Forbes India : फोर्ब्स इंडियाने २०२४ ची ”फोर्ब्स इंडिया थर्टी अंडर थर्टी’ची’ (30 Under 30) यादी जाहीर केली आहे. त्यात फोर्ब्स इंडिया ३० अंडर ३० म्हणजेच ज्यांनी त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम केले आहे अशा ३० वर्षांखालील ३० तरुणींचा त्यात समावेश आहे. या यादीत मनोरंजन, क्रीडा, डिजिटल कन्टेन्ट क्रिएटर, फायनान्स , गायिका या क्षेत्रांतील अनेक महिलांचा समावेश आहे. आज आपण या लेखातून या यादीतल्या विविध क्षेत्रांतील पाच उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तरुणी आणि महिलांबद्दल जाणून घेणार आहोत.

१. रश्मिका मंदान्ना – वय २७
रश्मिका मंदान्ना या अभिनेत्रीने २०१६ मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने तेलुगू, कन्नड, तमीळ व हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. पुष्पा : द राईज, ॲनिमल यांसारख्या ब्लॉकबस्टर हिट चित्रपटांसह रश्मिकाने केवळ रुपेरी पडद्यावरच यश मिळवले नाही, तर आता ती एक खास व्यवसाय योजना घेऊन उद्योग क्षेत्रातही उतरणार आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

२. राधिका मदन – वय २८
फोर्ब्स इंडियाच्या यादीत नाव मिळवणारी दुसरी अभिनेत्री म्हणजे राधिका मदन. ही अभिनेत्री टीव्ही ते बॉलीवूडपर्यंत तिच्या करिअर क्षेत्रात दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. अस्मान भारद्वाज दिग्दर्शित कुट्टी या पहिल्या क्राईम ड्रामामध्ये ती दिसली होती. राधिका मदन इंग्रजी मीडियम, सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ आदी अनेक चित्रपटांमध्ये झळकली आहे.

हेही वाचा…कोण आहे भक्ती मोदी? इशा अंबानीच्या रिलायन्स रिटेलमध्ये काय आहे तिची जबाबदारी?

३. अनुष्का राठोड – वय २५
टॅक्सेशन आणि इन्व्हेस्टमेंट बँकिंगची पार्श्वभूमी असणारी अनुष्का राठोड ही भारतातील पहिली फायनान्स क्षेत्रातील डिजिटल कन्टेन्ट क्रिएटर आहे. अनुष्का राठोड सोशल मीडियावर १.८ दशलक्ष फॉलोअर्ससाठी मनोरंजनाबरोबर फायनान्स क्षेत्रातील गुंतवणुकीबद्दल व्हिडीओच्या माध्यमातून माहिती देत असते. या अनोख्या दृष्टिकोनामुळे तिला १०,००० हून अधिक सदस्यांसह ‘कोटी क्लब’ हे वृत्तपत्र मिळाले आहे.

४. अदिती सेहगल ऊर्फ डॉट वय – २५
अदिती सेहगल ऊर्फ डॉट ही एक गायिका व संगीतकार आहे. या गायिकेचे वय २५ आहे. डॉट नावाने ओळखली जाणाऱ्या आदिती हिने झोया अख्तरच्या द आर्चिज (The Archies) चित्रपटात सहायक भूमिकाही साकारली होती. तिच्या आवाजाने मंत्रमुग्ध झालेला चाहतावर्ग, डॉटचा आगामी ‘सी क्रिएचर ऑन द सोफा’ या आगामी अल्बमची प्रतीक्षा करीत आहे.

५. पारुल चौधरी – वय २८
आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचत, महिलांच्या पाच हजार मीटर शर्यतीत धावपटू पारुल चौधरी हिने देशाला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले आहे. अशी कामगिरी करणाऱ्या ती पहिली भारतीय महिला ठरली आहेत. आव्हानांवर मात करून आणि विक्रम मोडीत काढत पारुल चौधरी ही क्रीडा क्षेत्रातील अनेक महिलांसाठी एक उत्तम उदाहरण ठरली आहे. तर या पाच तरुणी आणि महिलांच्या उत्कृष्ट कामगिरीची नोंद ‘फोर्ब्स इंडियाच्या ३० अंडर ३० च्या यादीत करण्यात आली आहे.

Story img Loader