काही दिवसांपूर्वी एका ओळखीच्या व्यक्तीचा चौकशी करण्यासाठी फोन आला. तिच्या एका नातेवाईक स्त्रीला घरी साफसफाई करताना गुंतवणूकीसंदर्भातली काही कागदपत्रं सापडली होती. पतीनिधनानंतर ती स्त्री एकटीच राहात होती. त्या कागदपत्रांचं काय करावं याबद्दल तिला मार्गदर्शन हवं होतं. पूर्ण महितीअंती कळलं, की ती गुंतवणूक बऱ्यापैकी मोठ्या रकमेची होती आणि त्यात ती स्त्री वारसदार होती. सगळी प्रक्रिया पूर्ण केल्यावर तिला गुंतवणूक केलेले पैसे परत मिळाले. या आणि अशा अनेक घटना तुमच्या आजूबाजूला, ओळखीमध्ये, कधीतरी तर कुटुंबामध्येदेखील घडल्या असतील. अशा सगळ्या प्रसंगांमध्ये एक गोष्ट ठळकपणे जाणवते, ती म्हणजे काही अपवाद वगळता स्त्रियांची आर्थिक व्यवहारांविषयी असलेली अनभिज्ञता. यात सगळ्यात जास्त नुकसान हे स्त्रियांचंच होतं.

आणखी वाचा : तुम्हीही सुपरमॉम सिंड्रोमच्या शिकार झाला आहात का?

land reforms
UPSC-MPSC : भारतातील जमीन सुधारणा अपयशी का ठरल्या? त्यामागची नेमकी कारणे काय होती?
Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…

बऱ्याच कुटुंबांत घरातले आर्थिक व्यवहार, गुंतवणुक आणि आर्थिक निर्णय घरातली पुरुषमंडळीच घेत असतात, तर इतर कौटुंबिक गोष्टींकडे स्त्रिया लक्ष देतात. स्त्री कमावती असो व नसो, कामांची ही विभागणी आपल्याला आजूबाजूच्या अनेक कुटुंबांमध्ये दिसते. पण कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षमपणे उभं राहण्यासाठी, अधिक सजगतेनं व्यवहार करण्यासाठी स्त्रियांनी आर्थिकदृष्ट्या सजग होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यासाठी स्त्रिया नेमकं काय करू शकतात? जाणून घेऊ या –

१. घरातले सर्व आर्थिक व्यवहार, आर्थिक बाबींची सर्वसमावेशक नोंद करा.
यासाठी घरातले आर्थिक व्यवहार करणाऱ्या व्यक्तीबरोबर तुम्ही चर्चा करा. त्यांच्याबरोबर बसून तुम्ही पुढील बाबींची नोंद करा-

आणखी वाचा : लग्नानंतर स्त्रियांचे वजन का वाढते? सेक्समुळे वजनावर कसा परिणाम होतो जाणून घ्या

  • घरातल्या सर्वांचे बँक खात्यांचे तपशील आणि त्यांचे वारसदार
  • केलेली सर्व गुंतवणुक आणि त्यांचे तपशील
  • घेतलेली आणि दिलेली कर्जे
  • विमा पॉलिसी आणि त्याचे तपशील.
  • वरील सर्व ठिकाणी नमूद केलेल्या वारसदारांची नावं
  • सर्व ऑनलाईन व्यवहारांचे लॉगिन आयडी आणि पासवर्ड
    इत्यादी.
    या सर्व गोष्टी तुम्ही एखाद्या स्वतंत्र खासगी डायरीमध्ये अथवा घरातल्या संगणकावर एखादी एक्सेल शीट तयार करून करू शकता. शिवाय ही सर्व माहिती वेळोवेळी अपडेट करत रहा. आणखी एक महत्त्वाचं- तुम्हाला जर ऑनलाईन व्यवहाराची माहिती नसेल तर ते शिकून घ्या. ही काळाची गरज आहे.

आणखी वाचा : ३९ हजार ५२६ महिलांवर अत्याचार, २५०६ बलात्कार…चित्रा वाघ, उर्फी पुराण झालं असेल तर यावरही बोला!

