डॉ. स्वाती हजारे

स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतो तो म्हणजे एका जीवाला जन्म देणे. हा प्रवास सुरू होतो तो गर्भधारणा ते अपत्यप्राप्ती (जन्म) – ते मूल मोठे होईपर्यंतचा काळ. जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा त्याच्यासाठी संपूर्ण आहार असतो ते आईचे दूध. या दुधाला संपूर्ण आहार म्हटले जातं कारण ते बाळाला त्याचा संपूर्ण विकास होण्यासाठी आवश्यक अशी सर्व पोषक तत्त्व देतं. स्तनपान म्हणजे आई तिचे दूध बाळाला स्तनांवर म्हणजे छातीवर पाजते (Breastfeeding). या स्तनपानाने बाळाचा ना केवळ शारीरिक तर मानसिक विकासही घडत असतो. म्हणूनच जेवढी वर्षे जास्त, आई आणि बाळ यांच्या समन्वयाने हे स्तनपान चालू राहील, तेवढे बाळाच्या आरोग्यासाठी ते हितकर असते. 

Mugdha Vaishampayan congrats to Kartiki Gaikwad after pregnancy announcement
कार्तिकी गायकवाडने आनंदाची बातमी देताच मुग्धा वैशंपायन झाली भावुक, म्हणाली, “खूप…”
anushka sharma return to India with son akaay kohli and daughter vamika
अखेर वामिका अन् अकायसह भारतात परतली अनुष्का शर्मा, पापाराझींना दाखवली लेकाची झलक
When can my baby drink cow’s milk
सहा महिने की बारा महिने, बाळाला गायीचे दूध केव्हा देऊ शकता? WHO चे नवे मार्गदर्शक तत्व काय सांगतात? जाणून घ्या
prarthana behere says she and her husband do not want child
“आम्हाला मूल नको, कारण…”, प्रार्थना बेहेरेचा वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा; म्हणाली, “माझे सासू-सासरे…”

आणखी वाचा : किशोरी पेडणेकरांना खुलं पत्र : ‘तसल्या’ आणि ‘घरंदाज’ बायका म्हणजे नेमकं काय हो?

WHO – जागतिक आरोग्य संघटना (World Health Organization) आणि UNICEF – युनिसेफ (United Nations International Children Emergency Fund) या जागतिक संघटनांनी स्तनपान आणि आईच्या दुधाचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन स्तनपानाचा कालावधी कमीत कमी दोन वर्षे ते जास्तीत जास्त ३-५ वर्षे असावा असं सांगितले आहे. 

आणखी वाचा : मेन्टॉरशिप : श्री. पु. भागवतांनी माझ्यातला संपादक घडवला

आता आईचे दूध कसे तयार होते याबद्दल थोडी माहिती घेऊ. गर्भधारणा झाल्यानंतर स्त्रीच्या शरीरात काही बदल होण्यास सुरुवात होते. या बदलांना गर्भधारणेमधील हॉर्मोन्स कारणीभूत असतात आणि हे बदल गर्भधारणा सुखकर होईल हे दर्शवित असतात. 

हे बदल म्हणजे

१) स्तनांचा आकार वाढणे. 

२) स्तनांच्या मध्यभागी जो काळा भाग असतो ज्याला aereola म्हणतात तो अधिक गर्द रंगाचा होतो. 

३) स्तनाग्रं – काही प्रमाणात वाढतात तसेच त्यांची लवचिकता, मऊपणाही वाढतो. 

यामध्ये स्तनांचा आकार वाढतो म्हणजे दूध बनविणाऱ्या पेशींच्या संख्येमध्ये वाढ होत असते, ज्यामुळे बाळाला पुरेल असे दूध आईचे शरीर तयार करू शकते. याचबरोबर गर्भधारणेच्या १६ व्या आठवड्यापासून या पेशींमध्ये दूध तयार करून ते साठवून ठेवण्यास स्तन सुरुवात करते; त्यमुळे प्रसुती लवकर झाली तरी लवकर जन्मलेल्या बाळांना (Premature Babies) पोषण मिळण्याची व्यवस्था निसर्गानेच केलेली असते.  गर्भधारणेमध्येच दूध तयार होत असल्याने काही मातांना गर्भधारणेमध्येच स्तनांमधून दूध पाझरल्याचे जाणवते, जे अगदी साधारण आहे, त्याला घाबरण्याची गरज नाही. 

आणखी वाचा : विवाहपूर्व मार्गदर्शन – लग्नाआधी आणि बदलत्या पार्टनर्सबरोबर सेक्स नकोच

तसेच बाळ जन्माला आल्या आल्या बाळाला स्तनांना लावून हे दूध पाजता येते. बाळाला स्तनांना पकडता आले नाही म्हणजेच दूध स्वत: ओढता आले नाही तर हाताने स्तन पिळून दूध काढून हे दूध वाटी चमच्याने पाजावे.

drswatihajare@gmail.com

ReplyReply to allForward