उच्चशिक्षण घेणं हे प्रत्येकीचं स्वप्न असायलाच हवं. पण प्रत्येक ‘ती’च्यासाठी हे स्वप्न पाहणंसु्द्धा काही सोपं असत नाही. साधी स्वप्नं पाहतानाही अनेकींची दमछाक होते. तर ती स्वप्नं पूर्ण करताना केवढा मोठा पडाव पार करावा लागत असेल, याची कल्पनाच करू शकतो आपण. मात्र अनेक कंपन्या अशा हिंमतवान मुलींना शिष्यवृत्ती देण्यासाठी तयार असतात. त्याची माहिती आपण करून घ्यायला हवी. यामध्ये अगदी २५-३० हजारांपासून आर्थिक मदत केली जाते. शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा असेल आणि आर्थिक सहाय्याची गरज असेल तरीही खंतावून जाण्याची गरज नाही. कारण शिष्यवृत्ती, पाठ्यवृत्तीचे अनेक पर्याय ‘ती’च्या पाठीशी आहेत. गरज आहे, ते शोधून काढण्याची आणि त्याचा वेळेवर लाभ मिळवण्याची.

आर्थिक प्रश्नांमुळे अनेक महिलांना पदवी आणि पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणं शक्य होत नाही. त्यामुळे त्यांचं शिक्षण अर्धवटच राहतं. ही बाब लक्षात घेऊन त्यांच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना स्वबळावर सक्षमपणे उभं राहता येणं शक्य व्हावं यासाठी, ‘ग्लो ॲण्ड लव्हली फाउंडेशन’ मार्फत स्कॉलरशीप दिली जाते. या शिष्यवृत्ती अंतर्गत २५ हजार रुपये ते ५० हजार रुपयांपर्यत अर्थसहाय्य केलं जातं.

Maharashtra Board Class 10th and 12th Result 2024 Date Time in Marathi
१०वी १२वीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी! ‘या’ तारखेला निकाल लागण्याची शक्यता; कसा पाहाल? जाणून घ्या
Simran Thorat first woman merchant navy officer
शिक्षणासाठी पालकांनी जमीन विकली, पुण्याच्या सिमरन थोरातने मर्चंट नेव्ही क्षेत्रात मिळला ‘हा’ बहुमान
aicte directed question papers of technical education courses in two language
पुणे: तंत्रशिक्षणाची प्रश्नपत्रिका आता भाषासुलभ! काय आहे ‘एसआयसीटीई’चा निर्णय?
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…

आणखी वाचा : Indian Myths and Facts about Menstruation : मासिक पाळी, सण अन् ‘ती’!

या शिष्यवृत्तीसाठी १२वी उत्तीर्ण झालेल्या आणि पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनी पात्र ठरतात. या दोन शिष्यवृत्तींशिवाय विविध स्पर्धा परीक्षा तयारीसाठीच्या प्रशिक्षणासाठीही सहाय्य केलं जातं.

निवड प्रक्रिया
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थिनींची गुणवत्ता आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेतली जाते. उमेदवारांच्या निवडीसाठी दूरध्वनीव्दारे मुलाखत घेतली जाते. उमेदवार आपल्या स्वभाषेत मुलाखत देऊ शकते. तशी सुविधा दिली जाते. त्यामुळे इंग्रजीचा गंड असेल तरी घाबरून जाण्याचं कारण नाही. ते सुधारता येऊ शकेल. मुलाखती संपल्यानंतर शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थिनींची नावं अधिकृत संकेतस्थळावर घोषित केली जातात.

अभ्यासक्रमांची यादी
पुढील अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते.

(१) पदवी अभ्यासक्रम- बीए/ बी कॉम/ बीएस्सी/ बीई/ बीटेक/ एलएलबी/ बीसीए/ बीबीए/ बी फार्म/ एमबीबीएस/ बीडीएस/ बीएचएमएस/ बीएएमएस/ बीएड/ बीबीए-एलएलबी/ बीकॉम-एलएलबी
(२) पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम- एमए/ एम कॉम/ एमएस्सी/ एमई/ एमटेक/ एलएलएम/ एमसीए/ एमबीए/ एमफॉर्म/ एम आर्क/ एमडीएस/ एमएचएमएस/ एमएएमएस/ एमएड
(३) स्पर्धा परीक्षा- बँकिंग/ सीए-सीएस-आयसीडब्ल्यूए/ कॅट-एमबीए/ नागरी सेवा/ आयआयटी-जेईई-अभियांत्रिकी / शासकीय सेवेसाठीच्या परीक्षा/ नीट-एमबीबीएस/ इंग्रजी भाषा कौशल्य

आणखी वाचा : कोटक कन्या शिष्यवृत्ती

महत्वाची कागदपत्रे
शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना पुढील कागदपत्रे सादर करावी लागतात.
(१) १० वीची गुणपत्रिका, (२) १२वीची गुणपत्रिका, (३) उत्पन्नाचा दाखला, (४) प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयाच्या शैक्षणिक शुल्काची पावती, (५) अर्ज, (६) जन्मदाखला, (७) पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, (८) बँक अकाउंट पासबुक, (९) भ्रमणध्वनी(मोबाईल क्रमांक)

अर्ज प्रक्रिया ऑनलाईनच करावी लागते.
संकेतस्थळ- scholarshiparena.in/ fair-and-lovely-scholarship