२. विलंबित आणि राहिलेल्या अशा सर्व आर्थिक बाबी पूर्ण करून घ्या.
अनेकदा कामाच्या किंवा इतर गडबडीमध्ये अर्थविषयक अनेक गोष्टी लांबणीवर पडतात.अनेकदा बचत खात्यात पैसे पडून असतात, पण ते योग्य प्रकारे गुंतवले जात नाहीत आणि ते खर्च होऊन जातात. काही वेळा वारसदार नोंद करणं राहिलेलं असतं. आधी केलेली एखादी गुंतवणूक असते, तिचा कालावधी संपूनही तिचं नूतनीकरण करायचं राहिलेलं असतं, एखाद्या इन्शुरन्स पॉलिसीचा प्रीमियम भरायचा राहिलेला असतो, अशा काही प्रलंबित गोष्टी असतील तर त्या त्वरित करून घ्या.

आणखी वाचा : United Nations भारतीय महिला लष्करी अधिकाऱ्यांची ‘ब्लू हेल्मेट’ सूदानमध्ये तैनात!

३. घरात अर्थविषयक चर्चा करा.
अनेक कुटुंबांमध्ये आजही पैसा, आर्थिक घडामोडी, व्यवहार, गुंतवणूक इत्यादी विषय मोकळेपणानं बोलले जात नाहीत. जेव्हा कुटुंबामध्ये वाढत्या वयाची मुलं असतील तेव्हा तर या गोष्टी निश्चितच चर्चिल्या गेल्या पाहिजेत. स्त्रियांनी याला प्रोत्साहन द्या, यात स्वतः भाग घ्या. तुमच्या मुलांना कौटुंबिक उत्पन्न, खर्च, त्याचा ताळमेळ, बजेट इत्यादी गोष्टींचा अंदाज त्यातून आला, की ती आपसूकच पैसा जपून आणि विचारपूर्वक वापरतील.

४. आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक याविषयी अधिक ज्ञान प्राप्त करा.
स्त्रिया या जन्मत:च उत्तम नियोजनकार असतात. येणाऱ्या उत्पन्नातून घरखर्च उत्तम प्रकारे चालवणं, कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावणं, यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असतात.
आज बाजारात गुंतवणुकीची अनेक साधनं उपलब्ध आहेत. ऑनलाईन व्यवहार वेगवेगळ्या प्रकारे करता येतात. विविध कर्जे, विमा पॉलिसी उपलब्ध आहेत.

आणखी वाचा : प्राऊडली सिंगल!

यासंबंधी आवश्यक ती सर्व माहिती तुम्ही प्राप्त करा.
वृत्तपत्रं, मासिकं, ब्लॉग, टीव्ही, इंटरनेट इत्यादी माध्यमातून तुम्ही यासंबधी माहिती प्राप्त करू शकता. कृपया ठोस आणि अधिकृत माध्यमातूनच माहिती मिळवा. यामुळे तुम्हाला पैशांविषयी योग्य निर्णय घ्यायला मदत होईल.

स्त्रिया जेव्हा आर्थिकदृष्ट्या सजग होतात तेव्हा त्यांना आणि पर्यायानं त्याच्या कुटुंबाला पुढील फायदे होतात –

१. गुंतवणूक करताना, आर्थिक व्यवहार सांभाळताना तुमची फसवणूक होत नाही. डोळसपणे योग्य ते प्रश्न विचारून, आकलन करून घेऊन मगच तुम्ही निर्णय घेता.

२. तुम्ही स्वतःबरोबरच तुमच्या कुटुंबाला, तुमच्या मैत्रिणींनाही सजग करू शकता, जेणेकरून त्याही योग्य प्रकारे निर्णय घेऊ शकतील.

३. तुम्हाला आर्थिक निर्णय योग्य प्रकारे आणि आत्मविश्वासानं घेता येतात आणि त्यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये तुम्ही खंबीरपणे उभं राहू शकता.

४. तुमचा हा आदर्श तुमची मुलं आणि पर्यायानं पुढची पिढी ठेवू शकते, जेणेकरून उद्या ते आर्थिक व्यवहार आणि नियोजन उत्तम प्रकारे करू शकतील.

आणखी वाचा : N Janani first women umpire: अखेर पुरुषांची मक्तेदारी हटवली! क्रिकेटमधील प्रचलित प्रथांना छेद देणारी रणजी सामन्यातील पहिली महिला अंपायर

तुमचं वय कितीही असो, शिक्षण कोणतंही असो, आर्थिक बाबींची माहिती घ्यायला सुरुवात कधीही, कुणीही करू शकतं. त्यामुळे ‘मला जमेल का’ असं काही डोक्यात असेल तर ते काढूनच टाका आणि अर्थसाक्षर व्हा.
(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार व सर्टिफाईड फायनान्शियल प्लानर आहेत.)
priya199@gmail.com