डॉ. उल्का नातू – गडम

स्थूलमानाने आसनांच्या शारीरिक स्थिती आणि उद्देशानुसार त्यांची तीन भागात विभागणी करता येते.

mpsc Mantra  Current Affairs Question Analysis
mpsc मंत्र : चालू घडामोडी प्रश्न विश्लेषण
wheat, farmers
केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
CM Eknath Shinde
शिवसेनेच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर, ‘या’ नेत्याचं नाव नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा

प्रथम ध्यानात्मक गटातील आसने, जी ध्यानासाठी उपयुक्त आहेत. या गटात पद्मासन, स्वस्तिकासन, सिद्धासन, भद्रासन, वज्रासन इत्यादींचा समावेश होतो. दुसरा गट आहे शरीरोपयोगी आसने. सर्वसाधारणपणे शारीरिक व्याधींसाठी आसनांचा उपयोग करून घेताना त्याचा शरीरावर होणारा परिणाम लक्षात घेतला जातो. उदा.- पाठकणा पुढे वळण्याची, मागे वळण्याची, बाजूला झुकण्याची, पीळ देणारी, खेच देणारी विपरित स्थितीतील आणि तोलात्मक गटातील आसने असे वर्गीकरण केले जाते.

तिसरा गट आहे विश्रांतीकारक आसनांचा. यामध्ये शवासन, मकरासन, अंतर्भूत आहे.

आज आपण वज्रासन गटातील एक सोप्या व परिणामकारी आसनाचा सराव करणार आहोत. या आसनाचे नाव आहे अर्ध उष्ट्रासन.

प्रथम वज्रासनात स्थिर होऊया. आता गुडघे थोडे एकमेकांपासून विलग करून दोन्ही गुडघ्यांवर उभे रहा. हात शरीराच्या बाजूला असतील. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. आता पाठकण्याला उजवीकडे झुकवत उजव्या हाताने डाव्या पायाची टाच पकडायच प्रयत्न करा. डावा हात शक्य तितका वर ठेवत, मानेला विरुद्ध बाजूला वळवत डाव्या हाताचा तळवा नजरेने पाहण्याचा प्रयत्न करा.

पाठकण्याला सुखद असा पीळ जाणवेल. काही क्षण या स्थितीत श्वासावर लक्ष एकाग्र करा.

आता विरुद्ध दिशेने हीच कृती करा. पोटावर व मानेवर, पाठीवर येणाऱ्या ताणामुळे पचनसंस्था, पुनरुत्पादन संस्था व पाठकण्याचे आरोग्य चांगले राखले जाते. श्वसनक्षमता वाढते. थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुधारते. पाठकण्याला संपूर्ण पाठीमागे न झुकविता पूर्ण उष्ट्रासनांचे लाभ मिळविता येतात. म्हणून याला सुलभ उष्ट्रासन असे संबोधले जाते.

ulka.natu@gmail.com