डॉ. उल्का नातू-गडम

आपले विचार, मनस्थिती बदलली की आपली शरीरस्थिती बदलते याचे एक छान उदाहरण म्हणजे एखादा भयप्रद सिनेमा पहात असताना आपण खूप उत्तेजित होतो. पाठकणा ताठ होतो, आपण खुर्चीत पुढे सरकून बसतो, नजर एकटक पडद्याकडे लावून पाहतो. पण आपण मनाने शांत असलो की त्याचा परिणाम स्नायू व सांध्यांवर निश्चितच होतो. शिथिलता शिकवता येत नाही, प्रयत्नपूर्वक साध्य करता येत नाही. ती आपोआप घडणारी गोष्ट आहे.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
shares market, stock prices
तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
traffic police action against goon nilesh ghaiwal
गुंड नीलेश घायवळला वाहतूक शाखेचा दणका, मोटारींना काळ्या रंगाच्या काचांचा वापर केल्याप्रकरणी दंड

समर्थ रामदासांना एकदा धोंडीबा धनगराने विचारले, “शांततेसाठी मी काय करू?” समर्थ म्हणाले, “मनाचे ऐकू नको.” हे करताचक्षणी धोंडीबा समाधी स्थितीमध्ये गेला. आपल्याला हे साध्य होईल की नाही माहीत नाही, पण गुरूंनी आखून दिलेल्या रस्त्यावर वाटचाल करूया.

आज आपण सराव करूया, उष्ट्रासनाचा. खूप वेळ संगणकासमोर बसून, उभे राहून घरातली कामे करून, प्रवासात पाठीवर बॅकपॅकचे ओझे घेऊन पाठकण्याचे आरोग्य बिघडते. त्यासाठी पाठकण्याला पाठीमागे वळवून मानही पाठीमागे वळवून दीर्घ श्वसन केल्यास श्वसनक्षमताही सुधारते, पाठकण्याचे आरोग्य सुधारते.

आसन करण्यासाठी प्रथम वज्रासनात या. आता दोन्ही पायांच्या गुडघ्यावर उभे रहा. पायाची बोटे जमिनीवर चवड्यांवर उभी ठेवा किंवा जमिनीलगत ठेवा. आता दोन्ही हात पाठीवर अशा रीतीने ठेवा की अंगठा पोटाच्या दिशेने व चार बोटे पाठीवर असतील. आता सावकाश पाठकणा पाठीमागे झुकवा. सावकाश एक एक हात पाठीवरून काढून बोटांनी दोन्ही पायाची टाच पकडायचा प्रयत्न करा. चार ते पाच श्वास अंतिम स्थितीत थांबा. सावकाश पूर्वस्थितीत या. वज्रासन सोडून बैठक स्थितीत विश्रांती घ्या.

या आसनाच्या सरावाने पाठकणा लवचिक होतो. घोटे व गुडघ्याचे सांधे ही सुदृढ व लवचिक होतात मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या पोटदुखीसाठी या आसनाचा सराव उपयुक्त ठरतो.