आराधना जोशी

स्वतःच्या मुलांमधील दोष कमी करण्यासाठी त्यांना योग्य ती मदत करण्यास उभे राहतात तेच खरे पालक, असं अनेकदा म्हटलं जातं. हल्ली मात्र पालकत्वाची संकल्पना जास्तीत जास्त महागडे कपडे घेणं, मुलं म्हणतील ते आणि म्हणतील तेव्हा त्यांना हव्या असणाऱ्या महागड्या वस्तू विकत घेऊन देणं किंवा महागड्या शाळांमध्ये, क्लासेसमध्ये पाठवणं यासारख्या गोष्टींशी निगडीत झाली आहे. याशिवाय पालकत्व या विषयाशी निगडीत अनेक चुकीच्या संकल्पना आपल्याकडे बघायला मिळतात. त्यातल्या काही नेहमी बघायला किंवा अनुभवाला येणाऱ्या संकल्पना म्हणजे – 

Can precum during sex cause pregnancy Birth Control Options
पूर्वस्खलनामुळे गर्भधारणा होण्याची किती शक्यता असते? संभोग पूर्ण न होताही प्रेग्नन्ट होऊ शकता का, तज्ज्ञांचं स्पष्ट उत्तर
Mothers day special
“एक दिवस माझा मुलगा म्हणाला की, मीही तुझ्याबरोबर भांडी घासायला येतो अन्…” वाचा, घरकाम करणाऱ्या महिलांचे अनुभवकथन….
Anti-Rape Wears To Avoid Rape Cases:
Anti Rape Underwear काय काम करतात बघा; श्रीमंतीच्या वेडात उत्पादकांनी महिलांच्या ‘या’ प्रश्नांची उडवली खिल्ली
Review of Mahesh Elkunchwars play Aatmakatha
‘ती’च्या भोवती..! सामान्याकडून असामान्याकडे!
Shash- Gajkesari Rajyog, Rashi Bhavishya
शनीचं बळ व गुरुची बुद्धी, ९ दिवसांनी ‘या’ तीन राशींना अपार श्रीमंतीसह लाभेल समृद्धी; ‘असं’ असेल माता लक्ष्मीचं रूप
Why Women Make More good friends In Office Than Men
कामाच्या ठिकाणी पुरुषांपेक्षा स्त्रियांची का असते अनेकांबरोबर घनिष्ठ मैत्री?
Stridhan belongs to the woman husband has no right over it
स्त्रीधन महिलेचेच, त्यावर पतीचा अधिकार नाही…
hormonal imbalance in marathi
Health Special: संप्रेरकांचे असंतुलन (हार्मोनल इम्बॅलन्स) म्हणजे काय? त्यावर उपाय काय?

लोक काय म्हणतील? 

भारतीय पालकांना सगळ्यात मोठा प्रश्न कोणता पडत असेल तर लोक किंवा समाज काय म्हणेल? या प्रश्नाच्या दडपणाखाली अनेकदा पालक मनाविरुद्ध निर्णय घेतात किंवा आपल्या मुलांवर लादत असतात. समाजाची भीती पालक म्हणून आपल्या मनात एवढी खोलवर रुजलेली असते की, मुलांना त्यांच्या मनासारखं करिअर किंवा जोडीदार निवडीचं स्वातंत्र्यही आपण देत नाही. म्हणूनच तर डॉक्टरांच्या मुलांनी तोच करिअरचा मार्ग निवडावा किंवा गायकाच्या मुलांनी गायकच व्हावं, अशी लोकांची अपेक्षा असते. या कसोटीवर जे उतरत नाहीत ‘त्यांना लोक काय म्हणतील!’ याची भीती दाखवली जाते. 

हेही वाचा >> मुलांच्या मनात अभ्यासाविषयी प्रेम कसं निर्माण करायचं? ‘या’ सोप्या ट्रीक्सने लागेल अभ्यासाची गोडी

पालकत्वाच्या संकल्पना समाजाभोवतीच

पालक म्हणून आपल्या मुलांना आपण समाजासमोर कशाप्रकारे शो-केस करतो, याचा प्रत्येक पालकांनी विचार करून बघावा. आपल्या मुलांना “किती गोड, किती संस्कारी, चांगलं वळण असलेले” असं म्हणावं अशी पालकांची इच्छा असते. मुलांच्या आवडीनिवडी, इच्छा-आकांशा यांचा खूप कमी कुटुंबांमध्ये विचार केला जातो. एखाद्या मुलाला जर क्लासिकल डान्स शिकायचा असेल तर अनेकदा समाजात तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असा विचार करणारा देखील पालकवर्ग आहे. कारण समाजाचा आपल्या आयुष्यात नको इतका प्रभाव आपणच मानत असतो. 

मोठ्यांचा नेहमी आदरच करावा

वयाने मोठ्या व्यक्तींचा आदर केला पाहिजे किंवा ते कधीच चुकत नाहीत, या एका फार मोठ्या गैरसमजाला आपण खतपाणी घालत आलो आहोत. अनेक घरांमधून जवळच्याच मोठ्या व्यक्तीकडून लैंगिक अत्याचाराला घरातील मुलं बळी पडतात. मात्र याची फारशी वाच्यता केली जात नाही किंवा त्या घटनेकडे दुर्लक्ष केलं जातं. अनेकदा व्यसनांमुळे घरातल्या बाईला मारहाण होते, शिवीगाळ केली जाते ती कर्त्या व्यक्तीकडून. पण मुलांनी त्यानंतरही या मोठ्यांचा आदर करावा, अशीच पालकांची अपेक्षा असते. 

