकादायक असून तात्काळ सुधारण्याची आवश्यकता असते.

फायर प्रोटेक्शन सिस्टम (FireProtectionSystem)हेदेखीलऑडिटचा अविभाज्य भाग आहे. योग्य प्रकारचे फायर एक्सटिंग्विशर (Fire Extinguishers), स्प्रिंकलर सिस्टम (SprinklerSystems)आणि गॅस आधारित फायर प्रोटेक्शन प्रणाली (Gas-based Systems) उपलब्ध आहेत का, तसेचत्यांची उपयुक्तता व कार्यस्थिती योग्य आहे का हे तपासले जाते. याशिवाय फायर डिटेक्शनआणि अलार्म प्रणाली (FireDetectionandAlarmSystem) योग्य प्रकारे कार्यरत आहे का, याची खात्रीकेलीजाते.

देखभाल पद्धतींचे(MaintenancePractices) मूल्यांकन करणेदेखील अत्यंत आवश्यक आहे. नियमित तपासणी व चाचण्या केल्या जातात का, नोंदी व्यवस्थित ठेवलेल्या आहेत का आणि दोषांची दुरुस्ती वेळेवरकेली जाते का याची खात्रीकेली जाते.अपुरीकिंवादुर्लक्षित देखभाल ही विद्युत बिघाडआणिआगीचे एक प्रमुख कारण आहे. मानवी घटक (HumanFactors) विद्युत सुरक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. विद्युत प्रणाली हाताळणारे कर्मचारी प्रशिक्षित आहेत का, सुरक्षित कार्यपद्धतींचे पालन करतात का आणि अनधिकृत प्रवेश नियंत्रित आहे का हे तपासले जाते. तात्पुरती वायरिंग, संरक्षण उपकरणांना बायपास करणे किंवा चुकीची हाताळणी यांसारख्या असुरक्षित पद्धती ओळखून त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

ऑडिटचे निष्कर्ष पद्धतशीररी त्यादस्त ऐवजीकरण(Documentation) केले जातात. निरीक्षणे, जोखीम पातळी आणि सुधारणा उपाय स्पष्टपणे नमूद केले जातात.अहवालामध्ये चाचणी परिणाम, छायाचित्रे आणि संबंधित मानकांचा संदर्भ दिला जातो, ज्यामुळे निर्णय प्रक्रिया अधिक प्रभावी होते. विद्युत सुरक्षा ऑडिट हे निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, रुग्णालये, हॉटेल्सआणि विविध इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प अशा सर्व प्रकारच्या ठिकाणी लागू आहे. जरी प्रमाण आणिगुंतागुंतवेगवेगळी असली तरी मूलभूत तत्त्वे सर्वत्र समान राहतात.

निष्कर्षत : विद्युत सुरक्षा ऑडिट हे विद्युत संचमांडणीतील लपलेलेधोके ओळखण्यासाठी एक अत्यंत प्रभावी आणि आवश्यक साधन आहे. हे केवळ नियमित चाचण्यांपेक्षा अधिक व्यापक असून संपूर्ण प्रणालीची सुरक्षितता, विश्वासार्हताआणिनियमांचे पालन सुनिश्चित करते. विद्युत प्रणाली, संबंधित जोखीमआणि अग्नि संरक्षण उपाय यांचा एकत्रित विचार करूनअसे ऑडिट, जीव आणिमालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, सर्व प्रतिबंधात्मक उपाय असूनही काही परिस्थितीत आग लागू शकते, त्यामुळे प्रभावी फायर प्रोटेक्शन प्रणाली असणे अत्यावश्यक आहे.पुढील लेखातआपण फायर एक्सटिंग्विशर, स्प्रिंकलर सिस्टम, गॅस आधारित प्रणाली तसेच फायर डिटेक्शन, अलार्म आणि आपत्कालीन प्रतिसाद प्रणालींचासविस्तर अभ्यास करू.

(लेखक वीजविषयकसल्लागारआहेत.)

ajitnkulkarni@yahoo.com