डॉ. उल्का नातू गडम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यम-नियमांबद्दल बोलताना आपण ‘अहिंसा’ म्हणजे काय ते पाहिले. आज आपण ‘सत्य’ या तत्त्वाबद्दल/ व्रताबद्दल बोलूयात. सत्य म्हणजे खरे बोलणे अथवा खऱ्याचाच पाठपुरावा करणे. ‘सत्य प्रतिष्ठायां क्रियाफलाम्’ म्हणजेच सत्याचा पाठपुरावा करत असणाऱ्या व्यक्तीने इच्छा व्यक्त केली तरी प्रत्यक्ष क्रियेचे फळ प्राप्त होऊ शकते.

अर्थात केवळ इच्छेने हव्या त्या गोष्टी बाह्यसृष्टीत घडून घेण्यासाठी त्या व्यक्तींची तितकी साधना असली पाहिजे, वाणीचे व विचारांचे पावित्र्य असले पाहिजे व भावनेची शुद्धता असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. या तत्त्वांबाबत गांधीजी फार आग्रही असत.

आज आपण एका ‘सर्वांगसुंदर’ व भरपूर लाभ देणाऱ्या आसनासंबंधी बोलणार आहोत. त्या आसनाचे नाव आहे ‘सर्वांगासन’. या आसनाच्या नावातच सर्वांगाचा उल्लेख आहे.

या आसनाच्या सरावासाठी प्रथम शयनस्थितीतील विश्रांती अवस्था घ्या. आता दोन्ही पाय एकमेकांना जोडून घ्या व दोन्ही हात शरीराच्या बाजूला ठेवा. आता दोन्ही हातांच्या तळव्यांचा जमिनीला घट्ट आधार घेऊन दोन्ही पाय जमिनीपासून वर उचला. पाय गुडघ्यात दुमडू नका.

आता पृष्ठभाग जमिनीपासून वर उचला दोन्ही हातांचा पाठीमागे आधार द्या. सीट उचलताना न जमल्यास रोलिंग करून हे साध्य करण्याचा प्रयत्न करा. सावकाश पाय डोक्याच्या दिशेने न्या. आता पोटाचे स्नायू घट्ट करून पाय सरळ उभे करा. या स्थितीत पावले, पाय, सीट यांचा मान व डोक्याशी नव्वद अंशांचा कोन होईल.

आणखी वाचा – पाळीचा त्रास कमी परिणाम कमी करणारे आसन

हनुवटी छातीपाशी आणा. परंतु श्वास रोखू नका. हात पाठीमागे छातीच्या पिंजऱ्यापाशी असतील. अंगठा पोटाच्या दिशेने तर बोटे पाठी पाशी असतील. ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ या काव्यपंक्तीची आठवण करून देणारा शरीराचा आकृतीबंध असेल. 

या आसनाचे लाभ रक्ताभिसरण संस्था, अंतस्रावी ग्रंथी,  पुनरुत्पादन संस्था, पचनसंस्था, मज्जासंस्था,  स्नायूसंस्था या साऱ्यांवर दिसून येतात. थायरॉइड ग्रंथी, अंडाशय या साऱ्यांवर उत्कृष्ट परिणाम होतो. पचन सुधारते, चार ते पाच श्वास थांबून अगदी अलगदपणे आसनाच्या पूर्वस्थितीत यावे.

ulka.natu@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Few yoga poses for women who suffer from thyroid know about health tips kmd
First published on: 17-09-2022 at 13:48 IST