हेही वाचा >> आई-वडिलांचा स्वभाव, हावभाव अन् बोलणं न्याहाळत असतं तान्ह बाळ; पालक म्हणून वावरताना ‘ही’ काळजी घ्याच!

घरातल्या समस्या घरातच राहाव्यात

समाजातल्या आपल्या प्रतिष्ठेबाबत, नावलौकिकाबाबत भारतीय पालक नको इतके आग्रही असतात. त्यामुळे ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ असे मानत, कुटुंबात उद्भवलेल्या समस्यांबाबत इतरांशी चर्चा करणे किंवा त्याबद्दल इतरांचा सल्ला घेणे टाळले जाते. म्हणूनच अनेकदा मुलांना त्यांना भेडसावणाऱ्या समस्या, प्रश्न याबाबत घरातल्या घरातच उत्तर शोधण्याचा प्रयत्न होतो. बाहेरच्या एखाद्या तज्ज्ञाची मदत टाळण्याकडेच अनेकांचा भर असतो.

पालकांचा मुलांवर नेहमीच कंट्रोल हवा

नवीन पालक झालेल्या किंवा होऊ घातलेल्या अनेक पालकांना मुलांना आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. वयात येणाऱ्या, बंडखोरी करणाऱ्या मुलांच्या पालकांनी हा सल्ला अमलात आणावा, अशीच समाजाची अपेक्षा असते. खरंतर, यात चुकीचं काही नाही. मात्र ज्या पद्धतीने हा सल्ला स्वीकारला जातो आणि त्याची अंमलबजावणी होते, त्याचे अनेकदा विपरित परिणाम पाहायला मिळतात. पालकांनी मुलांच्या आयुष्यात नेहमीच मार्गदर्शकाची भूमिका निभावली पाहिजे. पण आपण त्यांच्या दैनंदिन आयुष्यात अनेकदा नकळतपणे रिंग-मास्तरची भूमिका पार पाडत असतो. शिस्तीच्या बडग्याखाली मुलांच्या मनाविरुद्ध अनेक गोष्टी करायला त्यांना भाग पाडतो. अशावेळी 3 इडियट्स या चित्रपटातल्या रांचोच्या डायलॉगची आठवण होते, “चाबूक के डर सर्कस का शेर भी खुर्चीपर उछलके बैठना सीख जाता है. पर ऐसे शेर को हम वेल ट्रेंड कहते है, वेल एज्युकेटेड नहीं”. आपण आपल्या मुलांना तशीच वागणूक तर देत नाही ना, याचा विचार केला पाहिजे. 

हेही वाचा >> मुलांसाठी आवडीने खेळणी घेताना पालक म्हणून ‘हा’ विचार करता का?

भारतीय पालकत्व परिपूर्ण आहे!

पालत्वावर अनेकदा आपली संस्कृती आणि आपलं भौगोलिक स्थान यांचा मोठा प्रभाव आहे. पूर्वीच्या एकत्र कुटुंब पद्धतीत पालकत्वाचे जे नियम किंवा प्रकार होते, ते आजही तसेच चालत आले आहेत. त्यात काळानुरूप बदल करावेत किंवा व्हावेत, असे फारसे प्रयत्न होत नाहीत. पूर्वी सातच्या आत घरात यायलाच हवं, ही अट आताच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात पूर्ण करणं शक्य नाही, हे लक्षात घ्यायला हवं किंवा ठराविक वयानंतर मुलींनी स्वयंपाक शिकायलाच हवा, हा अट्टहासही आताच्या काळात अनेकदा एकांगी ठरतो. विविध कारणांमुळे घरापासून लांब राहणाऱ्या मुलांना – मग ती मुलगी असो किंवा मुलगा – थोडाफार बेसिक स्वयंपाक येणं, ही काळाची गरज आहे. तिथे आपल्यात मुलं स्वयंपाक करत नाहीत, हा विचार कालबाह्य झाला आहे, हे लक्षात ठेवणे आणि त्यानुसार पालकत्वाच्या संकल्पना बदलणं आवश्यक आहे. 

पालकत्व ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. पालकत्व म्हणजे 24×7 मुलांवर करडी नजर ठेवणे नाही. मुलांच्या वाढत्या वयात त्यांचे मित्र-मैत्रिण बनता आले तर ते हल्लीच्या काळात उत्तम पालक ओळखले जातात. पालकत्व म्हणजे संवाद सहभाग, सहयोग, समभाव व सहानुभूती अशी पंचसूत्री नव्या काळाची गरज आहे. अर्थात, प्रत्येक व्यक्ती जशी वेगळी आणि युनिक आहे तसंच पालकत्वाचं आहे. तिथे एकच एक समीकरण लागू होणार नाही. मात्र बदलत्या काळानुसार पालकत्वात योग्य बदल करणं, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे.